इंग्रज–म्हैसूर संबंध

इंग्रज–म्हैसूर संबंध :

म्हैसूर – हैदरअलीचा उदय

पहिले म्हैसूर युद्ध (१७६६–१७६९)

दुसरे म्हैसूर युद्ध (१७८०–१७८४) 

तिसरे म्हैसूर युद्ध (१७९०–१७९२)

चौथे म्हैसूर युद्ध (इ.स. १७९९)


म्हैसूर – हैदरअलीचा उदय

·        म्हैसूरचा प्रदेश पूर्वी विजयनगर साम्राज्याचा भाग होता. पुढे तेथे वाडियर घराण्याची सत्ता स्थापन झाली.
हैदरअलीचा जन्म इ.स. १७२१ मध्ये बुंदीकोटे येथे झाला.
 त्याला औपचारिक शिक्षण मिळाले नव्हते, पण लष्करात भरती होऊन त्याने आपल्या पराक्रमाने नाव कमावले.
 इ.स. १७५५ मध्ये त्याची दिंडीगुलचा फौजदार म्हणून नेमणूक झाली.
   इ.स. १७६३ मध्ये त्याने बेदनूर जिंकून आर्थिक व लष्करी शक्ती वाढवली आणि कॅनरा प्रदेशावरही ताबा मिळवला.
  त्याने संपूर्ण म्हैसूर राज्यावर नियंत्रण मिळवून श्रीरंगपट्टण येथे राजधानी स्थापन केली.
हैदरअलीने सुरुवातीला फ्रेंचांशी मैत्री करून इंग्रजांविरुद्ध लष्करी मदत मिळवण्याचा प्रयत्न केला.
१७६१ मध्ये इंग्रजांनी पाँडेचरी जिंकल्यानंतर फ्रेंचांचा प्रभाव कमी झाला.
शेवटी राजा चिक्क कृष्णराज व नंजराज यांना कैद करून हैदरअली म्हैसूरचा वास्तविक सत्ताधीश बनला.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQs)

१) हैदरअलीचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

A) श्रीरंगपट्टण

B) बेदनूर

C) बुंदीकोटे

D) मदुराई

२) हैदरअलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला?

A) १७११

B) १७२१

C) १७३१

D) १७४१

उत्तर B) १७२१

३) इ.स. १७५५ मध्ये हैदरअलीची कोणत्या पदावर नेमणूक झाली?

A) दिवाण

B) सुभेदार

C) दिंडीगुलचा फौजदार

D) सेनापती

उत्तर C) दिंडीगुलचा फौजदार

४) इ.स. १७६३ मध्ये हैदरअलीने कोणता प्रदेश जिंकला?

A) त्रिचनापल्ली

B) मदुराई

C) बेदनूर

D) पाँडेचरी

उत्तर C) बेदनूर

५) हैदरअलीने राजधानी कोठे स्थापन केली?

A) बंगळुरू

B) मद्रास

C) श्रीरंगपट्टण

D) मैसूर

उत्तर C) श्रीरंगपट्टण

६) हैदरअलीने सुरुवातीला कोणाशी मैत्री केली?

A) इंग्रज

B) मराठे

C) फ्रेंच

D) निजाम

उत्तर C) फ्रेंच

७) पाँडेचरी इंग्रजांनी कोणत्या वर्षी जिंकले?

A) १७५५

B) १७५८

C) १७६१

D) १७६५

उत्तर C) १७६१

८) म्हैसूरचा वास्तविक सत्ताधीश होण्यासाठी हैदरअलीने कोणाला कैद केले?

A) हैदरजंग

B) चिक्क कृष्णराज व नंजराज

C) टिपू सुलतान

D) नजीबखान

उत्तर B) चिक्क कृष्णराज व नंजराज

९) हैदरअलीने कोणत्या प्रदेशाचा शेतसारा वापरून स्वतःची फौज उभी केली?

A) कॅनरा

B) बेदनूर

C) दिंडीगुल

D) मदुराई

उत्तर C) दिंडीगुल

१०) हैदरअलीच्या उदयाचे प्रमुख कारण कोणते?

A) उच्च शिक्षण

B) लष्करी नेतृत्व, साहस आणि धाडस

C) इंग्रजांची मदत

D) वाडियर घराण्याचा वारसा

उत्तर B) लष्करी नेतृत्व, साहस आणि धाडस

पहिले म्हैसूर युद्ध (१७६६–१७६९)

·         ब्रिटिशांच्या वाढत्या सत्तेला विरोध करण्यासाठी हैदरअलीने इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला.

·         १७६६ मध्ये पहिले म्हैसूर युद्ध सुरू झाले.

·         सुरुवातीला मराठे, निजाम आणि इंग्रज यांनी हैदरअलीविरुद्ध युती केली.

·         हैदरअलीने मराठ्यांना २३ लाख रुपये देऊन युतीतून बाहेर काढले.

·         नंतर निजामालाही इंग्रजांचा पक्ष सोडून आपल्या बाजूला वळवले.

·         त्यामुळे इंग्रज एकटे पडले.

·         हैदरअली आणि टिपू सुलतान यांनी इंग्रजांचा पराभव करून मद्रासपर्यंत स्वारी केली.

·         ४ एप्रिल १७६९ रोजी मद्रासचा तह झाला.

·         तहानुसार जिंकलेले प्रदेश परस्परांना परत देण्यात आले.

·         तिसऱ्या शत्रूने हल्ला केल्यास एकमेकांना मदत करण्याचे ठरले. परस्पर संरक्षणाची अट तहात समाविष्ट होती.

·         १७७० मध्ये मराठ्यांच्या आक्रमणावेळी इंग्रजांनी हैदरअलीला मदत केली नाही, त्यामुळे तहाचा भंग झाला.

·         पुढे हैदरअलीने फ्रेंचांशी मैत्री केली व इंग्रजांविरुद्ध युती उभारली.

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQs)

१. पहिले म्हैसूर युद्ध केव्हा झाले?

अ) १७५७–६०

ब) १७६६–६९

क) १७७५–७८

ड) १७८०–८४

उत्तर ब) हैदरअली

२. पहिले म्हैसूर युद्ध कोणाच्या नेतृत्वाखाली लढले गेले?

अ) टिपू सुलतान

ब) हैदरअली

क) माधवराव पेशवे

ड) निजाम

उत्तर ब) हैदरअली

३. हैदरअलीविरुद्ध सुरुवातीला कोणाची युती झाली होती?

अ) मराठे, निजाम, इंग्रज

ब) फ्रेंच, मराठे, डच

क) मराठे, भोसले, फ्रेंच

ड) निजाम, डच, पोर्तुगीज

उत्तर अ) मराठे, निजाम, इंग्रज

४. हैदरअलीने मराठ्यांना किती रुपये देऊन युतीतून बाहेर काढले?

अ) १० लाख

ब) १५ लाख

क) २३ लाख

ड) ३० लाख

उत्तर क) २३ लाख

५. टिपू सुलतान कोणत्या शहरापर्यंत पोहोचला?

अ) पुणे

ब) दिल्ली

क) मद्रास

ड) हैदराबाद

उत्तर क) मद्रास

६. मद्रासचा तह केव्हा झाला?

अ) १७६७

ब) १७६८

क) ४ एप्रिल १७६९

ड) १७७२

उत्तर क) ४ एप्रिल १७६९

७. मद्रासच्या तहातील महत्त्वाची अट कोणती होती?

अ) इंग्रजांनी म्हैसूर सोडणे

ब) तिसऱ्या पक्षाच्या हल्ल्यावेळी परस्पर मदत करणे

क) फ्रेंचांना मदत करणे

ड) निजामाला खंडणी देणे

उत्तर ब) तिसऱ्या पक्षाच्या हल्ल्यावेळी परस्पर मदत करणे

८. १७७० मध्ये मराठ्यांच्या स्वारीवेळी इंग्रजांनी कोणती भूमिका घेतली?

अ) हैदरअलीला मदत केली

ब) तटस्थ राहिले

क) मराठ्यांविरुद्ध लढले

ड) युद्धातून माघार घेतली

उत्तर ब) तटस्थ राहिले

९. इंग्रजांनी कोणते फ्रेंच बंदर जिंकले?

अ) गोवा

ब) पाँडेचरी

क) मुंबई

ड) सुरत

उत्तर ब) पाँडेचरी

१०. माहे हे बंदर कोणासाठी महत्त्वाचे होते?

अ) मराठे

ब) इंग्रज

क) हैदरअली (फ्रेंच मदतीसाठी)

ड) निजाम

उत्तर क) हैदरअली (फ्रेंच मदतीसाठी)

११. पहिले म्हैसूर युद्ध कोणत्या तहाने संपले?

अ) सुरतेचा तह

ब) सालबाईचा तह

क) मंगलोरचा तह

ड) मद्रासचा तह

उत्तर ड) मद्रासचा तह

१२. पुढे इंग्रजांविरुद्ध हैदरअलीने कोणाशी मैत्री केली?

अ) पोर्तुगीज

ब) फ्रेंच

क) अफगाण

ड) शीख

उत्तर ब) फ्रेंच

१३. हैदरअलीचा मुख्य प्रतिस्पर्धी कोण होता?

अ) फ्रेंच

ब) ब्रिटिश

क) डच

ड) पोर्तुगीज

उत्तर ब) ब्रिटिश

१४. पहिले म्हैसूर युद्धात इंग्रजांना कोणती परिस्थिती आली?

अ) मोठा विजय

ब) ते एकटे पडले

क) मराठ्यांनी साथ दिली

ड) फ्रेंचांनी मदत केली

उत्तर ब) ते एकटे पडले

१५. १७७९ मध्ये ब्रिटिशांनी कोणते बंदर जिंकले?

अ) सुरत

ब) पाँडेचरी

क) माहे

ड) कोची

उत्तर क) माहे 

दुसरे म्हैसूर युद्ध (१७८०–१७८४)

·         इंग्रजांनी १७६९ च्या मद्रास तहाचे पालन न केल्यामुळे दुसरे म्हैसूर युद्ध सुरू झाले.

·         इंग्रजांनी माहे (फ्रेंच बंदर) ताब्यात घेतल्याने हैदरअलीची फ्रेंच मदत बंद झाली.

·         १७७१ मध्ये मराठ्यांच्या स्वारीवेळी इंग्रजांनी हैदरअलीला मदत केली नाही.

·         १७८० मध्ये हैदरअलीने अर्काट जिंकले.

·         सर आयर कूट याने पोर्टो नोव्हो (१७८१) येथे हैदरअलीचा पराभव केला.

·         इंग्रजांनी नेगापट्टम व त्रिकोमाली ही महत्त्वाची ठिकाणे जिंकली.

·         १७८२ मध्ये हैदरअलीचा मृत्यू झाला. त्यानंतर टिपू सुलतान युद्ध चालू ठेवले.

·         मार्च १७८४ मध्ये मंगलोरचा तह झाला.

·         तहानुसार दोन्ही पक्षांनी जिंकलेला प्रदेश कायम ठेवला व युद्धबंदींची मुक्तता करण्याचे ठरले.

·         या युद्धाच्या काळात वॉरन हेस्टिंग्ज गव्हर्नर जनरल होता.

 

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQs)

१. दुसरे म्हैसूर युद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले?

A) 1766

B) 1769

C) 1780

D) 1784

उत्तर C) 1780

२. दुसऱ्या म्हैसूर युद्धाचे मुख्य कारण कोणते?

A) प्लासीची लढाई

B) मद्रास तहाचे पालन न करणे

C) बक्सरची लढाई

D) सालबाईचा तह

उत्तर B) मद्रास तहाचे पालन न करणे

३. हैदरअलीला फ्रेंचांची मदत कोणत्या बंदरातून मिळत होती?

A) मद्रास

B) माहे

C) मुंबई

D) पाँडिचेरी

उत्तर B) माहे

४. १७८० मध्ये हैदरअलीने कोणते शहर जिंकले?

A) श्रीरंगपट्टण

B) अर्काट

C) बंगळूर

D) तंजावर

उत्तर B) अर्काट

५. पोर्टो नोव्होच्या लढाईत हैदरअलीचा पराभव कोणी केला?

A) रॉबर्ट क्लाईव्ह

B) सर आयर कूट

C) कॉर्नवॉलिस

D) वेलस्ली

उत्तर B) सर आयर कूट

६. पोर्टो नोव्होची लढाई कोणत्या वर्षी झाली?

A) 1780

B) 1781

C) 1782

D) 1784

उत्तर B) 1781

७. हैदरअलीचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला?

A) 1780

B) 1781

C) 1782

D) 1784

उत्तर C) 1782

८. हैदरअलीनंतर युद्धाचे नेतृत्व कोणी केले?

A) निजाम

B) टिपू सुलतान

C) मराठे

D) भोसले

उत्तर B) टिपू सुलतान

९. दुसरे म्हैसूर युद्ध कोणत्या तहाने संपले?

A) मद्रास तह

B) सालबाई तह

C) मंगलोर तह

D) श्रीरंगपट्टण तह

उत्तर C) मंगलोर तह

१०. मंगलोरचा तह कधी झाला?

A) मार्च 1784

B) मार्च 1782

C) जुलै 1780

D) डिसेंबर 1781

उत्तर A) मार्च 1784

११. दुसऱ्या म्हैसूर युद्धाच्या काळात गव्हर्नर जनरल कोण होता?

A) कॉर्नवॉलिस

B) वॉरन हेस्टिंग्ज

C) वेलस्ली

D) डलहौसी

उत्तर B) वॉरन हेस्टिंग्ज

१२. इंग्रजांनी युद्धादरम्यान कोणती दोन महत्त्वाची ठिकाणे जिंकली?

A) पुणे व सातारा

B) नेगापट्टम व त्रिकोमाली

C) अर्काट व मद्रास

D) सुरत व मुंबई

उत्तर B) नेगापट्टम व त्रिकोमाली

तिसरे म्हैसूर युद्ध (१७९०–१७९२)

लॉर्ड कॉर्नवालिसच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तिसरे म्हैसूर युद्ध (१७९०–१७९२) होय. दुसऱ्या म्हैसूर युद्धानंतर मंगलोरचा तह (१७८४) झाला असला तरी इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यातील वैर कायम होते. इंग्रज टिपू सुलतानाला आपला सर्वात मोठा शत्रू मानत होते आणि त्याचा पराभव करण्याची संधी शोधत होते.

दरम्यान, गुंतूर प्रदेशाच्या प्रश्नावरून निजाम आणि टिपू सुलतान यांच्यात मतभेद निर्माण झाले. निजामाने इंग्रजांची मदत मागितली आणि कॉर्नवालिसने त्याला मदत करण्याचे मान्य केले. यामुळे संतप्त झालेल्या टिपू सुलतानाने इंग्रजांच्या संरक्षणाखाली असलेल्या त्रावणकोर राज्यावर हल्ला केला. यामुळे १७९० मध्ये तिसऱ्या म्हैसूर युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात इंग्रज, मराठे आणि निजाम यांनी एकत्र येऊन टिपू सुलतानाविरुद्ध आघाडी उभी केली.

सुरुवातीला इंग्रजांना काही पराभव स्वीकारावे लागले. त्यानंतर १७९२ मध्ये लॉर्ड कॉर्नवालिसने स्वतः सैन्याचे नेतृत्व स्वीकारले. त्याने बंगलोर जिंकून श्रीरंगपट्टणला वेढा घातला. मराठ्यांनी म्हैसूरची रसद बंद केली. त्यामुळे टिपू सुलतानाची परिस्थिती अत्यंत कठीण झाली आणि त्याला तह करण्यास भाग पाडले.

श्रीरंगपट्टणचा तह (१७९२)

टिपू सुलतानाला आपले अर्धे राज्य इंग्रज, मराठे आणि निजाम यांना द्यावे लागले.

३ कोटी ३० लाख रुपयांची खंडणी भरावी लागली.

खंडणीची हमी म्हणून आपल्या दोन मुलांना इंग्रजांकडे ओलीस ठेवावे लागले.

इंग्रजांना मलबार, कूर्ग, दिंडीगुल आणि बारामहल हे प्रदेश मिळाले.

मराठ्यांना वर्धा व कृष्णा नद्यांमधील प्रदेश, तर निजामाला कृष्णा व पेन्नार नद्यांमधील प्रदेश मिळाला.

महत्त्व

कॉर्नवालिसला त्या वेळी टिपू सुलतानाची सत्ता पूर्णपणे नष्ट करता आली असती. परंतु त्याने सावध धोरण स्वीकारले. कारण टिपूचा पूर्ण पराभव केल्यास त्याचे राज्य मराठे व निजाम यांच्यातही वाटावे लागले असते आणि ते अधिक शक्तिशाली झाले असते. त्यामुळे त्याने टिपूची सत्ता पूर्णपणे नष्ट न करता फक्त कमकुवत केली. याच कारणामुळे पुढे १७९९ मध्ये चौथे म्हैसूर युद्ध झाले आणि त्यात टिपू सुलतानाचा अंत झाला.

तिसरे म्हैसूर युद्ध (१७९०–१७९२) – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQ)

१. तिसरे म्हैसूर युद्ध कोणाच्या कारकिर्दीत झाले?

अ) वॉरन हेस्टिंग्ज

ब) लॉर्ड कॉर्नवालिस

क) लॉर्ड वेलस्ली

ड) लॉर्ड डलहौसी

उत्तर ब) लॉर्ड कॉर्नवालिस

 

२. तिसरे म्हैसूर युद्ध कोणत्या कालावधीत झाले?

अ) १७६७–६९

ब) १७८०–८४

क) १७९०–९२

ड) १७९९

उत्तर क) १७९०–९२

३. तिसऱ्या म्हैसूर युद्धाचे तात्काळ कारण कोणते होते?

अ) प्लासीची लढाई

ब) त्रावणकोरवर टिपू सुलतानाचा हल्ला

क) बक्सरची लढाई

ड) कर्नाटक युद्ध

उत्तर ब) त्रावणकोरवर टिपू सुलतानाचा हल्ला

४ त्रावणकोर हे कोणाच्या संरक्षणाखाली होते?

अ) मराठे

ब) निजाम

क) इंग्रज

ड) फ्रेंच

उत्तर क) इंग्रज

५. तिसऱ्या म्हैसूर युद्धात इंग्रजांना साथ कोणी दिली?

अ) फ्रेंच व पोर्तुगीज

ब) मराठे व निजाम

क) शीख व जाट

ड) रोहिले व अफगाण

उत्तर ब) मराठे व निजाम

६. तिसऱ्या म्हैसूर युद्धाच्या वेळी म्हैसूरचा शासक कोण होता?

अ) हैदरअली

ब) टीपू सुलतान

क) कृष्णराज वाडियार

ड) नजीबखान

उत्तर ब) टीपू सुलतान

७. १७९२ मध्ये इंग्रज सैन्याचे नेतृत्व कोणी स्वीकारले?

अ) वॉरन हेस्टिंग्ज

ब) लॉर्ड कॉर्नवालिस

क) लॉर्ड वेलस्ली

ड) रॉबर्ट क्लाईव्ह

उत्तर ब) लॉर्ड कॉर्नवालिस

८. श्रीरंगपट्टणचा तह कोणत्या वर्षी झाला?

अ) १७८४

ब) १७९०

क) १७९२

ड) १७९९

उत्तर क) १७९२

९. श्रीरंगपट्टणच्या तहानुसार टिपू सुलतानाला किती राज्य द्यावे लागले?

अ) एक-चतुर्थांश

ब) अर्धे राज्य

क) संपूर्ण राज्य

ड) एक-तृतीयांश

उत्तर ब) अर्धे राज्य

१०. टिपू सुलतानाने किती खंडणी देण्यास मान्यता दिली?

अ) १ कोटी रुपये

ब) २ कोटी रुपये

क) ३ कोटी ३० लाख रुपये

ड) ५ कोटी रुपये

उत्तर क) ३ कोटी ३० लाख रुपये

११. श्रीरंगपट्टणच्या तहानुसार टिपू सुलतानाने कोणाला ओलीस ठेवले?

अ) आपले सरदार

ब) आपले दोन मुलगे

क) आपले मंत्री

ड) आपला भाऊ

उत्तर ब) आपले दोन मुलगे

१२. खालीलपैकी कोणता प्रदेश इंग्रजांना मिळाला?

अ) मलबार

ब) पुणे

क) दिल्ली

ड) अवध

उत्तर अ) मलबार

१३. कॉर्नवालिसने कोणता प्रदेश जिंकून श्रीरंगपट्टणकडे मोर्चा वळविला?

अ) मद्रास

ब) बंगलोर

क) मुंबई

ड) हैदराबाद

उत्तर ब) बंगलोर

१४. टिपू सुलतानाची रसद कोणी बंद पाडली?

अ) फ्रेंचांनी

ब) मराठ्यांनी

क) पोर्तुगीजांनी

ड) डचांनी

उत्तर ब) मराठ्यांनी

१५. कॉर्नवालिसने टिपूची सत्ता पूर्णपणे का नष्ट केली नाही?

अ) त्याच्याकडे सैन्य नव्हते.

ब) मराठे व निजाम अधिक बलवान होऊ नयेत म्हणून.

क) फ्रेंचांनी विरोध केला.

ड) टिपूने शरणागती पत्करली नव्हती.

उत्तर ब) मराठे व निजाम अधिक बलवान होऊ नयेत म्हणून.

१६. तिसऱ्या म्हैसूर युद्धानंतर कोणता तह झाला?

अ) मंगलोरचा तह

ब) सालबाईचा तह

क) श्रीरंगपट्टणचा तह

ड) वसईचा तह

उत्तर क) श्रीरंगपट्टणचा तह

१७. तिसऱ्या म्हैसूर युद्धानंतर कोणते युद्ध झाले?

अ) पहिले मराठा युद्ध

ब) दुसरे मराठा युद्ध

क) चौथे म्हैसूर युद्ध

ड) बक्सरची लढाई

उत्तर क) चौथे म्हैसूर युद्ध

१८. कॉर्नवालिसचे धोरण कसे होते?

अ) आक्रमक

ब) सावध व संतुलित

क) निष्क्रिय

ड) विस्तारवादी नाही

उत्तर ब) सावध व संतुलित

१९. श्रीरंगपट्टणचा तह कोणामध्ये झाला?

अ) इंग्रज व हैदरअली

ब) इंग्रज व टिपू सुलतान

क) मराठे व निजाम

ड) फ्रेंच व इंग्रज

उत्तर ब) इंग्रज व टिपू सुलतान

२०. तिसऱ्या म्हैसूर युद्धाचा मुख्य परिणाम कोणता?

अ) इंग्रजांचा पराभव झाला.

ब) टिपू सुलतानाची सत्ता कमकुवत झाली

क) मराठा साम्राज्याचा अंत झाला.

ड) फ्रेंचांनी म्हैसूर जिंकले.

उत्तर ब) टिपू सुलतानाची सत्ता कमकुवत झाली

चौथे म्हैसूर युद्ध (इ.स. १७९९) – मुद्दे

युद्धाची कारणे

·         तिसऱ्या म्हैसूर युद्धातील पराभवाचा बदला घेण्याची टिपू सुलतानाची इच्छा.

·         श्रीरंगपट्टणच्या तहामुळे गमावलेला प्रदेश परत मिळविण्याचा प्रयत्न.

·         लॉर्ड वेलस्लीची इंग्रजी साम्राज्य विस्ताराची महत्त्वाकांक्षा.

·         टिपू सुलतानाने फ्रान्सशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला.

·         टिपू जेकोबीन क्लबचा सदस्य झाला.

·         फ्रेंचांना श्रीरंगपट्टण येथे स्वातंत्र्यवृक्ष लावण्याची परवानगी दिली.

·         अरेबिया, काबूल, कॉन्स्टँटिनोपल, व्हर्सेलिस व मॉरिशस येथे मदतीसाठी शिष्टमंडळे पाठविली.

·         निजामाने (१७९८) तैनाती फौज पद्धती स्वीकारून इंग्रजांना साथ दिली.

·         मराठ्यांनी स्पष्टपणे इंग्रजांना साथ दिली नाही.

·         टिपूने शरणागती नाकारल्यामुळे युद्ध सुरू झाले.

युद्धाचा घटनाक्रम

·         इंग्रज सैन्याचे नेतृत्व जनरल हॅरिस याने केले.

·         निजामाच्या सैन्याचा प्रमुख ऑर्थर वेलस्ली होता.

·         पश्चिमेकडून स्टुअर्टने हल्ला केला.

·         मालवेल्लीच्या लढाईत टिपूचा पराभव झाला.

·         टिपू श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यात गेला.

·         ४ मे १७९९ रोजी इंग्रजांनी श्रीरंगपट्टण जिंकले.

·         किल्ल्याच्या संरक्षणासाठी लढताना टिपू सुलतान वीरमरण पावला.

·         इंग्रजांनी श्रीरंगपट्टणची मोठ्या प्रमाणावर लूट केली.

युद्धाचे परिणाम

·         टिपू सुलतानाचा अंत झाला.

·         इंग्रजांनी कॅनरा, कोईमतूर व म्हैसूरचा मोठा प्रदेश ताब्यात घेतला.

·         निजामाला काही प्रदेश देण्यात आला.

·         मराठ्यांनी तैनाती फौजेची अट मान्य न केल्याने प्रदेश नाकारला.

·         वाडियार घराण्यातील राजपुत्राला गादीवर बसविण्यात आले.

·         पूर्णय्या याची प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

·         म्हैसूर ब्रिटिशांच्या संरक्षणाखालील संस्थान बनले.

·         दक्षिण भारतात इंग्रजांचे वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित झाले.

चौथे म्हैसूर युद्ध (इ.स. १७९९) – MCQs

१. चौथे म्हैसूर युद्ध कोणत्या वर्षी झाले?

अ) १७९०

ब) १७९२

क) १७९९

ड) १८०५

उत्तर: क) १७९९

२. चौथ्या म्हैसूर युद्धाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

अ) वॉरेन हेस्टिंग्ज

ब) कॉर्नवालिस

क) लॉर्ड वेलस्ली

ड) लॉर्ड हेस्टिंग्ज

उत्तर: क) लॉर्ड वेलस्ली

३. चौथ्या म्हैसूर युद्धात इंग्रजांचा प्रमुख शत्रू कोण होता?

अ) हैदरअली

ब) टिपू सुलतान

क) नानाफडणवीस

ड) निजाम

उत्तर: ब) टिपू सुलतान

४. टिपू सुलतानाने कोणत्या देशाशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला?

अ) पोर्तुगाल

ब) स्पेन

क) फ्रान्स

ड) रशिया

उत्तर: क) फ्रान्स

५. टिपू सुलतान कोणत्या क्लबचा सदस्य झाला होता?

अ) रोटरी क्लब

ब) जेकोबीन क्लब

क) ईस्ट इंडिया क्लब

ड) लिबरल क्लब

उत्तर: ब) जेकोबीन क्लब

६. १७९८ मध्ये तैनाती फौज पद्धती कोणी स्वीकारली?

अ) मराठे

ब) निजाम

क) टिपू सुलतान

ड) शीख

उत्तर: ब) निजाम

७. चौथ्या म्हैसूर युद्धात इंग्रजी सैन्याचा प्रमुख सेनापती कोण होता?

अ) आर्थर वेलस्ली

ब) स्टुअर्ट

क) जनरल हॅरिस

ड) कॉर्नवालिस

उत्तर: क) जनरल हॅरिस

८. निजामाच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले?

अ) जनरल हॅरिस

ब) आर्थर वेलस्ली

क) क्लाईव्ह

ड) स्टुअर्ट

उत्तर: ब) आर्थर वेलस्ली

९. टिपू सुलतानाचा पराभव कोणत्या लढाईत झाला?

अ) वांदीवाश

ब) प्लासी

क) बक्सर

ड) मालवेल्ली

उत्तर: ड) मालवेल्ली

१०. श्रीरंगपट्टण इंग्रजांनी कधी जिंकले?

अ) १७९०

ब) १७९२

क) ४ मे १७९९

ड) १० मे १८००

उत्तर: क) ४ मे १७९९

११. टिपू सुलतानाचा मृत्यू कोठे झाला?

अ) बंगळूर

ब) मंगलोर

क) श्रीरंगपट्टण

ड) कोईमतूर

उत्तर: क) श्रीरंगपट्टण

१२. टिपू सुलतानाचा मृत्यू कसा झाला?

अ) विषप्रयोगाने

ब) कैदेत

क) रणांगणावर लढताना

ड) आत्महत्येमुळे

उत्तर: क) रणांगणावर लढताना

१३. चौथ्या म्हैसूर युद्धानंतर म्हैसूरच्या गादीवर कोणाला बसविण्यात आले?

अ) टिपूचा मुलगा

ब) वाडियार घराण्यातील राजपुत्र

क) निजाम

ड) मराठा सरदार

उत्तर: ब) वाडियार घराण्यातील राजपुत्र

१४. वाडियार राजाचा प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

अ) नाना फडणवीस

ब) मीर जाफर

क) पूर्णय्या

ड) सालारजंग

उत्तर: क) पूर्णय्या

१५. चौथ्या म्हैसूर युद्धानंतर दक्षिण भारतात कोणाचे वर्चस्व प्रस्थापित झाले?

अ) मराठे

ब) फ्रेंच

क) इंग्रज

ड) निजाम

उत्तर: क) इंग्रजचौथे म्हैसूर युद्ध (इ.स. १७९९) – मुद्दे

युद्धाची कारणे

·         तिसऱ्या म्हैसूर युद्धातील पराभवाचा बदला घेण्याची टिपू सुलतानाची इच्छा.

·         श्रीरंगपट्टणच्या तहामुळे गमावलेला प्रदेश परत मिळविण्याचा प्रयत्न.

·         लॉर्ड वेलस्लीची इंग्रजी साम्राज्य विस्ताराची महत्त्वाकांक्षा.

·         टिपू सुलतानाने फ्रान्सशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला.

·         टिपू जेकोबीन क्लबचा सदस्य झाला.

·         फ्रेंचांना श्रीरंगपट्टण येथे स्वातंत्र्यवृक्ष लावण्याची परवानगी दिली.

·         अरेबिया, काबूल, कॉन्स्टँटिनोपल, व्हर्सेलिस व मॉरिशस येथे मदतीसाठी शिष्टमंडळे पाठविली.

·         निजामाने (१७९८) तैनाती फौज पद्धती स्वीकारून इंग्रजांना साथ दिली.

·         मराठ्यांनी स्पष्टपणे इंग्रजांना साथ दिली नाही.

·         टिपूने शरणागती नाकारल्यामुळे युद्ध सुरू झाले.

युद्धाचा घटनाक्रम

·         इंग्रज सैन्याचे नेतृत्व जनरल हॅरिस याने केले.

·         निजामाच्या सैन्याचा प्रमुख ऑर्थर वेलस्ली होता.

·         पश्चिमेकडून स्टुअर्टने हल्ला केला.

·         मालवेल्लीच्या लढाईत टिपूचा पराभव झाला.

·         टिपू श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यात गेला.

·         ४ मे १७९९ रोजी इंग्रजांनी श्रीरंगपट्टण जिंकले.

·         किल्ल्याच्या संरक्षणासाठी लढताना टिपू सुलतान वीरमरण पावला.

·         इंग्रजांनी श्रीरंगपट्टणची मोठ्या प्रमाणावर लूट केली.

युद्धाचे परिणाम

·         टिपू सुलतानाचा अंत झाला.

·         इंग्रजांनी कॅनरा, कोईमतूर व म्हैसूरचा मोठा प्रदेश ताब्यात घेतला.

·         निजामाला काही प्रदेश देण्यात आला.

·         मराठ्यांनी तैनाती फौजेची अट मान्य न केल्याने प्रदेश नाकारला.

·         वाडियार घराण्यातील राजपुत्राला गादीवर बसविण्यात आले.

·         पूर्णय्या याची प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

·         म्हैसूर ब्रिटिशांच्या संरक्षणाखालील संस्थान बनले.

·         दक्षिण भारतात इंग्रजांचे वर्चस्व पूर्णपणे प्रस्थापित झाले.

चौथे म्हैसूर युद्ध (इ.स. १७९९) – MCQs

१. चौथे म्हैसूर युद्ध कोणत्या वर्षी झाले?

अ) १७९०

ब) १७९२

क) १७९९

ड) १८०५

उत्तर: क) १७९९

२. चौथ्या म्हैसूर युद्धाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?

अ) वॉरेन हेस्टिंग्ज

ब) कॉर्नवालिस

क) लॉर्ड वेलस्ली

ड) लॉर्ड हेस्टिंग्ज

उत्तर: क) लॉर्ड वेलस्ली

३. चौथ्या म्हैसूर युद्धात इंग्रजांचा प्रमुख शत्रू कोण होता?

अ) हैदरअली

ब) टिपू सुलतान

क) नानाफडणवीस

ड) निजाम

उत्तर: ब) टिपू सुलतान

४. टिपू सुलतानाने कोणत्या देशाशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला?

अ) पोर्तुगाल

ब) स्पेन

क) फ्रान्स

ड) रशिया

उत्तर: क) फ्रान्स

५. टिपू सुलतान कोणत्या क्लबचा सदस्य झाला होता?

अ) रोटरी क्लब

ब) जेकोबीन क्लब

क) ईस्ट इंडिया क्लब

ड) लिबरल क्लब

उत्तर: ब) जेकोबीन क्लब

६. १७९८ मध्ये तैनाती फौज पद्धती कोणी स्वीकारली?

अ) मराठे

ब) निजाम

क) टिपू सुलतान

ड) शीख

उत्तर: ब) निजाम

७. चौथ्या म्हैसूर युद्धात इंग्रजी सैन्याचा प्रमुख सेनापती कोण होता?

अ) आर्थर वेलस्ली

ब) स्टुअर्ट

क) जनरल हॅरिस

ड) कॉर्नवालिस

उत्तर: क) जनरल हॅरिस

८. निजामाच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले?

अ) जनरल हॅरिस

ब) आर्थर वेलस्ली

क) क्लाईव्ह

ड) स्टुअर्ट

उत्तर: ब) आर्थर वेलस्ली

९. टिपू सुलतानाचा पराभव कोणत्या लढाईत झाला?

अ) वांदीवाश

ब) प्लासी

क) बक्सर

ड) मालवेल्ली

उत्तर: ड) मालवेल्ली

१०. श्रीरंगपट्टण इंग्रजांनी कधी जिंकले?

अ) १७९०

ब) १७९२

क) ४ मे १७९९

ड) १० मे १८००

उत्तर: क) ४ मे १७९९

११. टिपू सुलतानाचा मृत्यू कोठे झाला?

अ) बंगळूर

ब) मंगलोर

क) श्रीरंगपट्टण

ड) कोईमतूर

उत्तर: क) श्रीरंगपट्टण

१२. टिपू सुलतानाचा मृत्यू कसा झाला?

अ) विषप्रयोगाने

ब) कैदेत

क) रणांगणावर लढताना

ड) आत्महत्येमुळे

उत्तर: क) रणांगणावर लढताना

१३. चौथ्या म्हैसूर युद्धानंतर म्हैसूरच्या गादीवर कोणाला बसविण्यात आले?

अ) टिपूचा मुलगा

ब) वाडियार घराण्यातील राजपुत्र

क) निजाम

ड) मराठा सरदार

उत्तर: ब) वाडियार घराण्यातील राजपुत्र

१४. वाडियार राजाचा प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

अ) नाना फडणवीस

ब) मीर जाफर

क) पूर्णय्या

ड) सालारजंग

उत्तर: क) पूर्णय्या

१५. चौथ्या म्हैसूर युद्धानंतर दक्षिण भारतात कोणाचे वर्चस्व प्रस्थापित झाले?

अ) मराठे

ब) फ्रेंच

क) इंग्रज

ड) निजाम

उत्तर: क) इंग्रज


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

निवडणूक प्रक्रिया इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

राजकीय पक्ष इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र