मराठी वाक्य व वाक्याचे प्रकार
मराठी वाक्य व वाक्याचे प्रकार वाक्यांच्या अर्थाने होणारे प्रकार :- १) 'विधानार्थी' वाक्य :- केवळ विधान म्हणून जे वाक्य केलेले असते, त्यास 'विधानार्थी' वाक्य म्हणतात. उदा. साहिल दररोज सकाळी मधुर गाणे गातो. होकारार्थी वाक्ये :- विधानार्थी वाक्यात जेव्हा नकार दर्शवलेला नसतो तेव्हा ते होकारार्थी वाक्य असते. करणरूपी होकारार्थी वाक्याला 'करणरूपी वाक्य म्हणतात. नकारार्थी वाक्ये :- विधानार्थी वाक्यात जेव्हा नकार दर्शवलेला असतो तेव्हा ते नकारार्थी वाक्य असते. अकरणरूपी :- नकारार्थी वाक्याला अकरणरूपी वाक्ये म्हणतात. ...