पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इतिहासतील महत्त्वाचे मुद्दे

इतिहासतील मह्त्त्वाचे मुद्दे   इयत्ता दहावी विषय  इतिहास राज्यशास्त्र   इतिहासतील रिकाम्या जागा , जोड्या लावा तसेच काही थोडक्यात उत्तरे लिहिण्यासाठी खालील उपयुक्त मुद्द्यांचा उपयोग होतो. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून , भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.  इतिहासाची चिकित्सा पूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते .  ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपेटोमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली .  सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे ४५०० वर्षांपूर्वी सुमेरमधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा आहे . मेसोपेटोमियातील सु मेर संस्कृती चा सर्वाधिक प्राचीन शिलालेख तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे .  रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ यांनी इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश...