सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र
सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच असे नाही. 2 काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात. 3 त्याच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. चळवळ म्हणजे काय ? सातत्याने कृतिशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणण्याचे काम केले जाते. या सामूहिक कृतींना ‘चळवळ’ असे म्हणतात. उदा. , प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते. चळवळीची वैशिष्ट्ये १ चळवळ ही एक सामूहिक कृती असते. त्यात अनेक लोकांचा सक्रिय सहभाग असतो. २ चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असते. ३ चळवळीसमोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू अथवा प्रश्न असतो. उदा. भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो. ४ चळवळीला नेतृत्व असते. नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. ५ चळवळींच्या संघटना असतात. त्या संघटना सातत्याने प्र...