संधी - स्वरसंधी
मराठी व्याकरण संधी - स्वरसंधी पूर्वज्ञान : संधींचा अभ्यास करताना मराठीतील वर्णमालेतील स्वर व व्यंजन यांची ओळख असणे आवश्यक आहे. संधी संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. अशा दोन वर्णांच्या एकमेकांमध्ये एकत्र मिसळण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात. संधींचे प्रकार स्वरसंधी :- स्वर + स्वर एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात. उदा. कवि + ईश्वर = (इ + ई = ई) = कवीश्वर. व्यंजनसंधी :- व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर एकमेकांशेजारी येणाऱ्या या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. उदा. सत् + जन = (तू + ज्) = सज्जन, चित् + आनंद = (त् + आ) = चिदानंद विसर्गसंधी विसर्ग व्यंजन किंवा विसर्ग + स्वर ...