वृत्त
पद्यातील चरणात जी विशिष्ठ लयबध्द शब्द रचना असते तिला 'वृत्त' असे म्हणतात.
अक्षरगणवृत्ते :-
प्रत्येक चरणात समान अक्षरे असतात तसेच चरणातील र्हस्व दीर्घ यांचा क्रम सारखाच असतो, म्हणजे त्यांचा लघु-गुरु क्रम सारखा असतो.
गण :-
वृत्तांची लक्षणे ठरवताना पद्याच्या प्रत्येक चरणातील अक्षरांचे तीन तीन अक्षरांचे एकेक गट पाडून त्यांचा लघुगुरूक्रम मांडण्याच्या पध्दतीला 'गण' असे म्हणतात.
यती :-
पद्याच्या पंक्ती किंवा कवितेचे चरण वाचत असताना आपण मध्येच काही अक्षरांनंतर नैसर्गिक रीतीने थांबतो त्या क्रमांकाच्या अक्षरावर 'यती' आहे असे मानतात.
यतिभंग :-
वृत्ताच्या प्रकारानुसार काव्य पंक्तीमध्ये ज्या अक्षरावर यती येत असेल ते अक्षर जर शब्दाच्या मध्ये असेल तर वाचताना शब्द तोडला जात असेल तर 'यतिभंग' होतो.
गण लेखनाची पध्दती
१. काव्य पंक्तीतील अक्षरांचे तीन तीनचे प्रत्येकी एकेक गट पाडावे.
उदाहरणार्थ
सदा सर्वदा योग तूझा घडावा
सदा स | र्वदा यो | ग तूझा | घडावा
२. लघुगुरू क्रम
पंक्तीचे वाचन करून र्हस्व व दीर्घ प्रमाणे लघु व गुरू च्या खुणा कराव्यात.
उदाहरणार्थ
सदा सर्वदा योग तूझा घडावा
सदा स | र्वदा यो | ग तूझा | घडावा
︺ _ _ | ︺ _ _ | ︺ _ _ | ︺ _ _
३. गण
लघु गुरू च्या क्रमानुसार प्रत्येक अक्षराच्या गटांना गण द्यावेत.
उदाहरणार्थ
सदा सर्वदा योग तूझा घडावा
सदा स | र्वदा यो | ग तूझा | घडावा
︺ _ _ | ︺ _ _ | ︺ _ _ | ︺ _ _
य | य | य | य
लघु गुरू क्रम पाडण्याची पद्धत
लघु गण- य, र, त, न आणि गुरू गण- भ, ज, स, म
लघु गुरू
आद्य ︺ _ _ 'य' _ ︺ ︺ 'भ'
मध्य _ ︺ _ 'र' ︺_ ︺ 'ज'
अंत्य _ _ ︺ 'त' ︺ ︺ _ 'स'
सर्व ︺ ︺ ︺ 'न' _ _ _ 'म'
लघु गुरू ठरवण्याचे नियम
लघु :-
१. र्हस्व स्वर असलेल्या अक्षरांना लघु अक्षर मानतात.
२. लघु अक्षर अर्धचंद्राच्या ︺ खूणेने दाखवतात
३. लघु गण - य, र, त, न
४. अ, इ, उ, ऋ या र्हस्व उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांस किंवा स्वरयुक्त अक्षरांस 'लघू अक्षरे' असे म्हणतात.
५. र्हस्व अक्षर म्हणजे लघु असेल त्यापुढे प्र, क्र यांसारखी जोड अक्षरे असतील तर त्याचा जोर मागील र्हस्व अक्षरावर येत नाही हे अक्षर लघु मानावे.
६. जोड अक्षरातील शेवटचे अक्षर र्हस्व असेल तर ते जोड अक्षर लघु मानावे
भास्कर
-- -- --
गुरू :-
१. दीर्घ स्वर असलेल्या अक्षरांना 'गुरु' अक्षर मानतात.
२. गुरु अक्षर आडव्या रेषेच्या _ खुणेने दाखवतात.
३. गुरू गण - भ, ज, स, म
४. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ या दीर्घ उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांस किंवा का, की, कू, के कै, को, कौ यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस 'गुरू अक्षरे' असे म्हणतात.
५. जर प्रारंभीचे अक्षर लघु असले तरी त्याच्या पुढे जर जोड अक्षर असेल आणि त्याचा जोर त्याच्या मागील लघु स्वरावर पडत असेल तर तो लघु स्वर गुरू मानावा
पुस्तक, सज्जन
-- -- ︺ -- -- ︺
६. जोड अक्षरातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर ते जोड अक्षर गुरू मानावे.
७. र्हस्व स्वरावर अनुस्वार किंवा विसर्ग येत असेल तर ते गुरू मानावे.
वीणा क । री मंजु । झंकार । हाती, अ । से शार । दाही ज । गन्मोहि । नी
-- -- ︺ । -- -- ︺। -- -- ︺ । -- -- ︺ । -- -- ︺ ।-- -- ︺। -- -- ︺ । --
त । त । त । त । त । त । त । ग
८. कवितेत चरणाच्या शेवटचे र्हस्व अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते दीर्घ मानावे व त्यास गुरू मानावे.
आरक्त । होय फु । लुनी प्र । णयी प । लाश
-- -- ︺। -- ︺︺ । ︺--︺।︺--︺।-- --
त । भ । ज । ज । ग ग
९. काव्य पंक्ती मध्ये क्र, प्र, द्र, ज्र, ट्र यांसारखी जोड अक्षरे असतील तर त्याचा र्हस्व दीर्घ स्वर पाहून ती लघु व गुरू मानावीत.
आरक्त । होय फु । लुनी प्र । णयी प । लाश
-- -- ︺। -- ︺︺ । ︺--︺।︺--︺।-- --
त । भ । ज । ज । ग ग
१०. काव्य पंक्ती मधील अक्षरांचे तीन तीनचे गट पाडल्यानंतर जर शेवटी दोन अक्षरे शिल्लक राहिली असतील तर त्याचा र्हस्व दीर्घ याप्रमाणे लघु व गुरू चा क्रम ठरवून लघु अक्षराला 'ल' व गुरू अक्षराला 'ग' अशी गुणांची नावे द्यावीत.
आरक्त । होय फु । लुनी प्र । णयी प । लाश
-- -- ︺। -- ︺︺ । ︺--︺।︺--︺।-- --
त । भ । ज । ज । ग ग
न हाक । हृदयी । तुझ्या ज । ननिची । कशी पा । वली?
︺--︺ । ︺︺-- । ︺--︺ । ︺︺--।︺-- -- । ︺--
ज । स । ज । स । य । ल ग
१. भूजंगप्रयात
अक्षरे : १२
यती : ६ अक्षरावर
गण : य - य - य - य
उदाहरणार्थ
सदा सर्वदा योग तूझा घडावा
सदा स | र्वदा यो | ग तूझा | घडावा
︺ _ _ | ︺ _ _ | ︺ _ _ | ︺ _ _
य | य | य | य
२. उपेंद्रवज्रा
अक्षरे : ११
यती : ५ अक्षरावर
गण : ज - त - ज - ग - ग
करी कसूनी नित भूमिसेवा
करी क । सूनी नि । त भूमि । सेवा
︺--︺। -- -- ︺ । ︺--︺ । -- --
ज । त । ज । ग ग
३. वसंततिलका
अक्षरे : १४
यती : ८ अक्षरावर
गण : त - भ - ज - ज - ग - ग
आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश
आरक्त । होय फु । लुनी प्र । णयी प । लाश
-- -- ︺। -- ︺︺ । ︺--︺।︺--︺।-- --
त । भ । ज । ज । ग ग
४. मालिनी
अक्षरे : १५
यती : ८ अक्षरावर
गण : न - न - म - य - य
पखरण बघ घाली भूवरी पारिजात
पखर । ण बघ । घाली भू । वरी पा । रिजात
︺︺︺। ︺︺︺ । -- -- -- ।︺-- -- ।︺-- --
न । न । म । य । य
५. मंदाक्रांता
अक्षरे : १७
यती : ४ व ६ अक्षरांवर
गण : म - भ - भ - न - त - त - ग - ग
मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी
मेघांनी । हे गग । न भर । ता गाढ । आषाढ । मासी
-- -- -- । -- ︺︺ । ︺︺︺। -- -- ︺।-- -- ︺। -- --
म । भ । न । त । त । ग ग
६. पृथ्वी
अक्षरे : १७
यती : ८ अक्षरावर
गण : ज - स - ज - स - य - ल - ग
न हाक हृदयी तुझ्या जननिची कशी पावली?
न हाक । हृदयी । तुझ्या ज । ननिची । कशी पा । वली?
︺--︺ । ︺︺-- । ︺--︺ । ︺︺--।︺-- -- । ︺--
ज । स । ज । स । य । ल ग
७. शार्दुलविक्रीडित
अक्षरे : १९
यती : १२ अक्षरावर
गण : म - स - ज - स - त - त - ग - ग
आकाशात फुले, धरेवर फुले, वार्यावरही फुले।
आकाशा । त फुले, । धरेव । र फुले, । वार्याव ।रीही फु । ले।
-- -- -- । ︺︺-- । ︺--︺ । ︺︺--। -- -- ︺। -- -- ︺। --
म । स । ज । स । त । त । ग
८. मंदारमाला
अक्षरे : २२
यती : ४, १० व १६ अक्षरांवर
गण : त - त - त - त - त - त - त - ग
वीणा करी मंजु झंकार हाती, असे शारदा ही जगन्मोहिनी
वीणा क । री मंजु । झंकार । हाती, अ । से शार । दाही ज । गन्मोहि । नी
-- -- ︺ । -- -- ︺। -- -- ︺ । -- -- ︺ । -- -- ︺ ।-- -- ︺। -- -- ︺ । --
त । त । त । त । त । त । त । ग