पोस्ट्स

इतिहास लेबलसह पोस्ट दाखवत आहे

१८५७ चा संघर्ष

१८५७ चा संघर्ष  लॉर्ड डलहौसीच्या प्रयाणानंतर १८५७ मध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध महान संघर्ष झाला. या संघर्षामुळे भारताच्या इतिहासाला नवीन वळण मिळाले. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन भारताचा कारभार ब्रिटिश सरकारच्या हाती गेला. १८५७ च्या संघर्षात राष्ट्रीय संघटना, सक्षम राष्ट्रीय नेतृत्व आणि सर्वसामान्य लोकांचा पूर्ण सहभाग यांचा अभाव होता. तरीही बिहार, संयुक्त प्रांत इत्यादी भागांत जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे काही ठिकाणी या संघर्षाला राष्ट्रीय युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले. ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांमुळे भारतीयांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा झालेला उद्रेक म्हणजेच १८५७ चा संघर्ष होय. १८५७ च्या संघर्षाची कारणे १८५७ चा संघर्ष अचानक घडला नाही; दीर्घकाळ साचलेल्या असंतोषाला तात्कालिक कारणामुळे स्फोटक रूप मिळाले. त्याची प्रमुख कारणे राजकीय, धार्मिक-सामाजिक, शासकीय-आर्थिक आणि लष्करी अशी होती. १. १८५७ चा संघर्ष - राजकीय कारणे : लॉर्ड डलहौसीच्या विलिनीकरण व खालसा धोरणामुळे भारतीय राजे व जनता नाराज झाली. सातारा, नागपूर आणि अवध यांसारखी राज्ये ब्रिटिशांनी खालसा केली. मोगल ब...

इंग्रज-शीख संबंध (१८०९–१८४९)

इंग्रज-शीख संबंध (१८०९–१८४९)   अमृतसरचा तह (१८०९) रणजितसिंग आणि इंग्रजांमध्ये मैत्री झाली. रणजितसिंगाने सतलजच्या पूर्वेकडे साम्राज्यविस्तार न करण्याचे मान्य केले. सर चार्ल्स मेटकाफने मध्यस्थी केली. रणजितसिंगाचा पश्चिमेकडील विस्तार पूर्वेकडे विस्तारास मर्यादा असल्याने रणजितसिंगाने पश्चिमेकडे विस्तार केला. मुलतान , डेरा , काश्मीर आणि पेशावर जिंकले.   इंग्रजांचे बदलते धोरण १८२२ नंतर इंग्रज रणजितसिंगाच्या हालचालींवर सावधपणे लक्ष ठेवू लागले. रणजितसिंगानेही इंग्रजांशी संघर्ष टाळला. इंग्रजांना रणजितसिंगाची भीती रणजितसिंगाने नेपाळ , बाजीराव दुसरा आणि नागपूरच्या भोसल्यांना मदत केली नाही. इंग्रज इतर युद्धांत गुंतले असतानाही त्याने त्याचा फायदा घेतला नाही.   सिंधचा प्रश्न रणजितसिंगाला सिंध आणि विशेषतः शिकारपूर जिंकायचे होते. इंग्रजांना सिंधवर रणजितसिंगाचे वर्चस्व नको होते.   रूपारची भेट (१८३१) सर विल्यम बेंटिंक आणि रणजितसिंग यांची रूपार येथे भेट झाली. रणजितसिंगाने इंग्रजांच्या सिंधमधील व्यापारी धोरणाला विरोध केला नाही.   पेशावरचा विजय (१...