गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

प्राचीन भारतीय इतिहास : 'जनपदे व महाजनपदे'

 जनपदे व महाजनपदे

१ जनपदे

इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ६०० या वैदिकोत्तर कालखंडात जनपदे अस्तित्वात आली.

संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात आणि ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून माहिती मिळते. 

जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये.

प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती. 

विस्तार : 

भारतीय उपखंडाच्या वायव्येला आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती.

महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या 'अश्मक' या जनपदाने व्यापलेला होता.

गणपरिषद :

जनपदांमधील गणपरिषदेचे ज्येष्ठ सदस्य व्यक्ती एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. त्या सभागृहास 'संथागार' असे म्हटले जाई. 

गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. 


२. महाजनपदे

   १ . कोसल

विस्तार : हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश.

राजधानी : श्रावस्ती.

कोसलचा राजा : प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन


   २. वत्स 

विस्तार : 

उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेश

राजधानी : कोसम

प्राचीन काळचे कौशांबी नगर.

महत्त्वाचे व्यापारी केंद्र.

 

   ३. अवंती

विस्तार :

मध्य प्रदेशातील माळवा प्रदेश

राजधानी : उज्जयिनी (उज्जैन)

उज्जयिनी - महत्त्वाचे व्यापारी केंद्र

अवंतीचा राजा : प्रयोत वास् 

हा वर्धमान महावीर बििं आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन


४.  मगध

बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग.

राजधानी : राजगृह (राजगीर)

महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता.

जीवक हा प्रसिद्ध वैदय बिंबिसाराच्या दरबारात होता.


सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे: 

प्राचीन नावे    आधुनिक नावे

(१) काशी - बनारस

(२) कोसल -  लखनौ

(३) मल्ल -  गोरखपूर

(४) वत्स -   अलाहाबाद

(५) चेदि -    कानपूर

(६) कुरु -    दिल्ली

(७) पांचाल - रोहिलखंड

(८) मत्स्य -  जयपूर

(९) शूरसेन - मथुरा

(१०) अश्मक - औरंगाबाद महाराष्ट्र

(११) अवंती -  उज्जैन

(१२) अंग -  चंपा-पूर्व बिहार

(१३) मगध -  दक्षिण-बिहार

(१४) वृज्जी - उत्तर बिहार

(१५) गांधार - पेशावर

(१६) कंबोज - गांधारजवळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...