Indirect Speech Statement
Statement विधानार्थी वाक्य अवतरण चिन्हातील वाक्य Statement विधानार्थी असेल तर त्या वाक्याचे Indirect Speech पुढील प्रमाणे बदल करावेत. 1. Reporting Verb बदलणे. 2. That या conjunction चा वापर करावा. 3. वाक्य रचनेतील बदल करणे. 4. अवतरण चिन्हातील वाक्य Statement विधानार्थी असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत- A. काळ Tense B. सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs C. पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns D. Time and nearness Rahul said, "Sahil sings song." या वाक्यातील Reporting verb Said हे क्रियापद असून त्याचा Tense - Simple past Tense आहे. या वाक्यातील subject of reporting verb Rahul हे नाम आहे. 1. Reporting Verb बदलणे 1. अवतरण चिन्हातील वाक्य कोणाला उद्देशून नसेल तर Reporting verb 'said' किंवा इतर असेल तर न बदलता 'said' च ठेवावे. वरील वाक्य कोणालाही उद्देशून बोललेले नाही म्हणून वाक्यातील reporting verb said न बदलता तसेच रहते. Rahul said , "Sahil sings song." Rahul said tha...