अक्षरगणवृत्ते
वृत्त पद्यातील चरणात जी विशिष्ठ लयबध्द शब्द रचना असते तिला 'वृत्त' असे म्हणतात. अक्षरगणवृत्ते :- प्रत्येक चरणात समान अक्षरे असतात तसेच चरणातील र्हस्व दीर्घ यांचा क्रम सारखाच असतो, म्हणजे त्यांचा लघु-गुरु क्रम सारखा असतो. गण :- वृत्तांची लक्षणे ठरवताना पद्याच्या प्रत्येक चरणातील अक्षरांचे तीन तीन अक्षरांचे एकेक गट पाडून त्यांचा लघुगुरूक्रम मांडण्याच्या पध्दतीला 'गण' असे म्हणतात. यती :- पद्याच्या पंक्ती किंवा कवितेचे चरण वाचत असताना आपण मध्येच काही अक्षरांनंतर नैसर्गिक रीतीने थांबतो त्या क्रमांकाच्या अक्षरावर 'यती' आहे असे मानतात. यतिभंग :- वृत्ताच्या प्रकारानुसार काव्य पंक्तीमध्ये ज्या अक्षरावर यती येत असेल ते अक्षर जर शब्दाच्या मध्ये असेल तर वाचताना शब्द तोडला जात असेल तर 'यतिभंग' होतो. गण लेखनाची पध्दती १. काव्य पंक्तीतील अक्षरांचे तीन तीनचे प्रत्येकी एकेक गट पाडावे. उदाहरणार्थ सदा सर्वदा योग तूझा घडावा सदा स |...