पोस्ट्स

विषय राज्यशास्त्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच असे नाही. 2 काही लोक एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नाचा पाठपुरावा करतात. 3 त्याच्या निराकरणासाठी लोकांना संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात.   चळवळ म्हणजे काय   ? सातत्याने कृतिशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणण्याचे काम केले जाते. या सामूहिक कृतींना ‘चळवळ’ असे म्हणतात.   उदा. , प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते. चळवळीची वैशिष्ट्ये १ चळवळ ही एक सामूहिक कृती असते. त्यात अनेक लोकांचा सक्रिय सहभाग असतो. २ चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असते. ३ चळवळीसमोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू अथवा प्रश्न असतो. उदा. भ्रष्टाचारविरोधी चळवळीचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो. ४ चळवळीला नेतृत्व असते. नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. ५ चळवळींच्या संघटना असतात. त्या संघटना सातत्याने प्र...

निवडणूक प्रक्रिया इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

                                   २. निवडणूक प्रक्रिया निवडनुकांचे महत्त्व निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. १ भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. २. निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात . ३. निवडणुकांमुळे सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते. ४. वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते. ५. शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडतात व समाजजीवनही बदलते. निवडणुका सार्वत्रिक निवडणुका – दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. मध्यावधी निवडणुका – निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले, पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर निवडणुका घ्याव्या लागतात.   त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घेण्याची कारणे-     १ निवडून आलेले सरकार मुदत...