इय्यता १० वी इतिहास पुढील विधाने सकारण स्पष्ट करा
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : १ इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते . १ भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत होते . २ त्या मुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता . ३ स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते . ४ म्हणून इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने हाेणे आवश्यक होते . २. ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात ' पत्रकार दिन ' म्हणून साजरा केला जातो . १ मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘ दर्पण ’ हे पत्र १८३२ साली मुंबईत सुरू झाले . २ ‘ दर्पण ’ हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केले . ३ ‘ दर्पण ’ या पहिल्या मराठी वृत्त पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्यसंपादक म्हटले जाते . ४ ६ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘ पत्रकार दिन ’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला...