युरोपातील धर्मयुद्धे Crusades (क्रुसेडस्)
युरोपातील धर्मयुद्धे Crusades ( क्रुसेडस् ) : ‘ जेरुसलेम ’ आणि ‘ बेथेलहॅम ’ ही शहरे ज्यू , ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आहेत . अकराव्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती . ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे Crusades ( क्रुसेडस् ) म्हणतात . एकूण नऊ धर्मयुद्धे झाली . इ . स . १०९६ मध्ये पहिले धर्मयुद्ध झाले . दुसऱ्या धर्मयुद्धाच्या दरम्यान पोप युजिनिअस ( तिसरा ) याने फ्रेंच राजा सातवा लुई आणि जर्मन सत्ताधीश तिसरा कॉनरॅड यांना मदतीस घेतले . तुर्कांनी त्यांचा पराभव केला . इजिप्तचा प्रमुख सलादिन याने इ . स . ११८७ मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले . या धर्मयुद्धांचा शेवट झाला तरीही जेरूसलेम आणि त्याच्या परिसरातील प्रदेश हा इस्लामी सत्तांच्या ताब्यात राहिला होता. युरोपातील Crusades ( क्रुसेडस् ) धर्मयुद्धांना पाठिंबा : धर्मयुद्धांना सामान्य जनता , राजकीय सत्ताधीश आणि व्यापारी य...