पोस्ट्स

पुढील संकल्पना स्पष्ट करा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

इयत्ता १० वी, इतिहास, पुढील संकल्पना स्पष्ट करा

  पुढील संकल्पना स्पष्ट करा : १. द्वंद्ववाद १. जॉर्ज हेगेल यांनी द्वंद्ववाद पद्धतीचा सिद्धांत मांडला. २. कोणत्याही एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करावी लागते . त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही . या पद्धतीला ‘ द्वंद्ववाद ’ ( डायलेक्टिक्स्‌ ) असे म्हटले जाते . ३. या पद्धतीत प्रथम एक सिद्धान्त मांडला जातो . त्यानंतर त्या सिद्धान्ताला छेद देणारा प्रतिसिद्धान्त मांडला जातो . ४. या पद्धती मध्ये परस्पर विरोधी दोन सिद्धांत माडले जातात त्या दोन्ही सिद्धान्तांच्या तर्काधिष्ठित ऊहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धान्ताची समन्वयात्मक मांडणी केली जाते . ५. उदाहरणार्थ ; खरे - खोटे , चांगले - वाईट . २.  अॅनल्स प्रणाली १. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहासलेखनाची प्रणाली उदयाला आली . २. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी , राजे , महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण , मुत्सद्द...