पोस्ट्स

थोडक्यात टिपा लिहा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

इयत्ता १० वी इतिहास थोडक्यात टिपा लिहा

  थोडक्यात टिपा लिहा : १ कार्ल मार्क्स : १ एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स ने   त्याचा ‘ दास कॅपिटल ’ या जगप्रसिद्ध ग्रं थात वर्गसंघर्षाचा सिद्धान्त मांड ला . २ कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी साम्यवादी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली . ३ इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो . असे त्याचे मत होते . ४ मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो , अशी मांडणी त्याने केली . २ लिओपाॅल्ड व्हॅन रांके १ एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव होता . २ त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले . ३ मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे , यावर त्याने भर दिला . ४ इतिहासलेखनातील काल्पनिक...