Use 'too--to'/ Make `Simple Sentence`/ Remove 'so---that`
Use 'too--to' आज आपण 'too---to' चा अभ्यास करूया. परीक्षेत Use 'too--to'/Make `Simple Sentence`असे प्रश्न विचारतात. 'Too__To' म्हणजे काय? `Too` हे एक Adverb-क्रियाविशेषण आहे. `Too` चा अर्थ खूप, जास्त, वाजवी पेक्षा जास्त, आवश्यकते पेक्षा जास्त अशा अर्थाने केला जातो तसेच `to` या preposition चा वापर करुन वाक्यातील क्रियापदाची Infinitive करतात. `too—to` केव्हा वापरावे? जेव्हा दोन वाक्यांचा परस्परांशी संबंध कारण परिणामाचा असतो किंवा एखाद्या घटनेच्या परिणामा मागील जे कारण आहे ते सांगायचे असते तेव्हा `too—to` चा उपयोग केला जातो. दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी `too—to`चा वापर केला जातो. `too---to` चा वापर करुन Simple Sentence बनवले जाते. वाक्यात `too__to`कसे वापरावे? Use 'too--to' He was tired. He can not run fast. वरील दोन्ही वाक्य भिन्न आहेत पण त्यांचा सबंध एकमेकांना बरोबर कारण व परिणाम असा आहे आणि तो too__to वापर करून व्यक्त करायचा आहे. He was tired. या वाक्यात असलेल्या क्रियापदापूर्वी too चा वापर क्रियाविशेषण म्हणून करावा. त्याचा अर्थ वाजवी पेक्षा जा...