Statement of Purpose
Statement of Purpose writing skill Std. 12th Statement of Purpose चे महत्त्व तुमचे शिक्षण, गुण, आवड, ध्येय, अनुभव आणि विकास यांची वास्तव काल्पना देणारा दस्तएवज आहे. जेव्हा तुम्ही तुमची इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण कराल आणि पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठांना वैयक्तिक विधाने लिहाल तेव्हा तुम्हाला याप्रमाणे लिखाण करावे लागते. What is a Statement of Purpose? Statement of Purpose म्हणजे काय? Statement of Purpose (SOP) हा विशिष्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठी विद्यापीठात केलेला हा एक निबंध रुपी अर्ज आहे. जो तुमची एक व्यक्ती म्हणून उद्दिष्टे आणि महत्वाकांक्षा यांचे वर्णन करतो. तुम्ही प्राप्त केलेले शिक्षण यांची माहिती देतो. जीवनात तुम्ही संपादन केलेल्या गुणांची व स्वभावाची वास्तवदर्शी व खरी कल्पना देतो. तुमचे गुण इतरान पेक्षा कसे भिन्न आहेत हे सांगण्याची संधी उपलब्ध करून देतो. तुम्हाला काय आवडते तुम्ही तुमची आवड कशी विकसित केली आहे. तुम्ही निवडलेल्या कोर्स मागील तुमचे ध्येय काय आहे व त्यासाठी तुम्ही विशिष्ट विद्यापीठ का निवडले हे देखील स्पष्ट होते. तु...