भूगोल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भूगोल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ


पृथ्वीचे परिवलन:

पृथ्वीच्या परिवलनाची दिशा : 

     पश्चिमेकडून पूर्वेकडे

     सूर्योदय ज्या बाजूस होतो ती पूर्व दिशा.


पृथ्वीचा परिवलनाचा कालावधी :

     पृथ्वीला एक परिवलन (३६०अंश) पूर्ण करण्यासाठी सुमारे २४ तास लागतात, म्हणजे एक दिवसाचा कालावधी लागतो.

    पृथ्वी एका तासाला १५ अंश स्वत:भोवती फिरते.

    पृथ्वीला एका अंशात फिरण्यास ४ मिनिटे लागतात.

    प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ४ मिनिटांचा फरक पडतो.


पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम :

      सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र

    वेळ निश्चितीसाठी पृथ्वीवरील ध्रुव, रेखावृत्त आणि सूर्याचे स्थान यांचा विचार करावा लागतो.

     पृथ्वीवर, मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्वत्र सारखी असते.

     वेगवेगळ्या रेखावृत्तांवर सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त वेळा वेगवेगळ्या असतात. 


पृथ्वीच्या ध्रुवांवरील दिनमान :

     एका ध्रुववृत्तापासून ते दुसर्‍या  ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान २४ तासापेक्षा अधिक शकते.

     ध्रुवावर मात्र ६ महिन्यांपर्यंत दिनमान असते आणि ६ महिने रात्रमान असते.

     ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते

     ध्रुवावरती एका विषुवदिनाला सूर्योदय होतो तर पुढच्या विषुवदिनाला सूर्यास्त होतो.

      ध्रुवावरती सूर्य आकाशात विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने क्षितिजावर घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो.

     पृथ्वीवरील एखादया ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी मध्यान्ह झालेली असते.


पृथ्वीवरील वेळा :

Ante Meridiem - a. m. 

Post Meridiem - p. m. 

जागतिक प्रमाण वेळ, 

भारतीय प्रमाण वेळ, 

पृथ्वीवरील स्थानिक वेळ 


Ante Meridiem :

          मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे a.m. असे लिहितात. याचा अर्थ ante meridiem असा आहे.


Post Meridiem :

               मध्यान्हापासून ते मध्यरात्रीपर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे p.m. अशी दर्शवितात, म्हणजेच post meridiem होय.


जागतिक प्रमाण वेळ :

      जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ (०°रेखावृत्त) म्हणून इंग्लंडमधील ग्रीनीच येथील स्थानिक वेळ (GMT-Greenwich Mean Time) विचारात घेतली जाते. 


भारतीय प्रमाण वेळ : 

     भारताची प्रमाण वेळ ८२°३०' पूर्व या रेखावृत्तावरील स्थानिक वेळनुसार ठरवली जाते.

     ८२°३०' पूर्व हे रेखावृत्ता मिर्झापूर शहरावरून अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथून जाते.

     भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनीच येथील वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटांनी पुढे आहे.

     ग्रीनीच येथे संध्याकाळचे ५ वाजले असतील तर भारतात रात्रीचे १०.३० वाजलेले असतात.


पृथ्वीवरील स्थानिक वेळ :

     एखादया ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची स्थानिक वेळ होय.

     ८२°३० पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही.


National Institute of Standards and Technology (NIST) अमेरिका :

          या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले असून या घड्याळात वेळेची दुरुस्ती (वाढ किंवा घट) ही फक्त १ सेकंदाची करावी लागते; तीदेखील २० कोटी वर्षातून एकदा.


National Physical Laboratory, नवी दिल्ली :

      भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भातील सेवा पुरवणारी ही संस्था.

     या ठिकाणी वापरात असणाऱ्या घड्याळात वेळेतील अंतर हे सेकंदाच्या १ लाखापर्यंतचा भाग अचूकता राखते.


जंतर-मंतर : खगोलशास्त्रीय वेधशाळा

      राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (द्वितीय) यांनी अठराव्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या पाच ठिकाणी जंतर-मंतर खगोलीय वेधशाळा बांधले.

      राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (द्वितीय) हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते.

     जंतर-मंतरमध्ये केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीद्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते.

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

पृथ्वी व वृत्ते

 पृथ्वी व वृत्ते

या प्रकरणात अक्षवृत्त, विषुववृत्त, रेखावृत, कर्कवृत्त, मकरवृत्त, आर्क्टिक वृत्त व अंटार्क्टिक वृत्त यांचा अभ्यास करु.


पृथ्वीचा व्यास :

पूर्व - पश्चिम १२७५६ कि. मी.

उत्तर - दक्षिण १२७१४ कि. मी. 


अक्षवृत्ते :

            अक्षवृत्ते ध्रुवाकडे लहान होतात


अक्षवृत्ते संख्या :

           पृथ्वीवर प्रत्येकी 1 अंशाच्या अंतराने एकूण 181 अक्षवृत्ते येतात

उत्तरगोलार्धात

            1 अंश ते 90 अंश 90 अक्षवृत्ते

दक्षिणगोलार्धात 

             1 अंश ते 90 अंश 90 अक्षवृत्ते


अक्षवृत्तांचा उल्लेख :

उत्तरगोलार्धत :

        5 अंश उ., 15 अंश उ., 30 अंश उ., 50 अंश उ. 

दक्षिणगोलार्धत :

         5 अंश द., 15 अंश द., 30 अंश द., 50 अंश द. 


विषुववृत्त :

          विषुववृत्त हे 0 अंशाचे अक्षवृत्त मानतात, म्हणून त्याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात.

     विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

     विषुववृत्तने पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे समान भाग होतात

       उत्तरेकडील भाग उत्तरगोलार्ध व दक्षिणेकडील भाग दक्षिणगोलार्ध

उत्तरेकडील टोक उत्तर ध्रुव व दक्षिणेकडील टोक दक्षिण ध्रुव


इतर वृत्तांची ओळख :

कर्कवृत्त :

       विषुववृत्तापासून २३° ३०' उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त म्हणतात.


मकरवृत्त :

         विषुववृत्तापासून २३°३०' दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात.

             

आर्क्टिक वृत्त :

       विषुववृत्त ते ६६° ३०' उत्तर याला आर्क्टिक वृत्त असेही म्हणतात.


अंटार्क्टिक वृत्त :

        विषुववृत्त ते ६६° ३०' दक्षिण याला अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतात.


सूर्यकिरणे लंबरूप :

              विषुववृत्तापासून २३°३०' उत्तर तसेच २३° ३०' दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात.


दिन व रात्र २४ तासांच्या कालमर्यादा :

              विषुववृत्त ते ६६° ३०' उत्तर अक्षवृत्ते व विषुववृत्त ते ६६° ३०' दक्षिण अक्षवृत्ते यादरम्यान वर्षभरात २४ तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात.


दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी २४ तासांपेक्षा जास्त :

             ६६° ३०' उत्तर अक्षवृत्तांपासून ते ९०° उत्तर ध्रुवापर्यंत व दक्षिण व ६६° ३०' दक्षिण अक्षवृत्तांपासून ते ९०° दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी २४ तासांपेक्षा जास्त कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त ६ महिन्यांचा असू शकतो. 


तापमानांचे पट्टे (कटिबंध) :

         सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यांनुसार पृथ्वीवर विविध तापमानांचे पट्टे (कटिबंध) तयार होतात. 

          तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाबपट्टे निर्माण होतात.


रेखावृत्ते :

      एक रेखावृत्त 0 अंश मानले जाते.

      0 अंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात.

      0° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त (Prime Meredian) म्हणून महत्त्वाचे आहे. 

      0° रेखावृत्त हे 'ग्रिनिचचे रेखावृत्त' म्हणूनही ओळखले जाते. 

            (G.M. T= Greenwich Mean Time)  

      कोनीय अंतर हे रेखांकन म्हणातात.

      रेखावृत्ते आकाराने सारखीच असतात.


रेखावृत्तांची संख्या :

          0 अंश ते 180 अंश पूर्व गोलार्ध व 0 अंश ते 180 अंश पश्चिम गोलार्ध एकूण 360 रेखावृत्ते. 

         प्रत्येकी 1 अंश च्या अंतराने 360 रेखावृत्ते.

पूर्व गोलार्धात : 179 रेखावृत्त 

           1अंश पूर्व ते 179 अंश पूर्व 

पश्चिम गोलार्धात : 179 रेखावृत्त

          1अंश पश्चिम ते 179 अंश पश्चिम


रेखावृत्तांची मूल्ये :

पूर्व गोलार्धात :

        10अंश पूर्व, 25अंश पूर्व, 135अंश पूर्व

पश्चिम गोलार्धात :

        10अंश पश्चिम, 25अंश पश्चिम, 135अंश पश्चिम 


कोणत्याही दोन रेखावृत्तां दरम्यानचे अंतर हे अक्षवृत्ताप्रमाणे बदलते :

        विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते तर ध्रुवावर हे अंतर शून्य असते.

      विषुववृत्तावर हे अंतर 111 कि.मी. असते. 

   कर्कवृत्त व मकरवृत्तांवर हे अंतर 102 कि.मी. असते

        आर्क्टिक व अंटार्क्टिक वृत्तांवर हे अंतर 44 कि.मी. असते

     उत्तर व दक्षिण ध्रुवांवर हे अंतर 0 कि.मी. असते.


पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतात.

१८० अंश रेखावृत्ताच्या संदर्भाने 'आंतरराष्ट्रीय वाररेषा' विचारात घेतली जाते.

 एकमेकांसमोरील दोन रेखावृत्ते मिळून बृहतवृत्त तयार होते. 


भौगोलिक माहिती प्रणाली :

 (G.I.S.= Geographical Information System)

जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली :

(G.P.S.= Global Positioning System)

'ग्रिनिचचे रेखावृत्त' :

(G.M. T= Greenwich Mean Time)

इंटरनेटवरील गुगल मॅप विकीमॅपिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमध्येही अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. 


शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

पृथ्वीचे अंतरंग

              पृथ्वीचे अंतरंग 

 पृथ्वीची निर्मिती : सुमारे ४६० कोटी वर्षापूर्वी.


पृथ्वीचे तापमान : केंद्रस्थानी सुमारे ५५००° से. ते ६०००° से. तापमान.


       पृथ्वीच्या अवस्था : प्रारंभिक अवस्था वायुरूप, द्रवरूप अवस्था आणि घनरूप अवस्था

     

 पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग :

         1. भूकवच,  2. प्रावरण, 3. गाभा


1 भूकवच  

       1 खंडीय कवच 2 महासागरीय कवच


2 प्रावरण

                 1 उच्च प्रावरण  2 निम्न प्रावरण


3 गाभा 

                  1 बाह्यगाभा  2 अंतरगाभा



1 भूकवच

पृथ्वीचा सर्वांत वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो.

       स्वरुप : घनरूप

       जाडी :  सरासरी  ३० ते ३५ कि.मी. मानतात. 

       खंडा खाली : १६ ते ४५ किमीच्या दरम्यान.

       पर्वत श्रेणी खाली:  ४० किमीपेक्षा जास्त.

सागर पृष्ठाखाली :१० किमीपेक्षा कमी.


भूकवचाचे उपविभाग

          1 खंडीय कवच,  2 महासागरीय कवच 


1. खंडीय कवच : 

     मूलद्रव्य : सिलिका व अॅल्युमिनिअम यांनी बनलेले म्हणून पूर्वी सियाल म्हणत 

     घनता : २.६५ ते २.९० ग्रॅम/ घ.से.मी. इतकी 

     जाडी : सरासरी सुमारे ३० कि.मी. 

     खडक : ग्रॅनाईट


2. महासागरीय कवच :

      संयुगे : सिलिका व मॅग्नेशिअम यानी बनलेले म्हणून पूर्वी सायमा म्हणत.

     जाडी : सरासरी जाडी ७ ते १० कि.मी.

     घनता : २.९ ग्रॅम/घसेमी ते ३.३ ग्रॅम/घ.से.मी.

    खडक : बेसॉल्ट व गॅब्रो


पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमधील मूलद्रव्ये :

सिलिका (Si), अॅल्युमिनिअम (Al), सिलिका (Si), मॅग्नेशिअम (Mg), निकेल (Ni), आयर्न (Fe), 


विलगता : 

1. कॉनरॅड विलगता, 2. मोहो विलगता, 3. गटेनबर्ग विलगता

 

1. कॉनरॅड विलगता :

    शास्त्रज्ञ:  कॉनरॅड - म्हणून कॉनरॅड विलगता हे नाव

    शोध : खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे.


2. मोहो विलगता :

   शास्त्रज्ञ : मोहोरोव्हिसिक -म्हणून मोहो विलगता हे नाव 

   शोध : भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे.


3. गटेनबर्ग विलगता :

    शास्त्रज्ञ : गटेनबर्ग- गटेनबर्ग विलगता हे नाव 

    शोध : प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे.


प्रावरण :

भूकवचाखालील प्रावरणाचे थर

प्रावरणाचे उपविभाग : 1 उच्च प्रावरण व 2 निम्न प्रावरण 


1. उच्च प्रावरण : दुर्बलावरण असेही म्हणतात. 

          खोली: भूपृष्ठापासून सुमारे ४२ किमी खोलीनंतर प्रावरणाची खोली २८७० कि.मी. असावी अंदाज 

          घनता: सरासरी ४.५ ग्रॅम/घ.से.मी. असून खोलीनुसार वाढते

         तपमान : २४०० ते २९०० कि.मी. खोलीवर तापमान २२००° से. ते २५००° से. पर्यंत 

         प्रावरणातील अंतर्गत शक्तीच्या हालचालींतून भूपृष्ठावर पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती ज्वालामुखी, भूकंप या प्रक्रिया घडतात.


 2. निम्न प्रावरण

 घनता ५.७ ग्रॅम/घसेमी आहे. 


        गाभा :

    प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय.

       खोली : भूपृष्ठापासून सुमारे २९०० कि.मी. खोलीच्या खाली 'गाभ्याचा भाग'

जाडी: ३४७१ कि.मी.

 गाभ्याचे भाग : 1. बाह्यगाभा 2. अंतर्गाभा


1. बाह्यगाभा :

खोली : भूपृष्ठापासून सुमारे २९०० किमी ते ५१०० कि.मी. खोलीपर्यंत

        घनता :  ९.८ ग्रॅम / घ.से.मी.

       तपमान : द्रवरूप बाह्य गाभ्याचे सुमारे ५०००° से.

        स्वरुप : बाह्यगाभा हा द्रवरूप पदार्थाचा  

खनिज : लोह खनिज अधिक प्रमाण

प्रवाह :  द्रवरूप भागात ऊध्वरगामी प्रवाह


भू-जनित्र  :

            पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त झाल्याने भोवऱ्यांमध्ये विदयुत प्रवाह निर्माण होऊन त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भू-जनित्र असेही संबोधले जाते. 


चुंबकावरण :

पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण. 


पृथ्वीचे पाचवे व महत्त्वाचे आवरण :

पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असल्याने त्या भू-चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती निर्माण झालेल्या आवरणामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होते.

 

  अंतर्गाभा :

       खोली: भूपृष्ठाखाली सुमारे ५१५० कि. मी. पासून ६३७१ कि. मी. खोलीपर्यंत (पृथ्वीच्या केंद्रापर्यंत)

      घनता : सुमारे १३.३ ग्रॅम/घन इतकी 

     तापमान : साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमानाइतके

स्वरुप : घनरूप प्रचंड दाबाखाली

        मूलद्रव्ये : लोह व निकेल त्यामुळे त्यास निफे असेही म्हणत असत.

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...