स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

पृथ्वीचे परिवलन:

पृथ्वीच्या परिवलनाची दिशा :

Ø  पश्चिमेकडून पूर्वेकडे

Ø  सूर्योदय ज्या बाजूस होतो ती पूर्व दिशा.

 

पृथ्वीचा परिवलनाचा कालावधी :

Ø  पृथ्वीला एक परिवलन (३६०अंश) पूर्ण करण्यासाठी सुमारे २४ तास लागतात, म्हणजे एक दिवसाचा कालावधी लागतो.

Ø  पृथ्वी एका तासाला १५ अंश स्वत:भोवती फिरते.

Ø  पृथ्वीला एका अंशात फिरण्यास ४ मिनिटे लागतात.

Ø  प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ४ मिनिटांचा फरक पडतो.

 

पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम :

      सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र

Ø  वेळ निश्चितीसाठी पृथ्वीवरील ध्रुव, रेखावृत्त आणि सूर्याचे स्थान यांचा विचार करावा लागतो.

Ø  पृथ्वीवर, मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्वत्र सारखी असते.

Ø  वेगवेगळ्या रेखावृत्तांवर सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त वेळा वेगवेगळ्या असतात.

 

पृथ्वीच्या ध्रुवांवरील दिनमान :

Ø  एका ध्रुववृत्तापासून ते दुसर्‍या  ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान २४ तासापेक्षा अधिक शकते.

Ø  ध्रुवावर मात्र ६ महिन्यांपर्यंत दिनमान असते आणि ६ महिने रात्रमान असते.

Ø  ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते

Ø  ध्रुवावरती एका विषुवदिनाला सूर्योदय होतो तर पुढच्या विषुवदिनाला सूर्यास्त होतो.

Ø   ध्रुवावरती सूर्य आकाशात विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने क्षितिजावर घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो.

Ø  पृथ्वीवरील एखादया ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ठिकाणी मध्यान्ह झालेली असते.

 

पृथ्वीवरील वेळा :

          Ante Meridiem, Post Meridiem, जागतिक प्रमाण वेळ, भारतीय प्रमाण वेळ, पृथ्वीवरील स्थानिक वेळ

 

Ante Meridiem :

          मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे a.m. असे लिहितात. याचा अर्थ ante meridiem असा आहे.

 

Post Meridiem :

               मध्यान्हापासून ते मध्यरात्रीपर्यंतची वेळ इंग्रजीत सांगताना अंकापुढे p.m. अशी दर्शवितात, म्हणजेच post meridiem होय.

 

जागतिक प्रमाण वेळ :

Ø  'जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ (०°रेखावृत्त) म्हणून इंग्लंडमधील ग्रीनीच येथील स्थानिक वेळ (GMT-Greenwich Mean Time) विचारात घेतली जाते.

 

भारतीय प्रमाण वेळ :

Ø  भारताची प्रमाण वेळ ८२°३०' पूर्व या रेखावृत्तावरील स्थानिक वेळनुसार ठरवली जाते.

Ø  ८२°३०' पूर्व हे रेखावृत्ता मिर्झापूर शहरावरून अलाहाबाद, उत्तर प्रदेश येथून जाते.

Ø  भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनीच येथील वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटांनी पुढे आहे.

ग्रीनीच येथे संध्याकाळचे ५ वाजले असतील तर भारतात रात्रीचे १०.३० वाजलेले असतात.

 

पृथ्वीवरील स्थानिक वेळ :

Ø  एखादया ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची स्थानिक वेळ होय.

Ø  ८२°३० पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही.

 

 

National Institute of Standards and Technology (NIST) अमेरिका :

             या संस्थेने अचूक वेळ दर्शवणारे घड्याळ विकसित केले असून या घड्याळात वेळेची दुरुस्ती (वाढ किंवा घट) ही फक्त १ सेकंदाची करावी लागते; तीदेखील २० कोटी वर्षातून एकदा.

 

National Physical Laboratory, नवी दिल्ली :

Ø  भारतातील वेळेच्या अचूकते संदर्भातील सेवा पुरवणारी ही संस्था.

Ø  या ठिकाणी वापरात असणाऱ्या घड्याळात वेळेतील अंतर हे सेकंदाच्या १ लाखापर्यंतचा भाग अचूकता राखते.

 

जंतर-मंतर : खगोलशास्त्रीय वेधशाळा

Ø   राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (द्वितीय) यांनी अठराव्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या पाच ठिकाणी जंतर-मंतर खगोलीय वेधशाळा बांधले.

Ø   राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (द्वितीय) हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते.

Ø   जंतर-मंतरमध्ये केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीद्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते.

 

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ — MCQ प्रश्न

१. पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कोणती आहे?

A) पूर्वेकडून पश्चिमेकडे

B) पश्चिमेकडून पूर्वेकडे

C) उत्तरेकडून दक्षिणेकडे

D) दक्षिणेकडून उत्तरेकडे

उत्तर: B) पश्चिमेकडून पूर्वेकडे

 

२. सूर्योदय कोणत्या दिशेला होतो?

A) पश्चिम

B) उत्तर

C) पूर्व

D) दक्षिण

उत्तर: C) पूर्व

 

३. पृथ्वीला ३६०° परिवलन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो?

A) १२ तास

B) १८ तास

C) २४ तास

D) ४८ तास

उत्तर: C) २४ तास

 

४. पृथ्वी एका तासात स्वतःभोवती किती अंश फिरते?

A) १०°

B) १५°

C) २०°

D) २४°

उत्तर: B) १५°

 

५. पृथ्वीला एका अंशाने फिरण्यास किती वेळ लागतो?

A) २ मिनिटे

B) ३ मिनिटे

C) ४ मिनिटे

D) ५ मिनिटे

उत्तर: C) ४ मिनिटे

 

६. प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती फरक पडतो?

A) २ मिनिटे

B) ४ मिनिटे

C) १० मिनिटे

D) १५ मिनिटे

उत्तर: B) ४ मिनिटे

 

७. पृथ्वीच्या परिवलनामुळे खालीलपैकी कोणती घटना घडते?

A) ऋतू बदल

B) दिवस-रात्र

C) भूकंप

D) भरती-ओहोटी

उत्तर: B) दिवस-रात्र

 

८. पृथ्वीवरील वेगवेगळ्या रेखावृत्तांवर कोणत्या वेळा वेगवेगळ्या असतात?

A) फक्त सूर्योदय

B) फक्त सूर्यास्त

C) सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त

D) फक्त मध्यरात्र

उत्तर: C) सूर्योदय, मध्यान्ह व सूर्यास्त

 

९. एखाद्या ठिकाणी सूर्य डोक्यावर येतो तेव्हा कोणती वेळ झालेली असते?

A) मध्यरात्र

B) मध्यान्ह

C) सूर्योदय

D) सूर्यास्त

उत्तर: B) मध्यान्ह

 

१०. ध्रुवावर साधारण किती काळ दिनमान असते?

A) ३ महिने

B) ४ महिने

C) ६ महिने

D) ९ महिने

उत्तर: C) ६ महिने

 

११. ध्रुवावर साधारण किती काळ रात्रमान असते?

A) ३ महिने

B) ६ महिने

C) ९ महिने

D) १२ महिने

उत्तर: B) ६ महिने

 

१२. मध्यरात्रीपासून मध्यान्हापर्यंतच्या वेळेसाठी कोणता शब्द वापरतात?

A) P.M.

B) A.M.

C) G.M.T.

D) I.S.T.

उत्तर: B) A.M.

 

१३. Ante Meridiem म्हणजे काय?

A) मध्यान्हानंतर

B) मध्यरात्रीनंतर

C) मध्यान्हापूर्वी

D) सूर्यास्तानंतर

उत्तर: C) मध्यान्हापूर्वी

 

१४. Post Meridiem म्हणजे काय?

A) मध्यान्हापूर्वी

B) मध्यान्हानंतर

C) मध्यरात्रीपूर्वी

D) सूर्योदयापूर्वी

उत्तर: B) मध्यान्हानंतर

 

१५. जागतिक प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर आधारित आहे?

A) ०°

B) २३°३०'

C) ८२°३०'

D) ९०°

उत्तर: A) ०°

 

१६. ०° रेखावृत्ताला कोणत्या नावाने ओळखले जाते?

A) कर्कवृत्त

B) मकरवृत्त

C) ग्रीनविच रेखावृत्त

D) विषुववृत्त

उत्तर: C) ग्रीनविच रेखावृत्त

 

१७. भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावर आधारित आहे?

A) ०° पूर्व

B) ७५° पूर्व

C) ८२°३०' पूर्व

D) ९०° पूर्व

उत्तर: C) ८२°३०' पूर्व

 

१८. भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेपेक्षा किती पुढे आहे?

A) ४ तास ३० मिनिटे

B) ५ तास

C) ५ तास ३० मिनिटे

D) ६ तास

उत्तर: C) ५ तास ३० मिनिटे

 

१९. ग्रीनविच येथे संध्याकाळी ५ वाजले असतील, तर भारतात किती वाजतील?

A) रात्री ९:३०

B) रात्री १०:००

C) रात्री १०:३०

D) रात्री ११:३०

उत्तर: C) रात्री १०:३०

 

२०. एखाद्या ठिकाणी सूर्याच्या स्थानावरून ठरवलेली वेळ म्हणजे काय?

A) प्रमाण वेळ

B) स्थानिक वेळ

C) जागतिक वेळ

D) प्रमाण रेखावृत्ताची वेळ

उत्तर: B) स्थानिक वेळ

 

२१. भारतीय प्रमाण वेळेचे प्रमाण रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जाते?

A) मुंबई

B) पुणे

C) मिर्झापूर

D) जयपूर

उत्तर: C) मिर्झापूर

 

२२. भारतातील वेळेच्या अचूकतेसंदर्भातील सेवा कोणती संस्था पुरवते?

A) NIST

B) National Physical Laboratory, नवी दिल्ली

C) ISRO

D) NASA

उत्तर: B) National Physical Laboratory, नवी दिल्ली

 

२३. NIST ही संस्था कोणत्या देशात आहे?

A) भारत

B) इंग्लंड

C) अमेरिका

D) जपान

उत्तर: C) अमेरिका

 

२४. जंतर-मंतर या खगोलीय वेधशाळा कोणी बांधल्या?

A) अकबर

B) महाराजा सवाई जयसिंह द्वितीय

C) शाहजहान

D) टिपू सुलतान

उत्तर: B) महाराजा सवाई जयसिंह द्वितीय

 

२५. महाराजा सवाई जयसिंह द्वितीय हे कोण होते?

A) केवळ राजे

B) खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद

C) केवळ गणितज्ञ

D) केवळ वास्तुविशारद

उत्तर: B) खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद

 

२६. जंतर-मंतरमध्ये वेळ मोजण्यासाठी मुख्यतः कशाचा उपयोग केला जातो?

A) पाण्याचा प्रवाह

B) वाऱ्याचा वेग

C) सूर्याच्या प्रकाशामुळे पडणारी सावली

D) तारकांची संख्या

उत्तर: C) सूर्याच्या प्रकाशामुळे पडणारी सावली

 

२७. जंतर-मंतर कोणत्या शतकात बांधण्यात आले?

A) सोळावे

B) सतरावे

C) अठरावे

D) एकोणिसावे

उत्तर: C) अठरावे

 

२८. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंतर-मंतर बांधण्यात आलेले नाही?

A) जयपूर

B) दिल्ली

C) वाराणसी

D) मुंबई

उत्तर: D) मुंबई


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

निवडणूक प्रक्रिया इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

राजकीय पक्ष इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र