रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

प्राचीन भारतीय इतिहास : वैदिक संस्कृती

                वैदिक संस्कृती 

१. वैदिक वाङ्मय, 

२. कुटुंबव्यवस्था व जीवन

३. व्यवसाय, आर्थिक आणि सामाजिक जीवन,

४. धर्मकल्पना, 

५. शासनव्यवस्था


१ वैदिक वाङ्मय

     ''वेद' वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय.

      वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. 

     ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत.

     वेदांच्या ग्रंथांना 'संहिता' असे म्हणतात.

    'वेद' ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ 'ज्ञान' असा वेदांना 'श्रुति' असेही म्हणतात.


१. ऋग्वेद संहिता : 

       ऋग्वेद हा मूळ वेद मानला जातो.

       ऋचांनी बनलेला वेद म्हणजे 'ऋग्वेद' होय. 

       'ऋचा' म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पदय.

       ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत.


२. यजुर्वेद संहिता : 

          यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटल्या जाणार्‍या पद्यात असलेल्या मंत्रांचे गद्यात स्पष्टीकरण व मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन कले आहे.


३. सामवेद संहिता : 

          यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन तालासुरांत कसे करावे हे सांगितले आहे. भारतीय संगीताच्या पाया सामवेदात आहे.


४. अथर्ववेद संहिता : 

           अथर्व ऋषींच्या नावा वरून अथर्ववेदाच्या संहितेला  नाव देण्यात आले आहे. यामध्ये खालील गोष्टींचेही मार्गदर्शन केलेले आहे.

        दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी, 

       आयुष्यातील संकटांवर, दुखण्यांवर उपाय, 

       अनेक औषधी वनस्पतींची माहिती, 

        राजाने राज्य कसे करावे, 


संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांचाही समावेश वेदवाङ्मयात केला जातो.

ब्राह्मण ग्रंथ :

          यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा, हे 'ब्राह्मणग्रंथ' सांगतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मणग्रंथ आहेत.

आरण्यके : 

           अरण्यात जाऊन, एकाग्र चित्ताने केलेले चिंतन 'आरण्यक' ग्रंथांमध्ये मांडलेले आहे. 

उपनिषदे : 

           'उपनिषद्' म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान. 

जन्म-मृत्यूसारख्या घटनांबद्दल मनात असलेल्या अनेक गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे.

'स्मृति' व 'पुराण' नावाचे वाङ्मय निर्माण झाले. 


'हिंदू' : 

वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने 'हिंदू' या नावाने ओळखला जाऊ लागला. 


२ कुटुंबव्यवस्था व जीवन

            वेदकाळात एकत्र कुटुंबपद्धती ही कुटुंबव्यवस्था पुरुषप्रधान होती.

            कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे 'गृहपती' असे.  

            स्त्रियांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान दुय्यम होत गेले.


घरे :

       वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. घरासाठी 'गृह' किंवा 'शाला' हे शब्द वापरले जात.


आहार :

तृणधान्य : गहू, सातू, तांदूळ या  समावेश होता. 

         वैदिक वाङ्मयात ''यव' म्हणजे सातू (बार्ली), 'गोधूम' म्हणजे गहू, 'व्रीही' म्हणजे तांदूळ यांसारखे शब्द आढळतात.

         दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ तसेच उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही आहारात समावेश.


वस्त्र :

       वेदकालीन लोक लोकरी आणि सुती व वापरत, 

      'विल्कले' म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रे,

       प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र. 


अलंकार :

         स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत, "निष्क' नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय.


मनोरंजनाची साधने:

           गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, स्थांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. 

वाद्य : 

      वीणा, शततंतू, झांजा आणि शंख, डमरू आणि मृदंग ही त्यांची प्रमुख वाद्य. 


३. व्यवसाय

शेती :

वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. 

अनेक बैल जुंपन नांगरनी केली जाई. 

खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. 


पशुपालन :

       वैदिक काळात घोडा, गाय-बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते.

     गाय: गाईंचा उपयोग विनिमयासाठी केला जाई. त्यामुळे गाईंना विशेष किंमत होती.

      घोडा :  घोड्याला माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते, अत्यंत वेगाने पळणारा प्राणी.

      रथ : घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे रथ खूप वेगवान होते. 


श्रेणी

       व्यावसायिक, कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक 'श्रेणी' या नावाने ओळखले जाई त्यांचे स्वतंत्र संघ होते. 

श्रेष्ठी : श्रेणींच्या प्रमुखाला 'श्रेष्ठी म्हणत असत. 


वर्ण व्यवस्था : 

          समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. 

         वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या, 


चार आश्रम : 

       जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम' चार आश्रम' असे म्हटलेले आहे. 

१. पहिला टप्पा 'ब्रह्मचर्याश्रम' :

        गुरूजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ.

२. दुसरा टप्पा 'गृहस्थाश्रम' :

        पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी कर्तव्ये पत्नीच्या साहाय्याने पार पाडावीत.

३. तिसरा टप्पा 'वानप्रस्थाश्रम' :

        घरादाराचा मोहाचा त्याग करून, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी अत्यंत साधेपणाने जगावे.

४. चौथा टप्पा 'संन्यासाश्रम':

         मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्यजन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये.


४. धर्मकल्पना :

          सुर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नदया यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले.

हवी : देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करणे म्हणजे 'हवी'.

यज्ञ : अग्नीमध्ये 'हवी' अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ.

सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे रुप बदलून पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण झाले त्यामुळे कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व वाढले.


५. शासनव्यवस्था :

ग्रामणी : प्रत्येक ग्रामवसाहतीचा प्रमुख म्हणजे 'ग्रामीण'.

 विश् : ग्रमावसाहतींचा समूह म्हणजे 'विश्'.

विश्पति : विश् च्या प्रमुखाला 'विश्पति' असे म्हणत. 

जन : अनेक 'विशु' मिळून 'जन' तयार होत असे.

जनपद :

       'जन' जेव्हा एखादया विशिष्ट प्रदेशात स्थिरावले, तेव्हा त्या प्रदेशाला ‘जनपद' म्हटले.

नृप' किंवा 'राजा' :

       'जन' च्या प्रमुखाला 'नृप' किंवा 'राजा' म्हटले जाई.

राजाची कर्तव्ये :

प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करण, उत्तम राज्यकारभार करणे . 

     राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास साहाय्य करण्यासाठी विशेष महत्त्वाचे अधिकारी होते आणि  'राजाला मार्गदर्शन करण्यासाठी चार संस्था होत्या. 

 विशेष महत्त्वाचे अधिकारी : 

     पुरोहित, सेनापती आणि भागदुघ

भागदुघ:

           करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला 'भागदुघ' असे म्हणत.

 राजाला मार्गदर्शन करणार्या संस्था : 

        'सभा', 'समिती', 'विदथ' आणि 'जन'

        'सभा' आणि 'विदथ' या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे.

 सभा :

         राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास 'सभा' म्हणत

समिती :

          लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस 'समिती' असे म्हणत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...