पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Verb - क्रियापद

Part of Speech - Verb क्रियापद क्रियापदाचे प्रमुख दोन प्रकार 1) Transitive Verbs सकर्मक क्रियापदे 2) Intransitive Verbs अकर्मक क्रियापदे Incomplete verbs अपूर्ण क्रियापदे Participle / Verbal Adjective धातुसाधित  Auxiliary Verbs/Helping Verbs Gerund कृदंन्त Infinitive Verb क्रियापद       वाक्यातील क्रियादर्शक (कृती समजून सांगणारा शब्द) शब्द म्हणजे Verb क्रियापद होय.        क्रियापद शब्द प्रकारांचा उपयोग करून आपण करत असलेल्या क्रिया व्यक्त करतो. (कृती, अस्तित्व किंवा स्थिती, मालकी किंवा स्वामित्व, इच्छा हुकूम, भावना)        क्रियापद हा वाक्यातील अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. क्रियापदाने कृती समजते म्हणूनच कोणतेही वाक्य क्रियापदाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.       क्रियापदावरूनच वाक्याचा काळ समजतो, क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो.        क्रियापदावरूनच वाक्याचा प्रकार समजतो, वाक्यातील क्रिया होकारार्थी की नकारार्थी याचा बोध होतो. क्रियापदाचे प्रमुख दोन प्रकार 1) Transitive Verbs सकर्मक क्रियापदे 2) In...

मराठी 'शब्दसिद्धी'

     मराठी व्याकरण : शब्दसिद्धी भाषेतल्या शब्दाचे वर्गीकरण दोन प्रकारे करता येते. (१) सिद्ध शब्द - (अ) तत्सम (आ) तद्भव (इ) देशी (ई) परभाषीय (२) साधित शब्द -  (अ) उपसर्गघटित शब्द (आ) प्रत्ययघटित शब्द (इ) सामासिक शब्द (ई) अभ्यस्त शब्द          शब्दसिद्धी म्हणजे मराठी भाषेमध्ये असलेल्या शब्दांच्या उगमाचा शोध घेणे होय. शब्दसिद्धी म्हणजे        भाषेत आलेले शब्द कशा प्रकारे निर्माण झाले?        कोणत्या मूळ भाषेतून आले?     कोणत्या शब्दात बदल करून आपण नवीन शब्द घडवला ? (१) सिद्ध शब्द (अ) तत्सम शब्द -  (संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आलेले शब्द).         संस्कृत भाषेतले असून जसेच्या तसे म्हणजे शब्दांच्या रूपात काही फरक न होता मराठी भाषेत आलेले शब्द.  उदा. कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, सत्कार, समर्थन, उत्सव पुष्प, जल, प्रीति, भीति, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्वान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामति, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, ओठ, अग्नि, नदी, कमल इ. ...

समास

 मराठी व्याकरण  समास व समासाचे उपप्रकार  सामासिक शब्दांतील दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे, यावरून समासाचे चार प्रकार पडतात.            समासाचे नाव    -  पद प्राधान्य (१) अव्ययीभाव समास - पहिले पद प्रधान (२) तत्पुरुष समास - दुसरे पद प्रधान (३) द्वंद्व समास - दोन्ही पदे प्रधान (४) बहुव्रीही समास - दोन्ही पदांतून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. (१) अव्ययीभाव समास (२) तत्पुरुष समास      (अ) विभक्ती तत्पुरुष समास      (आ) अलुक तत्पुरुष समास,श      (इ) उपपद तत्पुरुष समास      (ई) नञतत्पुरुष समास      (उ) कर्मधारय समास      (ऊ) द्विगू समास     (ए) मध्यमपदलोपी समास (३) द्वंद्व समास       (अ) इतरेतर  द्वंद्व      (आ) वैकल्पिक द्वंद्व       (इ) समाहार द्वंद्व (४) बहुव्रीही समास       (अ) विभक्तिबहुव्रीही       (आ) नञबहुव्रीही समास       (इ)सहब...

संधी - स्वरसंधी

 मराठी व्याकरण  संधी - स्वरसंधी पूर्वज्ञान :            संधींचा अभ्यास करताना मराठीतील वर्णमालेतील स्वर व व्यंजन यांची ओळख असणे आवश्यक आहे. संधी संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. अशा दोन वर्णांच्या एकमेकांमध्ये एकत्र मिसळण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात. संधींचे प्रकार स्वरसंधी :- स्वर + स्वर             एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वराने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात. उदा. कवि + ईश्वर = (इ + ई = ई) = कवीश्वर. व्यंजनसंधी :-  व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर          एकमेकांशेजारी येणाऱ्या या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात.  उदा.  सत् + जन = (तू + ज्) = सज्जन, चित् + आनंद = (त् + आ) = चिदानंद विसर्गसंधी विसर्ग व्यंजन किंवा विसर्ग + स्वर        ...

संधी - विसर्गसंधी

 मराठी व्याकरण   संधी - विसर्गसंधी          'विसर्ग' हा स्वतंत्र स्वर नसून तो 'स्वरादी' आहे त्यामुळे कोणत्या तरी स्वरानंतर तो येतो.            विसर्गसंधी मध्ये एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्गसंधी असे म्हणतात. प्रकार व नियम  (१) विसर्ग उकार संधी पोटशब्द एकत्र येणारे स्वर, विसर्ग व संधी शब्दांमध्ये, शेवटी विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर आला असता (अविसर्ग = अः) दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मृदू व्यंजन आला त्यामुळे विसर्गाचा 'उ' झाला  व तो मागील 'अ' मध्ये मिसळून. (अ+उ =ओ) त्याचा 'ओ' स्वर होऊन तो त्यातील व्यंजनामध्ये मिसळतो. उदा.  पोट शब्द               संधी                   जोडशब्द १) यश: + धन =     श + अ + : + धन + श् + ओ + धन = यशोधन २) मनः+रंजन =    न् + अ + : + रंजन = न् + ओ + रजन = मनोरंजन ३) अधः वंदन =   ध् + अ + : +...