पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१८५७ चा संघर्ष

१८५७ चा संघर्ष  लॉर्ड डलहौसीच्या प्रयाणानंतर १८५७ मध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध महान संघर्ष झाला. या संघर्षामुळे भारताच्या इतिहासाला नवीन वळण मिळाले. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन भारताचा कारभार ब्रिटिश सरकारच्या हाती गेला. १८५७ च्या संघर्षात राष्ट्रीय संघटना, सक्षम राष्ट्रीय नेतृत्व आणि सर्वसामान्य लोकांचा पूर्ण सहभाग यांचा अभाव होता. तरीही बिहार, संयुक्त प्रांत इत्यादी भागांत जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे काही ठिकाणी या संघर्षाला राष्ट्रीय युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले. ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांमुळे भारतीयांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचा झालेला उद्रेक म्हणजेच १८५७ चा संघर्ष होय. १८५७ च्या संघर्षाची कारणे १८५७ चा संघर्ष अचानक घडला नाही; दीर्घकाळ साचलेल्या असंतोषाला तात्कालिक कारणामुळे स्फोटक रूप मिळाले. त्याची प्रमुख कारणे राजकीय, धार्मिक-सामाजिक, शासकीय-आर्थिक आणि लष्करी अशी होती. १. १८५७ चा संघर्ष - राजकीय कारणे : लॉर्ड डलहौसीच्या विलिनीकरण व खालसा धोरणामुळे भारतीय राजे व जनता नाराज झाली. सातारा, नागपूर आणि अवध यांसारखी राज्ये ब्रिटिशांनी खालसा केली. मोगल ब...