PRESENT TENSE लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
PRESENT TENSE लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ जुलै, २०२१

PRESENT TENSE

                     TENSE काळ

वाक्य प्रकार कोणत्याही असला तरी काळाची ओळख क्रियापदावरुन होते.

In any type sentence, the tense is identified by the verb.

 

PRESENT TENSE वर्तमान काळ

Present Tense वर्तमान काळाचे चार प्रकार आहेत

1. Simple Present Tense साधा वर्तमानकाळ

2. Present Continuous / Progressive Tense - अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ

3. Present Perfect Tense पूर्ण वर्तमान काळ

4. Present Perfect Continuous Tense पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ

 Present Tense वर्तमान काळातील चारही काळांचा सविस्तर अभ्यास करू या.

 

1. SIMPLE PRESENT TENSE साधा वर्तमानकाळ

      या काळाला Present Indefinite असेही म्हणतात

 

 क्रियापदाचे स्वरूप - Verb Present Tense Verb-s/es

            कर्तानंतर क्रियापदाचे मूळ रूप लिहिले म्हणजे हा काळ होत असतो. क्रियापदाचे मूळ रुप म्हणजे वर्तमान काळातील रूप तसेच पहिले रूप.

Examples:

1. I sing song.               

2. She gives pen.      

3. They play cricket.

            मात्र Simple Present Tense मध्येच  कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी (He, She, It, the boy, the girl) असेल, तरच क्रियापदाला s किंवा es हे प्रत्यय लागते. लक्षात ठेवा 

            Simple Present Tense मध्ये कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असतो तेव्हाच क्रियापदाला s किंवा es हे प्रत्यय लागते. इतर कोणत्याही काळात s किंवा es हे प्रत्यय लागत नाही.

Examples:

1. She writes letter.

2. The boy plays cricket.

 

        Simple Present Tense साधा वर्तमानकाळात s/es प्रत्यय लावणे.

            1. क्रियापदाशेवटी  s, sh, ch, o, x, z ही अक्षरे असल्यास त्या क्रियापदाला es प्रत्यय लागतो. अन्यत्र s प्रत्यय लागते.

Examples:

push - pushes

Catch - catches,

buzz - buzzes,

go – goes

        2. क्रियापदा शेवटी  y हे अक्षर असल्यास त्या y चा लोप होतो ies प्रत्यय लागते.

Examples:

cry – cries, try – tries, fry – fries, fly – flies.

 

        3. मात्र या y च्या पूर्वी स्वर (a, I, o, u, e) आल्यास इतर सर्व क्रियापदांप्रमाणे फक्त s प्रत्यय लागते.

Examples:

Play – plays, buy - buys

 

Examples:

1. Sahil sings song. साहिल गाणे गातो

2. Rahul binds rope. राहूल दोर बांधतो

3. Sanjay brings milk. संजय दूध आणतो

4. Shankar builds house. शंकर घर बांधतो   

 

        Simple Present Tense चे उपयोग

        1. Habitual Action or Repetitive Action/ incident/ event नेहमी सराव किंवा सवय सांगणे कधी कधी घडणारी घटना व्यक्त करणे यासाठी या काळाचा उपयोग करतात.

always - नेहमी, सदैव, नित्य, सर्वकाळ, usually - सामान्यतः, often - अनेकदा, वारंवार, sometimes – कधीतरी, never - कधीही नाही, मुळीच नाही, every day - दररोज, every month - प्रत्येक महिन्याला, on Saturday शनिवारीच वगैरे शब्द वापरतात

Examples:

1. Sanjay sometimes falls. संजय कधीतरी पडतो.

2. Children every day fight. दररोज मुले भांडतात.

3. People never feed. लोक कधीच खाऊ घालत नाही.

4. Sahil gives on Sunday. साहिल रविवारीच देता.

        2. General truth or Universal statements सर्वमान्य सत्ये किंवा शाश्वत सत्य व्यक्त करण्यासाठी Simple Present Tense वापरतात.

Examples:

1. The earth revolves around the sun. 

2. Sugar is sweet.

3. The sun rises in the East. 

4. Ice is cold. 

5. The coal is black. 

 

        Simple Present Tense साध्या वर्तमान काळात वापरली जाणारी सहाय्यकारी क्रियापदे

सहाय्यकारी क्रियापदे त्यांचा वापर 

To be ची रूपे: am/is/are,

Have ची रूपे: have/has,

Do ची रूपे: do/does,

Modal Auxiliary: Can/May/Must

 

To be ची रूपे: am/is/are

        Simple Present Tense साध्या वर्तमान काळामध्ये to be ची रूपे (am, is, are) या क्रियापदांचा वाक्यात 'आहे' या अर्थाने सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो.

Am

1.        I am teacher.

 वाक्यातील subject-कर्ता first person-प्रथम पुरुषी single-एकवचनी pronoun-सर्वनाम I असेल तेव्हा am हे वापरतात.

Are

वाक्यातील subject-कर्ता first person-प्रथम पुरुषी plural-अनेकवचनी pronoun-सर्वनाम WE, second person-द्वितीयपुरुषी single-एकवचनी YOU plural-अनेकवचनी pronoun-सर्वनाम YOU आणि third person-तृतीय पुरुषी plural-अनेकवचनी pronoun-सर्वनाम THEY अथवा नाम असेल तेव्हा हे are वापरतात.

1.        You are singer. तू गायक आहे.

2.        They are farmers. ते शेतकरी आहेत.

Is

वाक्यातील subject-कर्ता third person-तृतीय पुरुषी single-एकवचनी noun-नाम अथवा pronoun-सर्वनाम HE, SHE IT असेल तेव्हा is हे वापरतात.   

1.        He is farmer. तो शेतकरी आहे.

2.        It is fruit. ते फळ आहे.

 

Have ची रूपे: have/has

HAVE

        Simple Present Tense साध्या वर्तमान काळामध्ये Have ची रूपे (have, has) ही क्रियापदे वाक्यात 'माझे आहे,' 'माझ्याकडे आहे' याअर्थाने सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो.

            वाक्यातील कर्ता प्रथम पुरुषी एकवचनी अनेकवचनी सर्वनाम असेल, द्वितीयपुरुषी एकवचनी अनेकवचनी सर्वनाम असेल आणि तृतीय पुरुषी अनेकवचनी सर्वनाम अथवा नाम असेल तेव्हा have हे वापरतात.

1.        I have pen. माझ्याकडे पेन आहे.

2.        You have book. तुझ्याकडे पुस्तक आहे.

3.        They have books. त्यांच्याकडे पुस्तके आहेत.

 

HAS

            वाक्यातील कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी नाम अथवा सर्वनाम असेल तेव्हा has हे वापरतात.   

1.        He has pen.

2.        She has book.

3.        It has books.

 

Do ची रूपे:

DO

Simple Present Tense साध्या वर्तमान काळामध्ये Do ची रूपे (do, does) ही क्रियापदे वाक्यात

जेव्हा वाक्यात action verb मुख्य क्रियापद असते तेव्हा 'विधानार्थी वाक्यात', 'प्रश्नार्थक वाक्यात' आणि 'नकारार्थी वाक्यात' या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो.

            वाक्यातील कर्ता प्रथम पुरुषी एकवचनी अनेकवचनी सर्वनाम असेल, द्वितीयपुरुषी एकवचनी अनेकवचनी सर्वनाम असेल आणि तृतीय पुरुषी अनेकवचनी सर्वनाम अथवा नाम असेल तेव्हा do हे वापरतात.

1. I do not sell mangos. मी आंबे विकत नाही.

2. Do I sell mangoes? मी आंबे विकू?

3. You do not sleep on mat. तुम्ही चटईवर झोपत नाही.

4. They do not shut door. ते दरवाजा बंद करत नाही.

 

DOES

वाक्यातील कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी नाम अथवा सर्वनाम असेल तेव्हा does हे वापरतात.   

1.        He does not speak in English. तो इंग्रजीत बोलत नाही.

2.        Does it steal money? ते पैसे चोरते?

 

Modal Auxiliary: CAN/MAY/MUST 

        Simple Present Tense साध्या वर्तमान काळामध्ये Modal Auxiliary (can, may, must, ought to) ही क्रियापदे शक्यता, क्षमता, अनुमती, परवानगी, विनंती वगैरे विशेष अर्थ व्यक्त करण्यासाठी statement sentences विधानार्थी वाक्यात, ‘Interrogative Sentences प्रश्नार्थक वाक्यात', 'Negative sentences नकारार्थी वाक्यात' सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो.

            वाक्यातील कर्ता कोणत्याही वचन रुपात असला तरी या सहाय्यकारी क्रियापदांचे Can/May/Must हेच वर्तमान काळातील रूप वापरतात.

1. Sahil can sing song.

2. Rahul must bind rope.

3. Sanjay can bring milk.

4. Shankar may build house.

 

PRESENT CONTINUOUS TENSE OR PRESENT PROGRESSIVE TENSE –

अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमानकाळ 

 

            या काळाचा उपयोग बोलण्याच्या क्षणी चालू असलेली क्रिया दाखवण्यासाठी करतात.

 

क्रियापदाचे  स्वरूप To Be (Am/Is/Are) + Verb-Ing

            या काळातील वाक्यात कर्त्या नुसार to be चे वर्तमानकाळतील (am/is/are) रूप आणि मुख्य क्रियापदाच्या  वर्तमानकाळतील रूप त्याला ing प्रत्यय लावलेले रूप लिहितात.

            क्रियापदाचे ing प्रत्यय लावलेले रूप म्हणजेच Present Participle होय.

 

Examples:

1. I am singing song.          

2. We are going to school. 

3. You are drinking water.   

4. He is reading story.     

5. She is giving pen.

6. They are playing cricket.

7. Sahil is singing song. साहिल गाणे गात आहे.

8. Rahul is binding rope. राहूल दोर बांधत आहे

9. Sanjay is bringing milk. संजय दूध आणत आहे.

10. Shankar is building house. शंकर घर बांधत आहे

11. People are buying vegetables. लोक भाज्या विकत घेत आहेत.

12. Children are catching balls. मुले चेंडू पकडत आहेत

13. Boys are choosing fruits. मुलगे फळे निवडत आहेत

 

3. PRESENT PERFECT TENSE पूर्ण वर्तमान काळ

        क्रियापदाचे  स्वरूप Have/Has + Verb Past Participle

          to have या क्रियापदाचे वर्तमानकाळतील have/has रूप आणि त्यानंतर मूख्य क्रियापदाचे Past Participle (तिसरे रूप) लिहितात.

Examples:

1. I have sung song.          

2. We have gone to school. 

3. You have drunk water.   

4. He has read story.     

5. She has given pen.      

6. They have played cricket.

7. Sahil has sung sing. साहिलने गाणे गायले आहे

8. Rahul has bond rope. राहूलने दोर बांधला आहे

9. Sanjay has brought milk. संजयने दूध आणले आहे.

10. Shankar has built house. शंकरने घर बांधले आहे

11. People have bought vegetables.लोकांनी भाज्या विकत घेतल्या आहेत.

12 Children have cought balls.मुलांनी चेंडू पकडले आहेत

13. Boys have choosen fruits. मुलांनी फळे निवडली आहेत. 

 

4. PRESENT PERFECT CONTINUOUS TENSE पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ

                या काळाचा उपयोग भूतकाळात कधीतरी सुरू झालेली एखादी क्रिया अद्यापही चालूच आहे हे व्यक्त करण्यासाठी करतात.

क्रियापदाचे स्वरूप: Have/Has + Been + Verb-Ing

        To have या क्रियापदाचे वर्तमानकाळातील have/has रूप, त्यानंतर to be या क्रियापदाचे तिसरे रूप been आणि  त्यानंतर क्रियापदाच्या वर्तमानकाळातील रूपाला ing प्रत्यय लावतात

        have आणि has चा वापर Present Perfect Tense प्रमाणेच करावा.

Examples:

1. I have been singing song.

2. We have been going to school. 

3. You have been drinking water.   

4. He has been reading story.     

5. She has been giving pen.      

6. They have been playing cricket.

7. Sahil has been singing song साहिल गाणे गात आलेला आहे

8. Rahul has been binding rope. राहूल दोर बांधत आलेला आहे

9. Sanjay has been bringing milk. संजय दूध आणत आलेला आहे

10. Shankar has been building house. शंकर घर बांधत आलेला आहे

11. People have been buying vegetables. लोक भाज्या विकत घेत आलेले आहेत.

12. Children have been catching balls. मुले चेंडू पकडत आलेले आहेत.

13. Boys have been choosing fruits. मुलगे फळे निवडत आलेले आहेत.


सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...