निवडणूक प्रक्रिया इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र
२. निवडणूक प्रक्रिया निवडनुकांचे महत्त्व निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाहीशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत. १ भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीत निवडणुकांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. २. निवडणुकीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी निवडले जातात . ३. निवडणुकांमुळे सत्ता शांततामय मार्गाने बदलली जाते. ४. वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते. ५. शासनाच्या धोरणांमध्ये बदल घडतात व समाजजीवनही बदलते. निवडणुका सार्वत्रिक निवडणुका – दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. मध्यावधी निवडणुका – निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले, पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर निवडणुका घ्याव्या लागतात. त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घेण्याची कारणे- १ निवडून आलेले सरकार मुदत...