युरोपातील धर्मयुद्धे Crusades(क्रुसेडस्):
‘जेरुसलेम’ आणि ‘बेथेलहॅम’ ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आहेत. अकराव्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे Crusades(क्रुसेडस्) म्हणतात.
एकूण नऊ धर्मयुद्धे झाली. इ.स.१०९६ मध्ये पहिले धर्मयुद्ध झाले. दुसऱ्या
धर्मयुद्धाच्या दरम्यान पोप युजिनिअस (तिसरा) याने फ्रेंच राजा सातवा लुई आणि जर्मन सत्ताधीश तिसरा कॉनरॅड यांना मदतीस घेतले. तुर्कांनी त्यांचा पराभव केला. इजिप्तचा प्रमुख सलादिन याने इ.स.११८७ मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले. या धर्मयुद्धांचा शेवट झाला तरीही जेरूसलेम आणि त्याच्या परिसरातील प्रदेश हा इस्लामी सत्तांच्या ताब्यात राहिला होता.
युरोपातील Crusades(क्रुसेडस्)धर्मयुद्धांना पाठिंबा :
धर्मयुद्धांना सामान्य जनता, राजकीय सत्ताधीश आणि व्यापारी यांनी पाठिंबा दिला.
१. ख्रिस्ती धर्माचे प्रमुख धर्मगुरु पोप यांनी जे लोक धर्मयुद्धामध्ये सामील होतील त्यांना
पापक्षालना संदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या.
त्यामुळे जनतेने या युद्धांमध्ये मनापासून सहभाग घेतला.
२. रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे सीरिया आणि आशिया मायनर येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. म्हणून राजकीय सत्ताधारी यांनी धर्मयुद्धांना
पाठिंबा दिला.
३. इटली या देशातील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरांमधील धनिकांना मध्य आशियात बाजारपेठा प्रस्थापित करायच्या हेतूने व्यापारी वर्गाने धर्मयुद्धांना पाठिंबा दिला.
युरोपातील Crusades(क्रुसेडस्)धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे :
१.
पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या
युद्धांकडे संकुचित हेतूंनी पाहिले.
२.
धर्मावरील कमी
झालेली श्रद्धा,
३.
युरोपातील विविध राजांमधील एकीचा
अभाव,
४.
पोप व जर्मन सम्राटातील वितुष्ट,
५.
बायझॅन्टाईन
सम्राटांच्या सहकार्याचा अभाव या बाबी धर्मयुद्धांच्या अपयशास कारणीभूत होत्या.
युरोपातील Crusades(क्रुसेडस्)धर्मयुद्धांचे परिणाम :
१.
धर्मयुद्धांमुळे युरोपातील सरंजामशाहीचा अस्त झाला,
२. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली.
३. मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली. नवा व्यापारी वर्ग उदयाला आला.
४. युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले.
किल्लेबांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूलबांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी गोष्टींमध्ये युरोपीय राष्ट्रांनी प्राविण्य मिळवले.
५. लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपमधील राजांनी नवीन कर लागू केले.
६.
युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती,
फळे, अत्तरे,
पोषाखाचे वेगवेगळे प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टी परिचित झाल्या.
७. धर्मयुद्धांच्या काळात अरबांशी
अालेल्या संपर्कातून युरोपीय राष्ट्रांचा अनेक नवीन विषयांशी संपर्क आला. रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रांतील अनेक अरबी शब्द युरोपीय लोकांनी आत्मसात केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा