बुधवार, ३० मार्च, २०२२

इय्यता १० वी इतिहास पुढील विधाने सकारण स्पष्ट करा

 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा:


१  इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते.


१ भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत होते.

२ त्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता.

३ स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते.

४ म्हणून इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने हाेणे आवश्यक होते.

 

२.  ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.


१ मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पणहे पत्र १८३२ साली मुंबईत सुरू झाले.

२ ‘दर्पणहे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केले.

३ ‘दर्पणया पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्यसंपादक म्हटले जाते.

४ ६ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवसपत्रकार दिनम्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो.

 

३ स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले.


१ स्त्रीवादी इतिहासलेखनात स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखनाची पुनर्रचना केली.

२ सीमाँ--बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली.

३ स्त्रीवादी इतिहासलेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहासलेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला.

४ स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशाेधन सुरू झाले.

 

४ अभिलेखागारातील कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह मानली जातात.


१ अभिलेखागारांचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचेच एक अंग असते.

२ अभिलेखागार महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे त्यांमध्ये कोणताही बदल करता सुरक्षित ठेवते,

३ अभिलेखागार महत्त्वाच्या नोंदीच्या सूची तयार करतात आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देतात.

४ त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात.

 

५ मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्व' असे म्हटले जाते. 


१ विसाव्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहासलेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली.

२ त्याच्याआर्केऑलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन केले.

३ पुरातत्त्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्‌दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले.

४ फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व असे म्हटले

म्हणून मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्व' असे म्हटले जाते.

 

६ आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.


१ आपल्याला नैसर्गिक समृद्धीचा आणि मानवनिर्मित (सांस्कृतिक) अशा दोन प्रकारचा वारसा लाभलेला आहे.

२ संपूर्ण जगात गौरवली गेलेली काही सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे भारतात आहेत. ताजमहाल आणि जंतरमंतर वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी (एलिफंटा लेणी), छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक. तसेच आपल्याला नैसर्गिक समृद्धीचा पश्चिम घाटातील कास पठार लाभले आहे.

३ जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते. ही वारसा स्थळे बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात.

४ जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील स्थळाची निवड झाली ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

५ परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा तेथे स्थळांच्या परिसरात पर्यटक खडूने, कोळशाने आपली नावे लिहितात, चित्रे काढतात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो.

६ देशाचा अभिमान उंचवण्यासाठी, पर्यटन व्यवसाय विकसित करणासाठी देशातील इतर वारसा स्थळांची जागतिक वारसा स्थळांमध्ये निवड होण्यासाठी आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

 

७ इतिहासलेखनात प्रायोगिक निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही.

१ वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो.

२ या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते.

३ इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, प्रायोगिक पद्धतीसाठी ऐतिहासिक घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो.

४ इतिहासातील घटना घडली तिच परीस्थिती तशीच कायम नसते म्हणून इतिहासातील घटनावरून सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते.

५ म्हणून इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते

 

८ मेजर ध्यानचंद यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हटले जाते.

१ मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते.

२ त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले.

३ त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते.

४ म्हणून मेजर ध्यानचंद यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात.

 

९ वैदयकीय कारणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.

१ भारतातील वैद्यकीय सेवा सुविधा पाश्चात्त्यांच्या मते स्वस्त दर्जेदार आहेत. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत.

२ भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात.

३ योगशिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारांसाठी परदेशी पर्यटक भारतात येतात.

 

१० व्हॉल्टेअर यांना 'आधुनिक इतिहासलेखनाचे जनक' असे म्हणतात.

१ व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते.

२ व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा नवीन विचार मांडला.

३ त्यांच्या नवीन विचारा मुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला.

त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे म्हणता येईल.

 

११ गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक 'रियासतकार' म्हणून ओळखू लागले.

१ गोविंद सखाराम सरदेसाई  यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांत प्रकाशित केला हे.

२ गोविंद सखाराम सरदेसाई यांनीमराठी रियासतप्रकाशित करून मराठी इतिहासलेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले,

३ म्हणून लोक त्यांनारियासतकार या नावाने ओळखू लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...