इतिहासतील महत्त्वाचे मुद्दे

इतिहासतील मह्त्त्वाचे मुद्दे  

इयत्ता दहावी विषय  इतिहास राज्यशास्त्र  

इतिहासतील रिकाम्या जागा, जोड्या लावा तसेच काही थोडक्यात उत्तरे लिहिण्यासाठी खालील उपयुक्त मुद्द्यांचा उपयोग होतो.


इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.


 इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते.


 ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपेटोमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली.


 सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे ४५०० वर्षांपूर्वी सुमेरमधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा आहे.


मेसोपेटोमियातील सुमेर संस्कृतीचा सर्वाधिक प्राचीन शिलालेख तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे.


 रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ यांनी इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले.


 रेने देकार्त याने लिहिलेल्या ‘डिस्कोर्स ऑन द मेथड’ या ग्रंथातील लिहिला.


 व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते.


 व्हॉल्टेअरने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला.


 व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहासलेखनाचा जनक असे मानले जाते.


जॉर्जविल्हेम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्त्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला.


जॉर्जविल्हेम फ्रेडरिक हेगेल च्या ‘एनसायक्लोपिडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस’ या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे.


हेगेलने लिहिलेले ‘रिझन इन हिस्टरी’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.


हेगेलच्या पद्धतीला ‘द्वंद्ववाद’ (डायलेक्टिक्स्‌) असे म्हटले जाते.


लिओपॉल्ड व्हॉन रांके ने मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला.


लिओपॉल्ड व्हॉन रांकेने ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.


लिओपॉल्ड व्हॉन रांकेने इतिहासलेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली.


लिओपॉल्ड व्हॉन रांके च्या ‘द थिअरी अँड प्रॅक्टिस आॅफ हिस्टरी’ आणि ‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन केले आहे.


स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.


सीमाँ-द-बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली.


फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला.


फुकोच्या ‘आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज’ या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे, असे प्रतिपादन केले.


कार्ल मार्क्स याने मांडलेल्या वर्गसिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली.


कार्ल मार्क्सचा ‘दास कॅपिटल’ हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे.


मौर्य काळातील सोहगौडा ताम्रपट (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. या ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लीपीत आहे.


इसवी सनाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले ‘हर्षचरित’ हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे.


इसवी सनाच्या १२व्या शतकात कल्हण याने लिहिलेला ‘राजतरंगिणी’ हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.


मध्ययुगीन मुस्लीम इतिहासकारांमध्ये झियाउद्दीन बरनी या इतिहासकारने  ‘तारीख-इ-फिरुजशाही’ या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहासलेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे.


मध्ययुगीन मुस्लीम महत्त्वाचे ग्रंथ:

हसन निजामी लिखित ताजुल-मासिर,

मिन्हाज-इ-सिराज लिखित तबाकत-इ-नासिरी,

अमीर खुस्रो याचे विपुल लेखन,

तुझुक-इ-तिमुरी हे तैमूरलंग याचे आत्मचरित्र,

याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख-इमुबारकशाही


मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र ‘तुझुक-इ-बाबरी’मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत.


इतिहासलेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या ‘अकबरनामा’ या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे.


‘सभासद बखर’ ही छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते.


‘भाऊसाहेबांची बखर’ या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे.


पानिपतच्या लढाई या विषयावर आधारित ‘पानिपतची बखर’ अशीही स्वतंत्र बखर आहे.


‘होळकरांची कैफियत’ या बखरीतून आपणांस होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते.


बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत.


भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम होते.


जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला.


जेम्स मिल याने लिहिलेल्या ‘द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथाचे तीन खंड १८१७ साली प्रसिद्ध झाले.


सन १८४१ मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी ‘द हिस्टरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला.


माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर (१८१९-१८२७) होते.


जेम्स ग्रँट डफ ब्रिटिश अधिकाऱ्यांने मराठी साम्राज्याचा इतिहास ‘ए हिस्टरी ऑफ द मराठाज्’ हा ग्रंथ तीन खंडात लिहिला आहे.


डफ याच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि.  का.  राजवाडे यांनी एकोणिसाव्या शतकात दाखवून दिले.


राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉडसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते.


विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्‌विखंडात्मक इतिहास लिहिला.


१९२२ ते १९३७ च्या दरम्यान वसाहतवादी इतिहासलेखन ‘केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया’या ग्रंथाचे पाच खंड प्रसिद्ध झाले आहे.


इसवी सन १७८४ मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली.


फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो-युरोपीय भाषागटातील अतिप्राचीन शाखा होती.


फ्रेडरिक मॅक्सम्युलर याने ‘हितोपदेश’ या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच ‘द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट’ या नावाने ५० खंड संपादित केले.


 फ्रेडरिक मॅक्सम्युलर याने ऋग्वेदाचे संकलन केले. ते सहा खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला.


प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केले.


महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली.


भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांचीआत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्वादी इ ट्र तिहासलेखन असे म्हटले जात.


महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णु मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्वादी इ ट्र तिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील.


‘द राईज ऑफ द मराठा पॉवर’ या ग्रंथात न्या.महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली.


इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.का.राजवाडे यांनी पुण्यात ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले.


राजवाडे यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले.


गोविंद सखाराम सरदेसाई यांनी ‘मराठी रियासत’ प्रकाशित करून मराठी इतिहासलेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांना ‘रियासतकार’ या नावाने ओळखले जातात.


स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी लिहिलेले ‘द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857’ (१८५७ चे ‘स्वातंत्र्यसमर’) या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे.

 

भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासलेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे.


डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.


डांगे यांचे ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी’ हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखन आहे.


इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे, ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे.


वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले.


महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले.


भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे.   भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहासलेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनापैकी ‘हू वेअर द शूद्राज’ आणि ‘द अनटचेबल्स्’ हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील.


एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातिव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले.


ताराबाई शिंदे यांचे सन १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेले ‘स्त्रीपुरुष तुलना’ हे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.


सन १८८८ मध्ये पंडिता रमाबाई यांचे ‘द हाय कास्ट हिंदु वुमन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.


स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या ‘क्रॉसिंग थ्रेशोल्डस् ः फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरी’ या पुस्तकाचा उल्लेख केला जातो.


शर्मिला रेगे यांचे ‘रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर ः रिडिंग दलित वुमेन्स् टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे.


भारतात बंगळुरू येथे ‘सृष्टि इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी’ या संस्थेत ‘सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी’ हा स्वतंत्र विभाग आहे.


युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश २०१२ मध्ये केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगांमध्येच आहे.


इनटॅक ही (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज) स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात १९८४ पासून कार्यरत आहे.


जगातील सर्वांत प्राचीन (इ.स.पू. ६ वे शतक) संग्रहालय मेसोपोटेमियातील ‘उर’ या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले.


‘उर’ या प्राचीन शहराचे उत्खनन ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी १९२२ ते १९३४ या काळात केले होते.


जगातील सर्वांत प्राचीन हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्ने बांधले होते.


भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा ः

२००१ : ‘कुटियट्टम’ ही केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा.

२००३ : वैदिक पठणपरंपरा.

२००५ :उत्तर भारतातील ‘रामलीला’ सादरीकरण

२००९ : गढवाल (उत्तराखंड) येथील ‘रम्मन’ धार्मिक उत्सव आणि विधीनाट्य.

२०१० : राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य.

२०१० :पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य. 

२०१० :केरळातील ‘मुडियेट्टू’ विधीनाट्य आणि नृत्यनाट्य.

२०१२ :लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा. 

२०१३ : मणिपूर येथील ‘संकीर्तन’ परंपरा.

२०१४ :पंजाबमधील ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कलापरंपरा.

२०१६: नवरोज 

२०१६ : योग

 

भारतातील जागतिक वारसा स्थळे-सांस्कृतिक

१९८३ : आग्र्याचा किल्ला

१९८३ : अजिंठा लेणी

१९८३ : वेरूळ लेणी

१९८३ : ताजमहाल

१९८४ : महाबलीपुरम येथील मंदिरे

१९८४ : कोणार्क सूर्यमंदिर

१९८६ : गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेन्ट्स

१९८६ : फत्तेपूर सिक्री

१९८६ : हंपी येथील वास्तूसंकुल

१९८६ : खजुराहो येथील मंदिरे

१९८७ : घारापुरी (एलिफन्टा) ले

१९८७, : चोळ मंदिरे-तंजावरचेबृहदिश्वर मंदिर,

२००४ गंगैकोंडचोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचेऐरावतेश्वर मंदिर 

१९८७ : पट्टदकल येथील मंदिरे

१९८९ : सांचीचा स्तूप

१९९३ : हुमायूनची कबर

१९९३ : कुतुबमिनार आणि परिसरातील वास्तू

१९९९ : (१) दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, (२) नीलगिरी माउन्टन रेल्वे, (३) द काल्का शिमला रेल्वे

२००२ : बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर

२००३ : भीमबेटका येथील शैलाश्रय

२००४ : चंपानेर-पावागढ पुरातत्त्वीय स्थळ

२००४ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई

२००७ : लाल किल्ला, दिल्ली

२०१० : जंतर मंतर, जयपूर

२०१३ : राजस्थानमधील पर्वतीय किल्ले

२०१४ : गुजरातमधील पाटण येथील ‘रानी-की-बाव’

२०१६ : नालंदा महाविहार पुरातत्त्वीय स्थळ

२०१६ : चंडिगढ येथील कॅपिटल काॅम्प्लेक्स

२०१७ : अहमदाबाद-ऐतिहासिक शह

 

भारतातील जागतिक वारसा स्थळे-नैसर्गिक

१९८५ : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

१९८५ : केवलदेव राष्ट्रीय उद्यान

१९८५ : मानस वन्यजीव अभयारण्य

१९८७ : सुंदरबन राष्ट्रीय उद्यान

१९८८ : नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

२००५ : राष्ट्रीय उद्याने

२०१२ : पश्चिम घाट

२०१४ : ग्रेट हिमालयन पार्क भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसास्थळ 

२०१६ : कांचनगंगा राष्ट्रीय उद्या

 

कोलकाता येथे ‘इंडियन म्युझियम’ याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन १८१४ मध्ये झाली.


नॅथानिएल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ इंडियन म्युझियम’ संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते.


पुण्यामध्ये ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह’ (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय) या संस्थेची मुख्य कचेरी आहे.


‘दर्पण’ हे पत्र १८३२ साली मुंबईत सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर हे ‘दर्पण’चे संपादक होते.


‘दर्पण’ या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्यसंपादक म्हटले जाते.


६ जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो.


‘प्रभाकर’ हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले. त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास (फ्रेंच राज्यक्रांती),


लोकहितवादी (गोपाळ हरी देशमुख) यांची समाजप्रबोधनपर ‘शतपत्रे’ प्रसिद्ध झाली.


‘ज्ञानोदय’ पत्रात १८४२ मध्ये आशिया खंडाचा व १८५१ मध्ये ‘युरोपचा नकाशा’ छापण्यात आला.

मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो.


विजेच्या साहाय्याने बातमी पोहचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ १८५२ पासून सुरू झाल्याची माहिती ‘ज्ञानोदय’ मधून मिळते.


‘ज्ञानोदय’ मधून भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये ‘चाक्या म्हसोबा’ शीर्षकांतर्गत छापून आली.


१८५७ च्या स्वातंत्र्यलढयाच्या बातम्या ‘ज्ञानोदय’या वर्तमानपत्रात छापल्या होत्या.


‘इंदूप्रकाश’ पत्राने विधवा-विवाहाचा जोरदार पुरस्कार केला.


बहुजनसमाजाचे मुखपत्र म्हणजे ‘दीनबंधु’, महात्मा जोतीराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले.


‘केसरी’ आणि ‘मराठा’ १८८१ मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली.


बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ सुरू केले.


‘प्रगति’ (१९२९) साप्ताहिकचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते.


स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले.


ब्रिटिश सरकारने ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ या कंपनीचे ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस’ (आयएसबीएस) असे नामकरण केले.


८ जून १९३६ रोजी ‘इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस’ या कंपनीचे नामकरण ‘ऑल इंडिया रेडिओ’ (एआयआर) असे झाले.


ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी’ हे नाव दिले गेले.


२३ जुलै १९२७ रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटीन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले.


१५ सप्टेंबर १९५९ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी ‘दिल्ली दूरदर्शन केंद्रा’चे उद्घाटन केले.


महाराष्ट्रात १ मे १९७२ रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले.


१५ ऑगस्ट १९८२ या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले.


१९९१ मध्ये परदेशी व देशी खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली.


१९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले त्याला २०१४ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली.


१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाला २०१७ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली.


भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली ‘भारत एक खोज’ ही मालिका महत्त्वाची आहे.


पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथावर आधारित‘भारत एक खोज’ ही मालिका होती.


श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘भारत एक खोज’ या मालिकेने भारताच्या प्राचीन काळ ते अर्वाचीन काळाचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडला.


‘भारत एक खोज’ या मालिकेत नेहरूंच्या रूपातील कलावंत रोशन सेठ प्रास्ताविक व अन्वयार्थ सांगत असत.


खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध ठिकाणे:

वडोदरा येथील प्रसिद्ध पहिलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा,

पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ,

गुजरातमधील ‘स्वर्णिम गुजरात स्पोर्टस विद्यापीठ’, गांधीनगर,

कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम,

अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,

पुण्यातील बालेवाडी येथील श्रीशिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती

 

प्राचीन ऑलिंपिक ही खेळाची स्पर्धा ऑलिंपिया या ग्रीक शहरात घेतली जात असे.


श्रीमती मनिषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तरपेशवाईतील मल्लविद्यागुरू बाळंभट देवधर यांची आहे.


बाळंभटदादांना मल्लखांब हा व्यायाम प्रकार वानरांच्या झाडांवरील क्रीडा पाहून स्फुरला असेही त्यांनी नमूद केले आहे.


हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.


मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक त्यांच्या नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले.


त्यापूर्वी १९२८ आणि १९३२ मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते.


२९ ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडादिवस’ म्हणून पाळला जातो.


मेजर ध्यानचंद यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हणतात.


१९५६ मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ या सन्मानाने विभूषित करण्यात आले.


कथासरित्सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्यांचे वर्णन आले आहे.


कथासरित्सागर या ग्रंथात उडणाऱ्या लाकडी बाहुल्या कळ दाबल्यावर उंच उडत, काही नाचत तर काही आवाज करत असे वर्णन आहे.


क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज. पंडित करत असत.


इ.स.६३० मध्ये चिनी प्रवासी युआन श्वांग चीनमधून भारतात आला होता.


एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात थॉमस कुकने ६०० लोकांची लीस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली. पूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडवून आणली.


जगातील पहिला युरोपीय स्पेन शोधक प्रवासी म्हणून बेंजामिन ट्युडेला प्रसिद्ध आहे.


तेराव्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली. तो १७ वर्षे चीनमध्ये राहिला.


इस्लामी जगताची प्रदीर्घ सफर घडवून आणणारा चौदाव्या शतकातील प्रवासी म्हणजे इब्न बतूता. तो तीस वर्षे जग फिरत होता.


सोळाव्या शतकातील गेरहार्ट मर्केटर हा जगाचा नकाशा आणि पृथ्वीचा गोल बनवणारा नकाशा आरेखक म्हणून प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातून उत्तरेकडे अयोध्येपर्यंत व तेथून पुन्हा महाराष्ट्रापर्यंत प्रवासाचे वर्णन विष्णुभट गोडसे यांनी ‘माझा प्रवास’ हे त्यांच्या प्रवासवर्णनचे पुस्तक लिहून ठेवले आहे.


विष्णुभटांनी हा प्रवास १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात केला. या स्वातंत्र्यसंग्रामासंबंधीच्या अनेक गोष्टींचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. त्यामुळे या स्वातंत्र्यसंग्रामाचे आणि विशेषतः राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनाविषयीचे अनेक तपशील आपल्याला समजतात.


महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक गोपाळ नीळकंठ दांडेकर दुर्गभ्रमण यात्रा आयोजित करत असत.


भारतीय पातळीवर हिमालयीन कार रॅली आणि महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धा यांसारखे प्रकार आहेत.


चारधाम, बारा ज्योतिर्लिंगे. यामधील बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय व्हावी म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या व्यक्तिगत गंगाजळीतून लोकोपयोगी कामे केलेली आहेत.


संपूर्ण जगात गौरवली गेलेली काही महत्त्वाची स्थळे भारतात आहेत. ताजमहाल आणि जंतरमंतर वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी (एलिफंटा लेणी), छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, पश्चिम घाटातील कास पठार यांचा समावेश आहे.


इ.स.१९७५ मध्ये ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’ची स्थापना करण्यात आली.


महाबळेश्वर येथून जवळच असलेले ‘भिलार’ या गावल पुस्तकाचे गोव हा मन मिळाला.


महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत.


पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या अठराव्या शतकात झाली.


फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले.


लुव्र संग्रहालयामध्ये लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या ‘मोनालिसा’ या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे.


लिओनार्दो द विंची फ्रान्सचा सोळाव्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता.


लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या अठराव्या शतकात झाली. सर हॅन्स स्लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहातील सुमारे एकाहत्तर हजार वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या.


इंडियन म्युझियम, कोलकाता; नॅशनल म्युझियम, दिल्ली; छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई; सालारजंग म्युझियम, हैदराबाद; द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाइल्स, अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयांपैकी काही आहेत.


अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन १८४६ मध्ये सुरू झाले.


कोलकाता येथील ‘भारतीय संग्रहालय’ हे भारतातील पहिले संग्रहालय ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल’ या संस्थेतर्फे इसवी सन १८१४ मध्ये स्थापन झाले.


चेन्नई येथील इसवी सन १८५१ मध्ये सुरू झालेले ‘गव्हर्मेंट म्युझियम’ हे भारतातील दुसरे संग्रहालय.


इसवी सन १९४९ मध्ये दिल्लीतील ‘राष्ट्रीय वस्तुसंग्रहालया’ची (नॅशनल म्युझियम) स्थापना झाली.


इसवी सन १९०४ साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला.


इसवी सन १९९८ मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय’ असे ठेवण्यात आले.


जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालये:

तक्षशिला विद्यापीठ येथील ग्रंथालय (इ.स.पू़. सुमारे पाचवे शतक ते इ.स.पाचवे शतक),

मेसोपोटेमियातील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानीपाल याचे ग्रंथालय (इ.स.पू़ सातवे शतक)

इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालय (इ.स.पू़ चौथे शतक)


तमिळनाडूतील तंजावर येथील ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ हे इसवी सनाच्या सोळाव्या- सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले.


इसवी सन १६७५ मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतले त्यांच्या वंशंजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यांमध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता.

 

भारतीय ग्रंथालय:

कोलकाता येथील ‘नॅशनल लायब्ररी’,

दिल्ली येथील नेहरू मेमोरियल म्युझियम अ‍ॅन्ड लायब्ररी’,

हैदराबाद येथील ‘स्टेट सेंट्रल लायब्ररी’,

मुंबई येथील ‘लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी’ आणि ‘डेव्हिड ससून लायब्ररी’


भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन १८९१ मध्ये ‘इंपिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट’ या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले.


इसवी सन १९११ मध्ये ते दिल्लीमध्ये आणले गेले.


इसवी सन १९९८ मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी ‘राष्ट्रीय अभिलेखागार’ म्हणून ते जनतेसाठी खुले करण्यात आल्याचे जाहीर केल.


पुणे अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे पाच कोटी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत. त्याला पेशवे दप्तर असे म्हणतात.


पश्चिमेकडील देशांमधील कोश

‘नॅचरल हिस्ट्री’ (इ.स.पहिले शतक) हा थोरल्या प्लिनीने रचलेला पहिला कोश.

१८ व्या शतकातील फ्रेंच विश्वकोश हा डिडेरो यांचा कोश महत्त्वाचा आहे.

एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम इ.स.१७६७ मध्ये प्रसिद्ध झाला.


संस्कृत भाषेत निघंटू, धातुपाठ यांसारख्या शब्दकोशांची परंपरा प्राचीन आहे.


मध्ययुगात महानुभाव पंथियांची कोशरचना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राज्यव्यवहारकोश हे महत्त्वाचे आहेत.


सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ‘भारतीय चरित्रकोश मंडळा’ची स्थापना केली तिच्यातर्फे पुढील प्रमाणे तीन चरित्रकोश संपादून प्रसिद्ध केले.

भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (१९३२),

भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश (१९३७),

भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश (१९४६)


संगीतशास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास (लक्ष्मण दत्तात्रय जोशी),


क्रांतिकारकांचा चरित्रकोश (शं.रा.दाते) ज्यांत भारतातील सुमारे २५० क्रांतिकारकांची चरित्रे व छायाचित्रे आहेत.


स्वातंत्र्यसैनिक  : चरित्रकोश (न.र.फाटक) या कोशात स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष देहदंड, कारावास भोगलेल्या व स्वातंत्र्यपूर्वकाळात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत काम केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती आहे.


महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी (१४ वे शतक) या ग्रंथात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी ज्या-ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे.


महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

निवडणूक प्रक्रिया इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

राजकीय पक्ष इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र