इंग्रज-शीख संबंध (१८०९–१८४९)
इंग्रज-शीख संबंध (१८०९–१८४९)
अमृतसरचा तह (१८०९)
रणजितसिंग
आणि इंग्रजांमध्ये मैत्री झाली.
रणजितसिंगाने
सतलजच्या पूर्वेकडे साम्राज्यविस्तार न करण्याचे मान्य केले.
सर
चार्ल्स मेटकाफने मध्यस्थी केली.
रणजितसिंगाचा
पश्चिमेकडील विस्तार
पूर्वेकडे
विस्तारास मर्यादा असल्याने रणजितसिंगाने पश्चिमेकडे विस्तार केला.
मुलतान, डेरा, काश्मीर आणि पेशावर जिंकले.
इंग्रजांचे बदलते धोरण
१८२२
नंतर इंग्रज रणजितसिंगाच्या हालचालींवर सावधपणे लक्ष ठेवू लागले. रणजितसिंगानेही
इंग्रजांशी संघर्ष टाळला. इंग्रजांना रणजितसिंगाची भीती रणजितसिंगाने नेपाळ, बाजीराव दुसरा आणि नागपूरच्या भोसल्यांना मदत केली नाही. इंग्रज इतर
युद्धांत गुंतले असतानाही त्याने त्याचा फायदा घेतला नाही.
सिंधचा प्रश्न
रणजितसिंगाला
सिंध आणि विशेषतः शिकारपूर जिंकायचे होते. इंग्रजांना सिंधवर रणजितसिंगाचे वर्चस्व
नको होते.
रूपारची भेट (१८३१)
सर
विल्यम बेंटिंक आणि रणजितसिंग यांची रूपार येथे भेट झाली. रणजितसिंगाने
इंग्रजांच्या सिंधमधील व्यापारी धोरणाला विरोध केला नाही.
पेशावरचा विजय (१८३४)
रणजितसिंगाने
पेशावर जिंकले. मात्र इंग्रजांच्या दबावामुळे सिंध-अफगाणिस्तानच्या दिशेने पुढील
विस्तार करता आला नाही.
१८३८ चा तह
इंग्रज, रणजितसिंग आणि शाहशुजा यांच्यात मैत्रीचा तह झाला. दोस्त महंमदला हटवून
शाहशुजाला अफगाणिस्तानच्या गादीवर बसवण्याचे ठरले. पंजाबमधून ब्रिटिश सैन्य
नेण्यास रणजितसिंगाने विरोध केला.
रणजितसिंगाचा मृत्यू
रणजितसिंगाचा
मृत्यू १८३९ मध्ये झाला. त्यानंतर इंग्रज-शीख संबंध अधिक तणावपूर्ण झाले.
पहिले शीख युद्ध (१८४५–४६)
पहिले
शीख युद्ध १८४५–१८४६ मध्ये इंग्रज व शीख यांच्यात झाले.
या
युद्धात मुडकी, फिरोजशहा, बुडिवाल,
अलिवाल आणि सॅब्रोन येथे प्रमुख लढाया झाल्या.
मुडकीच्या
लढाईत शिखांचा पराभव झाला.
फिरोजशहाच्या
लढाईत (२१ डिसेंबर १८४५) शिखांनी अतुलनीय पराक्रम केला; मात्र फितुरीमुळे इंग्रजांना फायदा झाला.
बुडिवालच्या
लढाईत (२१ जानेवारी १८४६) शिखांनी इंग्रजांचा पराभव केला.
सॅब्रोनच्या
लढाईत शीख सैन्यचा निर्णायक पराभव झाला.
२०
फेब्रुवारी १८४६ रोजी ब्रिटिशांनी लाहोरमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मार्च १८४६
मध्ये लाहोरचा तह झाला.
लाहोरचा तह
इ.
स. १८४६ मध्ये पहिल्या शीख युद्धानंतर झाला.
इंग्रजांनी
पंजाब ताब्यात न घेता महाराजा दिलीपसिंग याला गादीवर ठेवले.
शिखांनी
१.५ कोटी रुपये खंडणी देण्याचे मान्य केले.
जालंधर
दुआब, हजारा व सतलजच्या पूर्वेकडील प्रदेश इंग्रजांच्या
ताब्यात गेले.
खालसा
सैन्याची संख्या कमी करण्यात आली.
सर
हेन्री लॉरेन्स यांची पंजाबमध्ये ब्रिटिश वकील म्हणून नियुक्ती झाली.
गुलाबसिंगाला
काश्मीर देण्यात आले.
लालसिंग
याला पंजाबचा वझीर करण्यात आले.
लालसिंग
व राणी जिंदन यांच्यावर कारवाई करून त्यांना अनुक्रमे बनारस व चुनार येथे
पाठवण्यात आले.
पंजाबातील
असंतोषामुळे नवीन तह करण्यात आला.
भैरोवालचा तह इ. स. १८४६ मध्ये झाला.
या
तहानुसार ब्रिटिशांना अनुकूल ८ शीखांचे सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले.
दिलीपसिंगाने
मंडळाच्या सल्ल्याने राज्यकारभार करावा असे ठरले.
शिखांनी
ब्रिटिशांना दरवर्षी २२ लाख रुपये द्यावेत असे ठरले.
हा
तह दिलीपसिंग वयात येईपर्यंत लागू राहणार होता.
दुसरे शीख युद्ध (१८४८–४९)
दुसऱ्या शीख युद्धाची प्रमुख कारणे :
पहिल्या
शीख युद्धातील पराभवाची खालसा सैन्याला खंत होती.
ब्रिटिशांच्या
सुधारणांमुळे शीख उच्चवर्ग असंतुष्ट होता.
खालसा
सैन्याची संख्या कमी केल्याने अनेक सैनिक बेरोजगार झाले.
लाहोरमध्ये
ब्रिटिश वकिलाचे वास्तव्य शिखांना अपमानास्पद वाटत होते.
राणी
जिंदनला गादीवरून दूर केल्यामुळे तिचे अनुयायी नाराज होते.
मुलतानचे बंड :
मुलराज
हा मुलतानचा राज्यपाल होता. लाहोर दरबाराने त्याच्यावर मोठी वारस खंडणी लादली.
आर्थिक अडचणींमुळे मुलराज ही खंडणी भरू शकला नाही. १९ एप्रिल १८४८ रोजी मुलराजला
पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर मुलतानमध्ये इंग्रजांविरुद्ध बंड झाले.
युद्धातील प्रमुख लढाया :
रामनगरची
लढाई — २२ नोव्हेंबर १८४८
चिलीयनवाला
लढाई — जानेवारी १८४९
गुजरातची
लढाई — फेब्रुवारी १८४९
या
लढायांमध्ये शिखांचा पराभव झाला.
युद्धाचा शेवट :
१३
मार्च १८४९ रोजी दुसरे शीख युद्ध संपले.
लॉर्ड
डलहौसीने पंजाब ब्रिटिश साम्राज्यात विलीन केला.
राजा
दिलीपसिंगला पेन्शन देण्यात आली.
लॉर्ड
लॉरेन्स याची पंजाबचा कमिश्नर म्हणून नियुक्ती झाली.
यामुळे
रणजितसिंगाने स्थापन केलेले शीख साम्राज्य समाप्त झाले.
MCQ
Questions
1.
अमृतसरचा तह कोणत्या वर्षी झाला?
A) १८०५
B) १८०९
C) १८१५
D) १८२०
उत्तर:
B) १८०९
2.
अमृतसरच्या तहात रणजितसिंगाने कोणत्या नदीच्या पूर्वेकडे विस्तार न करण्याचे मान्य
केले?
A) सिंधू
B) झेलम
C) सतलज
D) रावी
उत्तर:
C) सतलज
3.
अमृतसरचा तह घडवून आणण्यात कोणाची मध्यस्थी महत्त्वाची होती?
A) लॉर्ड डलहौसी
B) सर चार्ल्स मेटकाफ
C) लॉर्ड वेलस्ली
D) सर विल्यम बेंटिंक
उत्तर:
B) सर चार्ल्स मेटकाफ
4.
रणजितसिंगाने पूर्वेकडे विस्तार करता न आल्याने कोणत्या दिशेने साम्राज्यविस्तार
केला?
A) दक्षिण
B) उत्तर
C) पश्चिम
D) पूर्व
उत्तर:
C) पश्चिम
5.
खालीलपैकी कोणता प्रदेश रणजितसिंगाने जिंकला?
A) मद्रास
B) काश्मीर
C) बंगाल
D) अवध
उत्तर:
B) काश्मीर
6.
रणजितसिंगाला सिंधमधील कोणते शहर विशेष महत्त्वाचे वाटत होते?
A) कराची
B) हैदराबाद
C) शिकारपूर
D) लाहोर
उत्तर:
C) शिकारपूर
7.
रणजितसिंग आणि सर विल्यम बेंटिंक यांची भेट कुठे झाली?
A) लाहोर
B) रूपार
C) दिल्ली
D) अमृतसर
उत्तर:
B) रूपार
8.
रूपारची भेट कोणत्या वर्षी झाली?
A) १८२८
B) १८३१
C) १८३४
D) १८३८
उत्तर:
B) १८३१
9.
रणजितसिंगाने पेशावर कधी जिंकले?
A) १८२३
B) १८३१
C) १८३४
D) १८३९
उत्तर:
C) १८३४
10.
१८३८ च्या तहात इंग्रजांसोबत कोण सहभागी होते?
A) दोस्त महंमद आणि बाजीराव
B) शाहशुजा आणि रणजितसिंग
C) टिपू सुलतान आणि रणजितसिंग
D) नाना फडणीस आणि शाहशुजा
उत्तर:
B) शाहशुजा आणि रणजितसिंग
11.
१८३८ च्या तहानुसार अफगाणिस्तानच्या गादीवर कोणाला बसवण्याचे ठरले?
A) दोस्त महंमद
B) शाहशुजा
C) रणजितसिंग
D) महमूदशहा
उत्तर:
B) शाहशुजा
12.
रणजितसिंगाचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला?
A) १८३४
B) १८३६
C) १८३८
D) १८३९
उत्तर:
D) १८३९
13.
रणजितसिंगाने इंग्रजांशी थेट संघर्ष का टाळला?
A) त्याच्याकडे सैन्य नव्हते
B) त्याला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होती
C) इंग्रजांनी त्याला पंजाब दिला
D) त्याला सिंध जिंकायचा नव्हता
उत्तर:
B) त्याला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होतीलाहोरचा तह
व भैरोवालचा तह
14.
पहिले शीख युद्ध कोणत्या काळात झाले?
A) १८३९–४०
B) १८४०–४१
C) १८४५–४६
D) १८४८–४९
उत्तर:
C) १८४५–४६
15. पहिले शीख युद्ध कोणामध्ये झाले?
A) इंग्रज व मराठे
B) इंग्रज व शीख
C) शीख व अफगाण
D) इंग्रज व म्हैसूर
उत्तर:
B) इंग्रज व शीख
16. फिरोजशाची लढाई केव्हा झाली?
A) २१ डिसेंबर १८४५
B) २१ जानेवारी १८४६
C) २० फेब्रुवारी १८४६
D) मार्च १८४६
उत्तर:
A) २१ डिसेंबर १८४५
17. बुडिवालची लढाई केव्हा झाली?
A) २१ डिसेंबर १८४५
B) २१ जानेवारी १८४६
C) २० फेब्रुवारी १८४६
D) १७ मार्च १८४६
उत्तर:
B) २१ जानेवारी १८४६
18. शिखांचा निर्णायक पराभव कोणत्या लढाईत झाला?
A) मुडकी
B) फिरोजशहा
C) बुडिवाल
D) सॅब्रोन
उत्तर:
D) सॅब्रोन
19. ब्रिटिशांनी लाहोरमध्ये केव्हा प्रवेश केला?
A) २१ जानेवारी १८४६
B) २० फेब्रुवारी १८४६
C) १५ मार्च १८४६
D) २१ मार्च १८४६
उत्तर:
B) २० फेब्रुवारी १८४६
20. पहिले शीख युद्ध कोणत्या तहाने संपुष्टात आले?
A) अमृतसरचा तह
B) सालबाईचा तह
C) लाहोरचा तह
D) तैनाती फौजेचा तह
उत्तर:
C) लाहोरचा तह
21. लाहोरचा तह कोणत्या वर्षी झाला?
A) १८४३
B) १८४५
C) १८४६
D) १८४९
उत्तर:
C) १८४६
22. लाहोरचा तह कोणत्या वर्षी झाला?
A) १८४५
B) १८४६
C) १८४७
D) १८४८
उत्तर:
B) १८४६
23. लाहोरच्या तहानुसार शिखांनी किती खंडणी देण्याचे मान्य केले?
A) ५० लाख रुपये
B) १ कोटी रुपये
C) १.५ कोटी रुपये
D) २ कोटी रुपये
उत्तर:
C) १.५ कोटी रुपये
24. लाहोरच्या तहानंतर पंजाबच्या गादीवर कोणाला ठेवण्यात आले?
A) लालसिंग
B) गुलाबसिंग
C) दिलीपसिंग
D) रणजितसिंग
उत्तर:
C) दिलीपसिंग
25. गुलाबसिंगाला कोणता प्रदेश देण्यात आला?
A) लाहोर
B) काश्मीर
C) जालंधर
D) हजारा
उत्तर:
B) काश्मीर
26. लाहोरच्या तहानंतर पंजाबचा वझीर कोण झाला?
A) गुलाबसिंग
B) लालसिंग
C) हेन्री लॉरेन्स
D) दिलीपसिंग
उत्तर:
B) लालसिंग
27. सर हेन्री लॉरेन्स यांची नियुक्ती कोणत्या पदावर झाली?
A) पंजाबचे वझीर
B) ब्रिटिश वकील
C) सेनापती
D) सल्लागार
उत्तर:
B) ब्रिटिश वकील
28. राणी जिंदन हिला कुठे पाठवण्यात आले?
A) बनारस
B) लाहोर
C) चुनार
D) दिल्ली
उत्तर:
C) चुनार
29. लालसिंगाला कुठे पाठवण्यात आले?
A) चुनार
B) बनारस
C) काश्मीर
D) अमृतसर
उत्तर:
B) बनारस
30. भैरोवालचा तह कोणत्या वर्षी झाला?
A) १८४५
B) १८४६
C) १८४७
D) १८४९
उत्तर:
B) १८४६
31. भैरोवालच्या तहानुसार किती शीखांचे सल्लागार मंडळ नेमण्यात आले?
A) ५
B) ६
C) ८
D) १०
उत्तर:
C) ८
32. भैरोवालच्या तहानुसार शिखांनी ब्रिटिशांना दरवर्षी किती रुपये द्यायचे
होते?
A) १० लाख
B) १५ लाख
C) २२ लाख
D) २५ लाख
उत्तर:
C) २२ लाख
33. भैरोवालचा तह कोणाच्या वयात येईपर्यंत लागू राहणार होता?
A) लालसिंग
B) गुलाबसिंग
C) दिलीपसिंग
D) रणजितसिंग
उत्तर:
C) दिलीपसिंग
34. लाहोरच्या तहानुसार खालीलपैकी कोणता प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला?
A) जालंधर दुआब
B) दिल्ली
C) आग्रा
D) अवध
उत्तर:
A) जालंधर दुआब
35. पंजाब पूर्णपणे खालसा न करण्यामागील एक प्रमुख कारण कोणते होते?
A) पंजाबची तिजोरी रिकामी होती
B) शिखांनी इंग्रजांना मदत केली होती
C) अफगाणांनी विरोध केला
D) मराठ्यांनी दबाव आणला
उत्तर:
A) पंजाबची तिजोरी रिकामी होती
36. पंजाब आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये कोणता प्रदेश संरक्षक राज्य म्हणून
राहावा असे इंग्रजांना वाटत होते?
A) बंगाल
B) पंजाब
C) सिंध
D) अवध
उत्तर:
B) पंजाब
37. दुसरे शीख युद्ध कोणत्या काळात झाले?
A) १८३९–४०
B) १८४५–४६
C) १८४८–४९
D) १८५६–५७
उत्तर:
C) १८४८–४९
38. दुसऱ्या शीख युद्धाची सुरुवात कोणाच्या बंडामुळे झाली?
A) राणी जिंदन
B) मुलराज
C) दिलीपसिंग
D) लॉर्ड डलहौसी
उत्तर:
B) मुलराज
39. मुलराज कोणत्या ठिकाणचा राज्यपाल होता?
A) लाहोर
B) अमृतसर
C) मुलतान
D) पेशावर
उत्तर:
C) मुलतान
40. मुलराजला पदावरून कधी हटविण्यात आले?
A) २२ नोव्हेंबर १८४८
B) १९ एप्रिल १८४८
C) १३ मार्च १८४९
D) २९ मार्च १८४९
उत्तर:
B) १९ एप्रिल १८४८
41. रामनगरची लढाई कधी झाली?
A) २२ नोव्हेंबर १८४८
B) १३ नोव्हेंबर १८४९
C) १३ मार्च १८४९
D) फेब्रुवारी १८४९
उत्तर:
A) २२ नोव्हेंबर १८४८
42. चिलीयनवाला लढाई कोणत्या युद्धाशी संबंधित आहे?
A) पहिले इंग्रज-मराठा युद्ध
B) पहिले शीख युद्ध
C) दुसरे शीख युद्ध
D) दुसरे इंग्रज-मराठा युद्ध
उत्तर:
C) दुसरे शीख युद्ध
43. दुसऱ्या शीख युद्धातील अंतिम महत्त्वाची लढाई कोणती होती?
A) रामनगर
B) गुजरात
C) चिलीयनवाला
D) मुलतान
उत्तर:
B) गुजरात
44. दुसरे शीख युद्ध कधी संपले?
A) १३ मार्च १८४९
B) १९ एप्रिल १८४८
C) २२ नोव्हेंबर १८४८
D) १५ ऑगस्ट १८४९
उत्तर:
A) १३ मार्च १८४९
45. दुसऱ्या शीख युद्धाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?
A) लॉर्ड कॅनिंग
B) लॉर्ड डलहौसी
C) लॉर्ड हेस्टिंग्ज
D) लॉर्ड वेलेजली
उत्तर:
B) लॉर्ड डलहौसी
46. दुसऱ्या शीख युद्धानंतर कोणता प्रांत ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात
आला?
A) सिंध
B) अवध
C) पंजाब
D) म्हैसूर
उत्तर:
C) पंजाब
47. दिलीपसिंगला युद्धानंतर काय देण्यात आले?
A) जहागीर
B) पेन्शन
C) मोठी फौज
D) पंजाबचे राज्य
उत्तर:
B) पेन्शन
48. पंजाबचा कमिश्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
A) लॉर्ड लॉरेन्स
B) लॉर्ड डलहौसी
C) सर ह्यू गॉफ
D) नेपीयर
उत्तर:
A) लॉर्ड लॉरेन्स
49. दुसऱ्या शीख युद्धानंतर कोणत्या सत्तेचा अंत झाला?
A) मराठा सत्ता
B) शीख सत्ता
C) म्हैसूर सत्ता
D) राजपूत सत्ता
उत्तर:
B) शीख सत्ता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा