पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली
पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली :
1. भूकंप
2.ज्वालामुखी
पृथ्वीच्या अंतरंगातील
हालचालींमुळे निर्माण
होणाऱ्या अस्थिरतेतून
भूकंप व
ज्वालामुखी या
घटना घडतात.
भूपृष्ठांतर्गत हालचाली
:
मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात. प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थांतून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जालहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात.
अंतर्गत भू-हालचालींचे
वर्गीकरण
1) गती
2) दिशा 3) भूरूपे
1) गती
(अ) मंद भू-हालचाली (सातत्याने होणाऱ्या) उदा. पर्वत व खंडांची निर्मिती.
(अ) पर्वतनिर्माणकारी हालचाली उदा. वली पर्वत, गट पर्वत
(ब) खंडनिर्माणकारी हालचाली
(ब) शीघ्र भू-हालचाली (घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या) उदा. भूकंप, ज्वालामुखी.
2) दिशा
(अ) क्षितिजसमांतर भू-हालचाली.
(ब) ऊर्ध्वगामी, अधोगामी भू-हालचाली,
3) भूरूपे
(अ) खंडजन्य (भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण करणाऱ्या)
(ब) पर्वतजन्य (वलीकरण, प्रस्तरभंग क्रिया)
अंतर्गत भू-हालचालीं
1) गती
अ. मंद भू- हालचाली
(अ) पर्वतनिर्माणकारी हालचाली
वली
पर्वत :
पृथ्वीच्या
अंतर्गत भागातून
वाहणाऱ्या ऊर्जालहरींमुळे
मृदू खडकांच्या
थरावर क्षितिजसमांतर
व एकमेकांच्या
दिशेने तीव्र
दाब पडत असल्याने
वळ्या मोठ्या
प्रमाणात पडून
गुंतागुंत वाढते.
परिणामी पृष्ठभाग
उचलला जाऊन
वली पर्वतांची
निर्मिती होते.
उदा., हिमालय,
अरवली, रॉकी,
अँडीज, आल्प्स
गट
पर्वत:
दोन
समांतर विभंगाने
भूकवचाचा भाग
जेव्हा वर
उचलला जातो,
तेव्हा हा
उचलला गेलेला
भाग ठोकळ्याप्रमाणे
दिसतो. असा
भूभाग गट
पर्वत म्हणून
ओळखला जातो.
गट पर्वतांची वैशिष्ट्ये:
1. ठोकळ्याप्रमाणे दिसतो
2. माथा सपाट असतो.
3. सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात.
4. उतार तीव्र असतात.
उदा. युरोपमधील
ब्लॅक फॉरेस्ट
पर्वत, भारतातील
मेघालय पठार
विभंग :
अंतर्गत हालचालींमुळे
क्षितिजसमांतर व
एकमेकांपासून दूर
जाणाऱ्या ऊर्जालहरी
निर्माण होत
असताना खडकांवर
ताण पडून
खडकांना तडे
पडतात. हे
तडे विभंग
म्हणून ओळखले
जातात.
खचदरी:
अंतर्गत हालचालींमुळे
कधीकधी भूकवचाला
ताण पडून
समोरासमोर दोन
तडे पडतात.
त्या दोन तड्यांदरम्यानचा
भूभाग खचतो.
असा खचलेला
खोलगट भाग
म्हणजेच खचदरी
होय. खचदरीचे
दोन्ही बाजूंचे
उतार तीव्र
असतात.
उदा. भारतातील
नर्मदा नदीची
खचदरी, आफ्रिका
खंडातील ग्रेट
रिफ्ट व्हॅली,
युरोपमधील न्हाईन
नदीची खचदरी
इत्यादी.
(ब) खंडनिर्माणकारी हालचाली:
मंद भू- हालचाली
पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात. या हालचालींमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्रसपाटी पासून वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते, म्हणून या भू- हालचाली खंडनिर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते.
सागरतळ:
मंद भू- हालचालींमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते; परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्रसपाटीच्या खाली जातो. अशा वेळी तो भू-भाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागरतळाचा भाग बनतो.
ब) शीघ्र
भू- हालचाली
1)भूकंप: भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे होय. भूकंप ही भूकवचाची हालचाल आहे.
भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो.
भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंपमापन यंत्राने मोजतात.
भूकंपाची कारणे :
1. भूपट्ट सरकणे.
2. भूपट्ट एकमेकांवर आदळणे.
3. भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे.
4. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे.
5. ज्वालामुखींचे उद्रेक होणे.
पृथ्वीचे कवचाच्या भूपट्टांची नावे
1.भारत-ऑस्ट्रेलिया,
2.आफ्रिका,
3.युरेशिया,
4.उत्तर अमेरिका,
5.दक्षिण अमेरिका,
6.पॅसिफिक
7.अंटार्क्टिका
भूकंपनाभी :
भूपृष्ठाखाली सतत
मोठ्या प्रमाणात
होणार्या हालचालींमुळे
ताण निर्माण
होवून तो
साचून राहतो.
हा ताण भूपृष्ठावर
भूकवचात ज्या
ठिकाणी मोकळा
होतो, त्या
ठिकाणी मोठ्या
प्रमाणात ऊर्जेचे
उत्सर्जन होते.
तेथे भूकंपाचे
केंद्र असते.
या केंद्रास
भूकंपनामी असे
म्हणतात.
भूकंप अपिकेंद्र
:
भूकंपनामी केंद्रातून
ऊर्जालहरी भूपृष्ठावर
जेथे सर्वात
प्रथम पोहचतात
तेथे भूकंपाचा
धक्का सर्वात
प्रथम जाणवतो.
भूपृष्ठावरील अशा
केंद्रास भूकंपाचे
अपिकेंद्र म्हणतात.
भूकंपाचे अपिकेंद्र
हे भूकंपनाभीपासूनचे
भूपृष्ठावरील सर्वात
जवळचे ठिकाण
असते.
भूकंपाचे अपिकेंद्र
हे भूकंपनाभीशी
लंबरूप असते.
भूकंप लहरी
:
भूकंपनाभीकडून ताण
मुक्त झाल्यावर,
ऊर्जा मुक्त
होते ही ऊर्जा
म्हणजे भूकंप
लहरी.
भूकंप लहरींचे
प्रकार
(१) प्राथमिक लहरी, (२) दुय्यम लहरी, (३) भूपृष्ठ लहरी
(१) प्राथमिक लहरी
(Primary or 'P' Waves):
1. भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात.
2. भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या स्वरूपात सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने प्रवास करतात.
3. प्राथमिक लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात, त्यामुळे प्राथमिक लहरींना पुढे-मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात.
4. घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात.
5. द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो.
6. भूपृष्ठावरील इमारती पुढे-मागे हलतात.
(२) दुय्यम लहरी
(Secondary or 'S' Waves):
1. प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहचणाऱ्या लहरी
2. दुय्यम लहरींचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो.
3. दुय्यम लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात.
4. फक्त घनपदार्थातून प्रवास करतात.
5. द्रवपदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात.
5. दुय्यम लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात.
6. प्राथमिक लहरीपेक्षा दुय्यम लहरी अधिक विध्वंसक असतात.
(३) भूपृष्ठ लहरी
(Surface of 'L' waves):
1. प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत (अपिकेंद्र) येऊन पोहचल्यानंतर भूपृष्ठ लहरींची निर्मिती होते.
2. भूपृष्ठ लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात.
3. भूपृष्ठ लहरी अतिशय विनाशकारी असतात.
भूकंपाचे परिणाम :
1. जमिनीला तडे पडतात.
2. भूमिपात होऊन दरडी कोसळतात.
3. काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदा. विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.
4. काही प्रदेश उंचावले जातात, तर काही प्रदेश खचतात.
5. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लाटांमुळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.
6. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात.
7. इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते.
8. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात.
9. संदेशवहन व्यवस्था कोलमडते.
शीघ्र भू-
हालचाली
2) ज्वालामुखी :
पृथ्वीच्या प्रावरणातून
तप्त असे द्रव,
घन आणि वायुरूप
पदार्थ पृथ्वीपृष्ठावर
फेकले जातात.
ही क्रिया
म्हणजे ज्वालामुखीचा
उद्रेक होय.
ज्वालामुखीची क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात.
भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते.
ज्वालामुखींचे वर्गीकरण :
अ) ज्वालामुखीचे
उद्रेकाच्या स्वरूपानुसार
प्रकार
ब) उद्रेकाच्या
कालावधीनुसार प्रकार
उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखी प्रकार
(१) केंद्रीय ज्वालामुखी, (२) भेगीय ज्वालामुखी
उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखी प्रकार
1) जागृत ज्वालामुखी, 2) सुप्त / निद्रिस्त ज्वालामुखी, 3) मृत ज्वालामुखी
उद्रेकाच्या स्वरूपानुसार
ज्वालामुखी
(१) केंद्रीय ज्वालामुखी, (२) भेगीय ज्वालामुखी
1) केंद्रीय ज्वालामुखी:
उद्रेकाच्या वेळी
शिलारस भूपृष्ठांतर्गत
मोठ्या नलिकेसारख्या
भागातून वर
येतो. बाहेर
आलेला लाव्हारस
या नलिकेच्या
मुखाभोवती पसरतो,
त्यामुळे शंकूच्या
आकाराचे ज्वालामुखी
पर्वत तयार
होतात.
उदा.
1) जपानमधील - फुजियामा,
2) टांझानियातील - किलीमांजारो
शंकू पर्वत
:
केंद्रीय ज्वालामुखी
उद्रेकाच्या वेळी
शिलारस भूपृष्ठांतर्गत
मोठ्या नलिकेसारख्या
भागातून वर
येतो. बाहेर
आलेला लाव्हारस
या नलिकेच्या
मुखाभोवती पसरतो,
त्यामुळे शंकूच्या
आकाराचे ज्वालामुखी
पर्वत तयार
होतात.
२) भेगीय
ज्वालामुखी :
ज्वालामुखीचा उद्रेक
होताना लाव्हारस
ज्या वेळी
एखादया नलिकेऐवजी
अनेक तडांमधून
बाहेर पडतो,
त्याला भेगीय
ज्वालामुखी असे
म्हणतात.
ज्वालामुखीय पठारे
:
ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूंस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात.
उदा. भारतातील
दख्खनचे पठार
अशा पद्धतीच्या
ज्वालामुखीमुळे तयार
झाले आहे.
उद्रेकाच्या कालावधीनुसार
ज्वालामुखीचे तीन
प्रकार:
1) जागृत ज्वालामुखी, 2) सुप्त / निद्रिस्त ज्वालामुखी, 3) मृत ज्वालामुखी
1) जागृत ज्वालामुखी :
जो ज्वालामुखी वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय.
उदा. जपानचा
फुजियामा व
भूमध्य सागरातील
स्ट्रांबोली.
2) सुप्त / निद्रिस्त ज्वालामुखी :
काही काळासाठी
शांत असतो
व पुन्हा
कधीतरी एकदम
जागृत होतो.
उदा. इटलीतील
व्हेसुव्हियस, अलास्कातील
काटमाई, भारतातील
बॅरन बेट.
3) मृत ज्वालामुखी :
ज्यातून दीर्घकाळ
उद्रेक झालेला
नाही व भविष्यात
असा उद्रेक
होण्याची शक्यता
नाही.
उदा. टांझानियातील
किलीमांजारो.
भूपृष्ठनिर्मिती सीमा
सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येत असतात, अशा सीमांना भूपृष्ठनिर्मिती सीमा म्हणतात.
ज्वालामुखीचे परिणामः
1. जीवित व वित्तहानी होते,
2. महासागरात त्सुनामी लाटा निर्माण होतात,
3. ज्वालामुखीतून बाहेर पडणार्या धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटकांमुळे दीर्घकाळ पर्यावरणाचे संतुलन बिघडते.
4. जमीन सुपीक बनते.
5. खनिजे भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात.
6. नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते.
7. मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात.
बॅरन बेट
- जागृत ज्वालामुखी:
भारताच्या मुख्य
भूमीच्या आग्नेय
दिशेस बंगालच्या
उपसागरामध्ये अंदमान
आणि निकोबार
बेटांच्या समूहामधील
बॅरन बेटावर
भारतातील एकमेवजागृत
ज्वालामुखी गेली
कित्येक वर्षे
सुप्त अवस्थेत
होता; परंतु
फेब्रुवारी २०१७
पासून या
ज्वालामुखीचा उद्रेक
होत आहे
पृथ्वीच्या
अंतर्गत हालचाली
– MCQ प्रश्न
१. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे कोणत्या घटना घडतात?
A) पाऊस व वादळ
B) भूकंप व ज्वालामुखी
C) दुष्काळ व पूर
D) हिमवृष्टी व धुके
उत्तर: B) भूकंप व ज्वालामुखी
२. पृथ्वीचे परिवलन कोणत्या दिशेने होते?
A) पूर्वेकडून पश्चिमेकडे
B) उत्तर-दक्षिण
C) पश्चिमेकडून पूर्वेकडे
D) दक्षिण-उत्तर
उत्तर: C) पश्चिमेकडून पूर्वेकडे
३. अंतर्गत भू-हालचालींचे वर्गीकरण कोणत्या आधारांवर केले जाते?
A) गती, दिशा व भूरूपे
B) तापमान, दाब व पाऊस
C) उंची, खोली व रुंदी
D) माती, पाणी व हवा
उत्तर: A) गती, दिशा व भूरूपे
४. मंद भू-हालचाली कशा प्रकारच्या असतात?
A) अचानक होणाऱ्या
B) सातत्याने होणाऱ्या
C) फक्त समुद्रात होणाऱ्या
D) फक्त पर्वतांमध्ये होणाऱ्या
उत्तर: B) सातत्याने होणाऱ्या
५. मंद भू-हालचालींचे उदाहरण कोणते?
A) भूकंप
B) ज्वालामुखी
C) पर्वत व खंडांची निर्मिती
D) त्सुनामी
उत्तर: C) पर्वत व खंडांची निर्मिती
६. शीघ्र भू-हालचालींचे उदाहरण कोणते?
A) पर्वतनिर्मिती
B) खंडनिर्मिती
C) भूकंप व ज्वालामुखी
D) पठारनिर्मिती
उत्तर: C) भूकंप व ज्वालामुखी
७. वली पर्वतांची निर्मिती कशामुळे होते?
A) खडकांवर पडणाऱ्या क्षितिजसमांतर दाबामुळे
B) पावसामुळे
C) समुद्राच्या लाटांमुळे
D) वाऱ्यामुळे
उत्तर: A) खडकांवर पडणाऱ्या क्षितिजसमांतर दाबामुळे
८. खालीलपैकी वली पर्वताचे उदाहरण कोणते?
A) हिमालय
B) ब्लॅक फॉरेस्ट
C) मेघालय पठार
D) ग्रेट रिफ्ट व्हॅली
उत्तर: A) हिमालय
९. गट पर्वत कशामुळे तयार होतात?
A) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे
B) दोन समांतर विभंगांमधील भूभाग वर उचलल्यामुळे
C) नदीच्या क्षरणामुळे
D) हिमनद्यांमुळे
उत्तर: B) दोन समांतर विभंगांमधील भूभाग वर उचलल्यामुळे
१०. गट पर्वतांचा माथा साधारणपणे कसा असतो?
A) टोकदार
B) गोलाकार
C) सपाट
D) खोलगट
उत्तर: C) सपाट
११. खडकांना पडणारे तडे कोणत्या नावाने ओळखले जातात?
A) वळ्या
B) विभंग
C) पठार
D) खचदरी
उत्तर: B) विभंग
१२. दोन तड्यांदरम्यानचा भूभाग खचल्यास कोणते भूरूप तयार होते?
A) गट पर्वत
B) वली पर्वत
C) खचदरी
D) पठार
उत्तर: C) खचदरी
१३. भारतातील नर्मदा नदीची खचदरी कोणत्या भूरूपाचे उदाहरण आहे?
A) खचदरी
B) गट पर्वत
C) वली पर्वत
D) ज्वालामुखी पर्वत
उत्तर: A) खचदरी
१४. खंडनिर्माणकारी हालचालींमुळे काय निर्माण होऊ शकते?
A) खंड व विस्तीर्ण पठारे
B) फक्त नद्या
C) फक्त समुद्र
D) फक्त हिमनद्या
उत्तर: A) खंड व विस्तीर्ण पठारे
१५. ‘भूकंप’ या शब्दातील ‘भू’ म्हणजे काय?
A) पाणी
B) जमीन
C) हवा
D) पर्वत
उत्तर: B) जमीन
१६. ‘कंप’ म्हणजे काय?
A) थरथरणे
B) वाहणे
C) जळणे
D) खचणे
उत्तर: A) थरथरणे
१७. भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते?
A) सेल्सिअस
B) रिश्टर
C) किलोमीटर
D) पास्कल
उत्तर: B) रिश्टर
१८. खालीलपैकी भूकंपाचे कारण कोणते?
A) भूपट्टांचे सरकणे
B) पाऊस पडणे
C) वारे वाहणे
D) सूर्यप्रकाश
उत्तर: A) भूपट्टांचे सरकणे
१९. पृथ्वीच्या कवचाचे प्रमुख भूपट्ट किती दिले आहेत?
A) ५
B) ६
C) ७
D) ८
उत्तर: C) ७
२०. भूकंपनाभी म्हणजे काय?
A) भूपृष्ठावरील सर्वात उंच ठिकाण
B) भूपृष्ठाखाली ऊर्जा मुक्त होण्याचे केंद्र
C) समुद्रातील खोल भाग
D) पर्वताचे शिखर
उत्तर: B) भूपृष्ठाखाली ऊर्जा मुक्त होण्याचे केंद्र
२१. भूकंपनाभीच्या लंब दिशेने भूपृष्ठावर असलेल्या ठिकाणाला काय म्हणतात?
A) भूकंपनाभी
B) अपिकेंद्र
C) विभंग
D) सागरतळ
उत्तर: B) अपिकेंद्र
२२. भूकंपाच्या लहरींचे प्रमुख किती प्रकार आहेत?
A) दोन
B) तीन
C) चार
D) पाच
उत्तर: B) तीन
२३. खालीलपैकी भूकंप लहरींचा प्रकार कोणता नाही?
A) प्राथमिक लहरी
B) दुय्यम लहरी
C) भूपृष्ठ लहरी
D) वायू लहरी
उत्तर: D) वायू लहरी
२४. सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरी कोणत्या?
A) S लहरी
B) L लहरी
C) P लहरी
D) भूपृष्ठ लहरी
उत्तर: C) P
लहरी
२५. प्राथमिक लहरींना कोणत्या नावानेही ओळखले जाते?
A) P Waves
B) S Waves
C) L Waves
D) T Waves
उत्तर: A) P
Waves
२६. प्राथमिक लहरी कोणत्या माध्यमातून प्रवास करू शकतात?
A) फक्त घन
B) फक्त द्रव
C) घन, द्रव व वायू
D) फक्त वायू
उत्तर: C) घन, द्रव व वायू
२७. दुय्यम लहरी कोणत्या माध्यमातून प्रवास करतात?
A) फक्त घन
B) फक्त द्रव
C) घन व द्रव
D) घन, द्रव व वायू
उत्तर: A) फक्त घन
२८. दुय्यम लहरींचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कसा असतो?
A) अधिक
B) कमी
C) समान
D) निश्चित नसतो
उत्तर: B) कमी
२९. सर्वाधिक विनाशकारी भूकंप लहरी कोणत्या?
A) प्राथमिक लहरी
B) दुय्यम लहरी
C) भूपृष्ठ लहरी
D) ध्वनी लहरी
उत्तर: C) भूपृष्ठ लहरी
३०. भूकंपामुळे समुद्रात कोणत्या लाटा निर्माण होऊ शकतात?
A) भरतीच्या लाटा
B) त्सुनामी
C) ध्वनी लाटा
D) वाऱ्याच्या लाटा
उत्तर: B) त्सुनामी
३१. ज्वालामुखीचा उद्रेक म्हणजे काय?
A) पावसाचे पाणी बाहेर पडणे
B) पृथ्वीच्या प्रावरणातील तप्त पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाणे
C) नदीचा प्रवाह वाढणे
D) बर्फ वितळणे
उत्तर: B) पृथ्वीच्या प्रावरणातील तप्त पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाणे
३२. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला काय म्हणतात?
A) राख
B) लाव्हारस
C) गंधक
D) वाफ
उत्तर: B) लाव्हारस
३३. उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे किती प्रकार आहेत?
A) दोन
B) तीन
C) चार
D) पाच
उत्तर: A) दोन
३४. केंद्रीय ज्वालामुखीमध्ये शिलारस कशातून वर येतो?
A) अनेक तड्यांतून
B) मोठ्या नलिकेसारख्या भागातून
C) नदीतून
D) समुद्राच्या लाटांमधून
उत्तर: B) मोठ्या नलिकेसारख्या भागातून
३५. केंद्रीय ज्वालामुखीमुळे कोणत्या आकाराचे पर्वत तयार होतात?
A) सपाट
B) शंकूच्या आकाराचे
C) गोलाकार
D) खोलगट
उत्तर: B) शंकूच्या आकाराचे
३६. फुजियामा हा कोणत्या देशातील ज्वालामुखी आहे?
A) भारत
B) जपान
C) इटली
D) टांझानिया
उत्तर: B) जपान
३७. ज्वालामुखीचा लाव्हारस अनेक तड्यांमधून बाहेर पडल्यास त्याला काय म्हणतात?
A) केंद्रीय ज्वालामुखी
B) भेगीय ज्वालामुखी
C) मृत ज्वालामुखी
D) सुप्त ज्वालामुखी
उत्तर: B) भेगीय ज्वालामुखी
३८. भेगीय ज्वालामुखीमुळे कोणते भूरूप तयार होऊ शकते?
A) ज्वालामुखीय पठार
B) खचदरी
C) गट पर्वत
D) वली पर्वत
उत्तर: A) ज्वालामुखीय पठार
३९. भारतातील दख्खनचे पठार कोणत्या प्रकारच्या ज्वालामुखीय क्रियेशी संबंधित आहे?
A) केंद्रीय
B) भेगीय
C) सुप्त
D) मृत
उत्तर: B) भेगीय
४०. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे किती प्रकार आहेत?
A) दोन
B) तीन
C) चार
D) पाच
उत्तर: B) तीन
४१. वर्तमानात वारंवार उद्रेक होणाऱ्या ज्वालामुखीला काय म्हणतात?
A) मृत
B) सुप्त
C) जागृत
D) शांत
उत्तर: C) जागृत
४२. काही काळ शांत राहून पुन्हा उद्रेक होणाऱ्या ज्वालामुखीला काय म्हणतात?
A) जागृत
B) सुप्त/निद्रिस्त
C) मृत
D) भेगीय
उत्तर: B) सुप्त/निद्रिस्त
४३. दीर्घकाळ उद्रेक न झालेल्या व भविष्यात उद्रेकाची शक्यता नसलेल्या ज्वालामुखीला काय म्हणतात?
A) जागृत
B) सुप्त
C) मृत
D) केंद्रीय
उत्तर: C) मृत
४४. खालीलपैकी सुप्त ज्वालामुखीचे उदाहरण कोणते?
A) व्हेसुव्हियस
B) किलीमांजारो
C) ग्रेट रिफ्ट व्हॅली
D) हिमालय
उत्तर: A) व्हेसुव्हियस
४५. किलीमांजारो कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी मानला जातो?
A) जागृत
B) सुप्त
C) मृत
D) भेगीय
उत्तर: C) मृत
४६. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे खालीलपैकी कोणता सकारात्मक परिणाम होऊ शकतो?
A) जमीन सुपीक बनते
B) संदेशवहन बंद होते
C) जीवितहानी होते
D) पर्यावरणाचे संतुलन बिघडते
उत्तर: A) जमीन सुपीक बनते
४७. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे खालीलपैकी काय निर्माण होऊ शकते?
A) नवभूमी
B) फक्त वाळवंट
C) फक्त हिमनद्या
D) फक्त नद्या
उत्तर: A) नवभूमी
४८. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोणता आहे?
A) फुजियामा
B) बॅरन बेट
C) किलीमांजारो
D) व्हेसुव्हियस
उत्तर: B) बॅरन बेट
४९. बॅरन बेट कोठे आहे?
A) अरबी समुद्रात
B) बंगालच्या उपसागरात
C) हिंदी महासागराच्या पश्चिम भागात
D) भूमध्य समुद्रात
उत्तर: B) बंगालच्या उपसागरात
५०. भूपृष्ठनिर्मिती सीमा म्हणजे काय?
A) ज्या सीमांवर समुद्र तयार होतो
B) ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येते
C) ज्या सीमांवर पाऊस पडतो
D) ज्या सीमांवर पर्वत नाहीत
उत्तर: B) ज्या सीमांच्या क्षेत्रात नवीन भूपृष्ठ आकाराला येते
लेबल: भूगोल, स्पर्धा परीक्षा

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ