रोहिल्यांचा इतिहास

 रोहिल्यांचा इतिहास

रोहिलखंड हा प्रदेश दिल्ली आणि अवध यांच्या दरम्यान होता. दिल्लीच्या राजकारणात रोहिले आणि मराठे हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. मराठ्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी नजीबखान रोहिलाने अहमदशहा अब्दालीला भारतात बोलावले. त्यामुळे इ.स. 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली आणि मराठ्यांचा पराभव झाला.

इ.स. 1771 मध्ये महादजी शिंदे यांनी दिल्ली जिंकली आणि 1772 मध्ये शाह आलम दुसरा याला पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसवले. त्यानंतर मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केली. अवधच्या नबाबाने रोहिल्यांना मदत केली; परंतु रोहिल्यांनी ठरलेले 42 लाख रुपये दिले नाहीत.

यामुळे अवधच्या नबाबाने ब्रिटिशांची मदत मागितली. वॉरन हेस्टिंग्जच्या संमतीने ब्रिटिश सैन्याने रोहिलखंडावर आक्रमण केले. हफीज रहमतखान युद्धात मारला गेला आणि रोहिलखंड अवधमध्ये विलीन करण्यात आला. पुढे इ.स. 1856 मध्ये अवध ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाल्यावर रोहिलखंडही ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

वास्तुनिष्ट बहुपर्यायी प्रश्न

1.      रोहिलखंड हा प्रदेश कोणाच्या दरम्यान होता?

A)     बंगाल–बिहार

B)     दिल्ली–अवध

C)      पंजाब–काश्मीर

D)     गुजरात–राजस्थान

उत्तर B) दिल्ली–अवध

2.      अहमदशहा अब्दालीला भारतात कोणी बोलावले?

A)     महादजी शिंदे

B)     नजीबखान रोहिला

C)      शाह आलम

D)     शुजाउद्दौला

उत्तर नजीबखान रोहिला

3.      पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?

A)     1757

B)     1761

C)      1764

D)     1771

उत्तर 1761

4.      दिल्ली इ.स. 1771 मध्ये कोणी जिंकली?

A)     नजीबखान

B)                 महादजी शिंदे

C)      क्लाइव्ह

D)     वॉरन हेस्टिंग्ज

उत्तर महादजी शिंदे

5.      शाह आलम दुसरा याला पुन्हा दिल्लीच्या गादीवर कधी बसवले?

A)     1761

B)     1772

C)      1775

D)     1780

उत्तर 1772

6.      रोहिलखंड–अवध तहानुसार किती लाख रुपये देण्याचे ठरले होते?

A)     30 लाख

B)     42 लाख

C)      50 लाख

D)     60 लाख

उत्तर 42 लाख

7.      रोहिल्यांविरुद्ध ब्रिटिश सैन्य पाठविण्यास संमती कोणी दिली?

A)     क्लाइव्ह

B)     वॉरन हेस्टिंग्ज

C)      कॉर्नवॉलिस

D)     वेलस्ली

उत्तर वॉरन हेस्टिंग्ज

8.      हफीज रहमतखान याचा शेवट कसा झाला?

A)     कैद झाला

B)     युद्धात मारला गेला

C)      पळून गेला

D)     राजा झाला

उत्तर युद्धात मारला गेला

9.      रोहिलखंड कोणत्या प्रांतात विलीन करण्यात आला?

A)     बंगाल

B)     पंजाब

C)      अवध

D)     बिहार

उत्तर अवध

10.  अवध आणि रोहिलखंड ब्रिटिश साम्राज्यात कधी विलीन झाले?

A)     1803

B)     1856

C)      1857

D)     1764

उत्तर 1856

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

निवडणूक प्रक्रिया इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

राजकीय पक्ष इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र