बुधवार, १९ जानेवारी, २०२२

Use `used to`

 Use `used to`

आज आपण `used to`कसे वापरावे याचा आपण अभ्यास करणार आहोत.


Use `used to` ची ओळख करून घेऊ या 

'used to` वैशिष्ट्ये पूर्ण सहाय्य्करी क्रियापद आहे.

`used to` चे  भूतकाळातील एकच  रूप आहे त्याचे वर्तमान व भविष्यकाळी रूप नाही.

`used to'  वापरून बनवलेले वाक्य Simple Past Tense साधा भूतकाळातील असते.


`used to` चे उपयोग

1. भूतकाळातील सुटलेली सवय सांगण्यासाठी करतात.

2. एखादी गोष्ट भूतकाळात होती परंतु आज नाही हे सांगण्यासाठी करतात.                                            3. भूतकाळातील नित्य नैमित्तिक क्रिया/सवय/रीत/पद्धत सांगण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी करतात.

4. Simple Past Tense साधा भूतकाळ बनवण्यासाठी.

 5. `Would / could` यांना 'used to' हे पर्यायी म्हणून वापरले जाते.


`used to` कसे वापरावे?

दिलेल्या वाक्यात used to वापरताना मुख्य क्रियापदा पूर्वी used to लिहावे दिलेल्या वाक्यातील ज्या क्रियापदा पूर्वी used to लिहिले त्या क्रियापदाचे वर्तमान काळातील रूप वापरावे.

Students went school.

या वाक्यात मुख्य क्रियापद go चे भूतकाळातील रूप went आहे, went या क्रियापद पूर्वी used to चा वापर करूया आणि used to नंतर went चे वर्तमान काळातील रूप go लिहिले. पुढील वाक्य जसे च्या तसे लिहिले.

Students used to go school.


Examples:

1. They sang songs.

They used to sing songs.

2 . We drank milk.

We used to drink milk.

3. You read story.

You used to read story.

4. He wrote letter.

He used to write letter.


Would / could` यांना 'used to' हे पर्यायी म्हणून वापरले जाते.

दिलेल्या वाक्यात जेथे Would / could लिहिले आहे तेथे used to लिहावे त्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदाचे वर्तमान काळातील रूप वापरावे, वाक्य जसेच्या तसे लिहावे.


Examples:

1. She could draw sketch.

She used to draw sketch.

2. They could run very fast.

They used to run very fast.

3. He would walk in morning.

He used to walk in morning.

4. We would see sea.

We used to see sea.

5. She would give food.

She used to give food.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...