वर्ण व वर्णमाला
वर्ण व वर्णमाला वर्णांचे प्रकार (१) स्वर : १) र्हस्व स्वर, २) दीर्घ स्वर, ३) संयुक्त स्वर, ४) सजातीय स्वर, ५) विजातीय स्वर (२) स्वरादी : (३) व्यंजने : १) स्पर्श व्यंजने : १) कठोर व्यंजने, २) मृदू व्यंजने, ३) अनुनासिक व्यंजने २) अर्धस्वर (३) उष्मे - घर्षक व्यजने ४) महाप्राण व्यंजने ५) अल्पप्राण व्यंजने ६) स्वतंत्र वर्ण ७) जोडाक्षरे. वाक्य :- आपण बोलतो म्हणजे अर्थपूर्ण वाक्याच्याद्वारे संवाद करत असतो. हा संवाद एक एक अक्षरांचा किंवा एक एक शब्दांचा नसुन तर आपण अर्थपूर्ण शब्दांच्या समुहाने संवाद करतो. हा शब्द समुह म्हणजे वाक्य होय. वाक्य हे एक वा अनेक शब्दांचे बनलेले असते. शब्द :- वाक्यात असलेले शब्द हे अनेक अक्षरांचे बनलेले असतात. शब्दातील अक्षरांच्या समूहाला विशिष्ठ क्रम असतो व त्या समुहातून विशेष अर्थ बोध होत असतो. अक्षरांच्या अर्थपूर्ण समुह म्हणजे शब्द ह...