इंग्रज-शीख संबंध (१८०९–१८४९)
इंग्रज-शीख संबंध (१८०९–१८४९) अमृतसरचा तह (१८०९) रणजितसिंग आणि इंग्रजांमध्ये मैत्री झाली. रणजितसिंगाने सतलजच्या पूर्वेकडे साम्राज्यविस्तार न करण्याचे मान्य केले. सर चार्ल्स मेटकाफने मध्यस्थी केली. रणजितसिंगाचा पश्चिमेकडील विस्तार पूर्वेकडे विस्तारास मर्यादा असल्याने रणजितसिंगाने पश्चिमेकडे विस्तार केला. मुलतान , डेरा , काश्मीर आणि पेशावर जिंकले. इंग्रजांचे बदलते धोरण १८२२ नंतर इंग्रज रणजितसिंगाच्या हालचालींवर सावधपणे लक्ष ठेवू लागले. रणजितसिंगानेही इंग्रजांशी संघर्ष टाळला. इंग्रजांना रणजितसिंगाची भीती रणजितसिंगाने नेपाळ , बाजीराव दुसरा आणि नागपूरच्या भोसल्यांना मदत केली नाही. इंग्रज इतर युद्धांत गुंतले असतानाही त्याने त्याचा फायदा घेतला नाही. सिंधचा प्रश्न रणजितसिंगाला सिंध आणि विशेषतः शिकारपूर जिंकायचे होते. इंग्रजांना सिंधवर रणजितसिंगाचे वर्चस्व नको होते. रूपारची भेट (१८३१) सर विल्यम बेंटिंक आणि रणजितसिंग यांची रूपार येथे भेट झाली. रणजितसिंगाने इंग्रजांच्या सिंधमधील व्यापारी धोरणाला विरोध केला नाही. पेशावरचा विजय (१...