इयत्ता १० वी इतिहास पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : १ भारताच्या प्राचीन काळातील इतिहासलेखना विषयाची माहिती लिहा . १ प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम , दैवतपरंपरा , सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या . २ हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारताम ध्ये लेखनकला इसवी सना पूर्वी तिसऱ्या सहस्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती . ३ भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातील मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतका तील आहे . ४ सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत . ५ इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी , मूर्ती आणि शिल्पे , ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध आहे यांमधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते . ६ या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ , वंशावळ , राज्यविस्तार , तत्कालीन शासनव्यवस्...