Plural अनेकवचन
Noun चे अनेकवचन plural करणे हे
शुल्लक असले तरी महत्त्वाचे आहे
सहज एखाद्या noun चे plural बनवण्यास सांगितले तर आपण
's' प्रत्यय लावतो पण कधी
कधी त्याचे plural वेगळेच असते, मग plural नक्की कसे
तयार करावे? त्यासाठी plural बनवण्याचे नियम जाणून घेऊ
आणि अभ्यास करू.
अनेकवचन तयार करण्याचे नियम
S प्रत्यय लावून अनेकवचन तयार करणे
1. बहुतेक
एकवचनी नामाला
‘S’ हा
प्रत्यय लावून
त्याचे अनेकवचन
तयार होते.
Pen – Pens, Hand – Hands, Tale – Tales, Rat – Rats, Room – Rooms
2. नामाच्या
शेवटी
y असून त्यापूर्वी
एखादा स्वर
(a, e, i, o, u) येत
असेल तर
त्या नामाचे
अनेकवचनसुद्धा
S जोडूनच होते.
Boy – Boys, Day – Days, Key - Keys
3.
मात्र नामाच्या
शेवटी 'O' असून त्यापूर्वी
स्वर असेल
तर अनेकवचन
करताना फक्त
s लावतात
Radio – Radios, Studio – Studios, Cuckoo - Cuckoos
4. नामाच्या
शेवटी 'O' स्वर
असून त्यापूर्वी
व्यंजन असेल त्या व्यंजनापुर्वी स्वर
असेल तर
अनेकवचन करताना
फक्त
s लावतात
Photo – Photos, Kilo – Kilos, Piano – Pianos, Dynamo - Dynamos
5. Collective nouns चे लावून अनेकवचन करतात.
team – teams, herd –
herds, bouquet - bouquets
‘es’ प्रत्यय लावून अनेकवचन तयार करणे
ज्या नामाच्या
शेवटी
s, sh, ch, ss, o, x
किंवा
z यापैकी
अक्षर येत
असेल तर
त्या नामाचे
अनेकवचन करताना
es प्रत्यय लावतात.
Bus – Buses, Dish – Dishes, Box – Boxes, Class – Classes, Bench – Benches, Potato – Potatoes, Hero – Heroes, Buffalo – Buffaloes
'ies' प्रत्यय लावून अनेकवचन तयार करणे:
मात्र नामाच्या
शेवटी
y असून त्यापूर्वी
व्यंजन असेल
(म्हणजे स्वर
नसेल तर
त्या
y चा लोप
होतो आणि
y च्या जागी
ies वापरून त्या
नामाचे अनेकवचन
बनते.
Story – Stories, City – Cities, Baby – Babies
‘ves’ प्रत्यय लावून अनेकवचन तयार करणे
1.
नामाच्या शेवटी
किंवा
fe ही अक्षरे
असल्यास किंवा
fe काढून टाकून
त्यांच्या जागीves
ही अक्षरे
घातली म्हणजे
त्या नामांचे
अनेकवचन तयार
होते.
Leaf – Leaves, calf – calves, knife – knives, leaf – leaves, Wife
– Wives, Shelf
– Shelves
2.
परंतु नामाच्या
शेवटी
f किंवा
fe असूनसुद्धा फक्त
जोडून अनेकवचने
होणारी
(म्हणजे वरील
नियमास अपवाद
असणारी नामे).
Roof – Roofs, Safe – Safes, Chief – Chiefs, Cliff – Cliffs,
Handkerchief – Handkerchiefs, gulf – gulfs
नामातील स्वरात
बदल करून
काही नामांचे
अनेकवचन तयार
होते.
Man – Men, Foot – Feet, Mouse – Mice, tooth – teeth
स्वरात बदल
होऊन
en प्रत्यय जोडून
काही नामाचे
अनेकवचन तयार
होते.
Child – Children, Ox – Oxen, Kit – Kitten
नामाच्या शेवटी
man हा शब्द
असेल तर
त्याचे अनेकवचन
man च्या ऐवजी
men वापरून बनते.
Postman – Postmen, Milkman – Milkmen, Gentleman – Gentlemen
काही नामांची
एकवचनी व
अनेकवचनी रूपे
सारखीच
(एकच)
असतात.
Deer – Deer, Sheep – Sheep, Swine – Swine, cod – cod,
aircraft – aircraft, equipment
– equipment, spacecraft – spacecraft, trout – trout, series – series
काही नामे
मोजण्यासाठी वापरली
जातात व
त्यामुळे नेहमी
अनेक वचनातच
वापरतात
Dozen, Hundred, pair.
काही समुदायवाचक
नामे एकवचनी
दिसत असली
तरी नेहमी
अनेकवचनीच असतात.
Cattle, people, poultry.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा