मराठी व्याकरण
संधी - विसर्गसंधी
'विसर्ग' हा स्वतंत्र स्वर नसून तो 'स्वरादी' आहे त्यामुळे कोणत्या तरी स्वरानंतर तो येतो.
विसर्गसंधी मध्ये एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्गसंधी असे म्हणतात.
प्रकार व नियम
(१) विसर्ग उकार संधी
पोटशब्द एकत्र येणारे स्वर, विसर्ग व संधी
शब्दांमध्ये, शेवटी विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर आला असता (अविसर्ग = अः) दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मृदू व्यंजन आला त्यामुळे विसर्गाचा 'उ' झाला व तो मागील 'अ' मध्ये मिसळून. (अ+उ =ओ) त्याचा 'ओ' स्वर होऊन तो त्यातील व्यंजनामध्ये मिसळतो.
उदा.
पोट शब्द संधी जोडशब्द
१) यश: + धन =
श + अ + : + धन + श् + ओ + धन = यशोधन
२) मनः+रंजन =
न् + अ + : + रंजन = न् + ओ + रजन = मनोरंजन
३) अधः वंदन =
ध् + अ + : + वदन = ध् + ओ + वंदन = अधोवंदन
४) तेजः + निधी
ज् + अ + : + निधी = ज् + ओ + निधी = तेजोनिधी
(२) 'विसर्ग-र-संधी'
विसर्गाच्या मागे 'अ', 'आ' खेरीज कोणताही स्वर आला व पुढे मृदू वर्ण असेल तर या ठिकाणी विसर्गाचा 'र' होऊन तो पुढील वर्णात मिसळतो.
उदा.
पोट शब्द संधी जोडशब्द
१) निः + अंतर
(न) + इ + : + अं = नि + रं = निरंतर
२) दुःजन
(द्) + उ + : + जन = (दु) + ज = दुर्जन
४) बहिः + अंग
(ह्) + इ + : + अं= (हि)+रं = बहिरंग
मात्र
'विसर्ग-र-संधी'च्या नियमाप्रमाणे विसर्गाचा 'र' झाला पण दुसर्या शब्दाचे पहिले अक्षर सुध्दा 'र' हा वर्ण आल्यास त्या 'र' चा लोप होतो व त्याच्यामागील स्वर र्व्हस्व असल्यास दीर्घ होतो.
उदा.
१) निः + रस = नि: + र्रस = नीरस,
२) निः + रख = निः + र्रव= नीरव
(३) पहिल्या शब्दाच्या शेवटी 'स' येतो व दुसर्या शब्दाचे पहिले अक्षर कोणतेही व्यंजन आल्यास 'स्' चा विसर्ग होतो.
उदा.
१) मनस् + पटल = मनःपटल
२) तेजस् + कण = तेजःकण
(४) पहिल्या शब्दाच्या शेवटी 'र' येऊन व दुसर्या शब्दाचे पहिले अक्षर कठोर व्यंजन आल्यास त्या 'र' चा विसर्ग होतो.
उदा.
१) अंतर् + करण = अंतःकरण
२) चतुर् + सूत्री = चतु:सूत्री
(५) पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गाच्या ऐवजी ' र्' आला व त्याच्या मागे 'अ' स्वर असल्यास व दुसर्या शब्दाचे पहिले अक्षर मृदू वर्ण आल्यास तो 'र' तसाच राहतो.
उदा.
१) पुनर् + जन्म = पुनर्जन्म
२) अंतर् + आत्मा = अंतरात्मा
(६) पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असेल व दुसर्या शब्दाच्यापुढे क, ख, प, फ यांपैकी एखादे व्यंजन आले तर विसर्ग कायम राहतो.
उदा.
१) प्रातः + काल = प्रातःकाल
२) तेज: + पुंज = तेज:पुंज
मात्र
पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गाच्या मागे 'अ' हा स्वर असेल व व दुसर्या शब्दाच्यापुढे अन्य स्वर आला तर विसर्ग लोप पावतो.
उदा.
१) अतः + एव = अतएव
२) इत: + उत्तर = इतउत्तर
(७) पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गाच्या मागे 'इ' किंवा 'उ' असेल व दुसर्या शब्दाचे पहिले अक्षर क, ख, प, फ यांपैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाचा 'ष' होतो.
उदा.
१) निः + कारण = निष्कारण
२) निः + पाप = निष्पाप
३) दु: + परिणाम = दुष्परिणाम
४) दुः + कृत्य = दुष्कृत्य
५) दु: + कीर्ती = दुष्कीर्ती
६) बहि: + कृत = बहिष्कृत
(अपवाद- दुः + ख = दुःख, निः + पक्ष = निःपक्ष)
(८) पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असतो व दुसऱ्या शब्दाचे पहिले अक्षर 'च्', 'छ्' असेल तर विसर्गाचा 'श्' होतो आणि 'त्', 'थ्' आल्यास विसर्गाचा 'स' होतो.
उदा.
१) निः + चल = निश्चल
२) दुः + चिन्ह = दुश्चिन्ह
३) मनः + ताप = मनस्ताप
४) निः + तेज = निस्तेज
(९) पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्गा असतो व पुढे दुसऱ्या शब्दाचे पहिले अक्षर 'श', 'स्' आल्यास विसर्ग विकल्पाने कायम राहतो; किंवा लोप पावतो.
उदा.
१) दुः + शासन = दुःशासन (दुश्शासन)
२) निः + संदेह = निःसंदेह (निस्संदेह)
मराठीचे विशेष संधी
१) पूर्वरूप संधी
दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यांतील पहिला शब्दातील स्वर (= पूर्व स्वर) न बदलता तसाच राहतो व दूसर्या शब्दातील स्वर लोप पावतो.
उदा.
१. काही + असा = काहीसा,
२. खिडकी + आत = खिडकीत
३. किती + एक = कितीक
४. केले + असे = केलेसे
५. नदी + आत = नदीत
६. लाडू + आत = लाडूत
२) पररूप संधी
जेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसर्या शब्दातील स्वर (= पर स्वर) कायम राहतो.
उदा.
१. घर + ई = घरी
२. घाम + ओळे = घामोळे
३. एक + एक = एकेक,
४. न + उमजे = नुमजे,
५. कर + उन = करून
६. सांग + एन = सांगेन
३) दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराचा मागील स्वराशी बहुतकरून संधी होत नाही.
उदा.
१. जा + ऊन = जाऊन
२. घे + ईल = घेईल
३. हो + ऊ = होऊ
४) 'ही' या शब्दयोगी अव्ययाचा संख्याविशेषणाशी दोन प्रकारांनी संधी होतो.
(अ) 'ह' चा लोप न होता जसे - दोन + ही दोन्ही
(तिन्ही, चार्ही)
(ब) 'ह' चा लोप होऊन जसे - दोन + ही = दोनी
(तिनी, चारी)
५) 'अनुरूप', 'अनुसार' यांसारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होऊन मग पूर्वरूप संधी होतो.
उदा.
१. गरज + अनुरूप = गरजेनुरूप,
२. पद्धती + अनुसार = पद्धतीनुसार
(६) संधी हे तत्सम शब्दांत होतात. तरीही बोलण्याच्या ओघात मराठीत काही शब्द एकमेकांत मिसळून नवीन रूपे तयार होतात.
उदा.
१. येतो + आहे = येतोहे, येतोय
२. गेली + आहे= गेलीहे, गेलीय
३. बसला + आहात = बसलाहात = बसलात
Sir समास टाका 10th marathi che
उत्तर द्याहटवा