मराठी व्याकरण
संधी - व्यंजनसंधी
व्यंजनसंधी प्रकारामध्ये जवळ येणाऱ्या शब्दांतील दोन वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तेव्हा त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात.
व्यंजन + व्यंजन
व्यंजन + स्वर
व्यंजनसंधी संबंधीचे नियम
(१) प्रथम व्यंजन संधी
पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा पहिल्या पाच वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय असणारे व्यंजन असते (क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ) व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कठोर व्यंजन असते, (क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ) संधी होताना पहिल्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन (क, च, ट, त, प) येऊन संधी झाला आहे.
शेवटचे अक्षर पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकाशिवाय वर्ण + पहिले अक्षर कठोर वर्ण = त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन
पोट शब्द संधी जोडशब्द
विपद् + काल = द् + क् = त् + क् = त्क विपत्काल
वाग् + पती = ग् + प् = क् + प् = क्प वाक्पती
वाग् + ताडन = ग् + त् = क् + त् = क्त वाक्ताडन
षड् + शास्त्र = ड् + श् = ट् + श् = ट्श षट्शास्त्र
क्षुघ् + पिपासा = ध् + प् = त् + प् = त्प क्षुत्पिपासा
(२) तृतीय-व्यंजन संधी
पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण पहिल्या पाच वर्गांतील कठोर (क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ) वर्ण असेल व त्याच्यापुढे पुढील शब्दातील पहिला वर्ण अनुनासिकाशिवाय स्वर (अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ) किंवा मृदू व्यंजन (ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ) आले तर संधी होताना पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन (ग, ज, ड, द, ब) येऊन संधी होतो.
शेवटचे अक्षर कठोर वर्ण + पहिले अक्षर स्वर किंवा मृदू व्यसन = तिसरे व्यंजन
पोट शब्द संधी जोडशब्द
वाक् + ईश्वरी क् + ई = ग् + ई = गी वागीश्वरी
वाक् + विहार क् + व् = ग् + व् =ग्व वाग्विहार
षट् + रिपू ट् + र् = ड् + र = ड्र षड्रिपू
सत् + आचार तू + आ = द् + आ = दा सदाचार
अच् + आदी च् + आ = ज् + आ = जा आजादी
अप् + ज प् + ज् = ब् + ज् = ब्ज अब्ज
(३) 'अनुनासिक संधी'
पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा पहिल्या पाच वर्गांतील कोणतेही व्यंजन (क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, ब, भ) असेल व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण अनुनासिक (ङ, ञ, ण, न, म) आल्यास पहिल्या शब्दाच्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन (ङ, ञ, ण, न, म) येऊन संधी होतो.
पोट शब्द संधी जोडशब्द
वाक् + निश्चय क + नू = ङ् + न् वाङनिश्चय
षट् + मास ट् + म् = ण् + म षण्मास
जगत् + नाथ त् + न् =न् + न् जगन्नाथ
सत् + मती त् + म् = न् सन्मती
(४) त या व्यंजन पुढे च, छ, ज, झ, ट, ठ, ल, श, आल्यास खलील प्रमाणे बदल होतात
(१) च् छ् आल्यास त् बदल च् होतो.
सत् + चरित्र = त् + च् = च् + च् = सत्चरित्र
उत् + छेद = त् + छ् = च् + छ् = उच्छेद
(२) ज् झ् आल्यास त् बदल ज् होतो.
सत् + जन = त् + ज् = ज् + ज् = सज्जन
(३) ट् ठ् आल्यास त् बद्दल ट् होतो.
तत् + टीका = त् + ट् = ट् + ट् = तट्टीका
(४) ल् आल्यास त् बद्दल ल् होतो.
उत् + लंघन = त् + ल् = ल् + ल् = उल्लंघन
(५) श् आल्यास त् बद्दल च् होतो व श् बदल छ् होतो.
सत् + शिष्य। = त् + श् = च् + छ् = सच्छिष्य
(५) पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण 'म्' असेल आणि त्याच्या पुढील शब्दातील पहिले अक्षर स्वर आल्यास तो स्वर मागील 'म्' मध्ये मिसळून जातो.
सम् + आचार= समाचार
तसेच पुढील शब्दातील पहिले अक्षर व्यंजन 'म्' आल्यास मागील अक्षरावर अनुस्वार येतो.
सम् + गती = संगती
(६) दुसऱ्या शब्दातील शेवटचा वर्ण 'छ्' असेल व त्यापूर्वी शब्दात शेवटचे अक्षर र्हस्व स्वर असेल तर त्या दोहोंमध्ये 'च्' हा वर्ण येतो.
रत्न छाया = रत्नच्छाया
शब्द + छल = शब्दच्छल
खूप सुंदर 🌹
उत्तर द्याहटवा