गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

Indirect Speech Statement

 Statement विधानार्थी वाक्य

अवतरण चिन्हातील वाक्य Statement विधानार्थी असेल तर त्या वाक्याचे Indirect Speech पुढील प्रमाणे बदल करावेत.


1. Reporting Verb बदलणे.


2. That या conjunction चा वापर करावा.


3. वाक्य रचनेतील बदल करणे. 


4. अवतरण चिन्हातील वाक्य Statement विधानार्थी असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत-


A.   काळ Tense
B.   सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs
C.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns
D.   Time and nearness 

Rahul said, "Sahil sings song."
या वाक्यातील Reporting verb Said हे क्रियापद असून त्याचा Tense - Simple past Tense आहे. 
या वाक्यातील subject of reporting verb Rahul हे नाम आहे. 

1. Reporting Verb बदलणे

1. अवतरण चिन्हातील वाक्य कोणाला उद्देशून नसेल तर Reporting verb 'said' किंवा इतर असेल तर न बदलता 'said' च ठेवावे.

वरील वाक्य कोणालाही उद्देशून बोललेले नाही म्हणून वाक्यातील reporting verb said न बदलता तसेच रहते.

Rahul said, "Sahil sings song."
Rahul said that Sahil sang song.

2. अवतरण चिन्हातील वाक्य कोणाला उद्देशून असेल तर Reporting verb 'said' असेल तर 'said' चे 'told' लिहावे.
           '

Said to' चे Told लिहीत असताना told to लिहून नये तर फक्त ' told' लिहावे.

Rahul said to Shankar, "Sahil sings song."
Rahul told Shankar that Sahil sang song.

2. That या conjunction चा वापर करावा
Reporting verb चे वाक्य व अवतरण चिन्हांतील direct speech चे वाक्य जोडण्यासाठी 'that' या conjunction चा वापर करावा व स्वल्पविराम आणि अवतरण चिन्हे काढून टाकावीत. 
Rahul said, "Sahil sings song."
Rahul said that Sahil sang song.

3. वाक्य रचनेतील बदल 
अवतरण चिन्हांतील Direct Speech चे वाक्य Statement विधानार्थी वाक्य असेल तर indirect करताना या वाक्याच्या रचनेत बदल न करता 'Subject + Verb + Object' अशीच ठेवावी.
Rahul said, "Sahil sings song."
Rahul said Shankar that Sahil sang song.

4. अवतरण चिन्हातील वाक्य Statement विधानार्थी असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत

A.   काळ Tenses

1. Sahil said, "Rahul binds roap."
  Sahil said that Rahul bound roap."

2.Shankara said to Raj, "Sanjay brought milk."
Shankara told Raj that Sanjay had brought milk."

3. Sanjay said, "Shankar is building house."
Sanjay said that Shankar was building house.

4. Teacher said, "People have bought vegetables."
Teacher said that People had bought vegetables.

5. People said, "Children were catching balls."
People said that Children had been catching balls.

6.He said, "Boys have been choosing fruits."
He said that Boys had been choosing fruits.

B.   सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs

1. Sahil said, "Rahul does not bind roap."
  Sahil said that Rahul did not bind roap.

2. Shankara said to Raj, "Sanjay did not bring milk."
Shankara told Raj that Sanjay had not brought milk.

3. Sanjay said, "Shankar can build house."
Sanjay said that Shankar could build house.

4. Teacher said, "People will bring vegetables."
Teacher said that People would bring vegetables.

5. People said, "Children may catch balls."
People said that Children might catch balls.

6. He said, "Boys must choose fruits."
He said that Boys must choose fruits.

C.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns यांच्यातील बदल

1. Sahil said, "We bind roap."
 Sahil said that they bound roap.

2. Shankara said to Raj, "He is bringing milk."
 Shankara told Raj, "He was bringing milk.

3. Sanjay said, "I have built house."
Sanjay said that he had built house.

4. Teacher said to them, "You bought vegetables."
Teacher told them that they had bought vegetables.

5. People said, "they catch balls."
 People said that they caught balls.

6. He said, "Boys choose fruits."

He said that Boys had chosen fruits.


Time वेळ, जवलपणा nearness आणि स्थळ place दाखवनार्या शब्दांचे बदल करून त्याएवजी योग्य तो शब्द वापरणे.


1. Sahil said, "Today,  I sing song".

Sahil said that that day he sang song.


2. Disha said, "Tomorrow, We go to school".

Disha said that next day they went to school.


3. He said, " Yesterday, he read story".

He said that the previous day he had read story. 


5. You said, "Tonight, She gives pen".

You said that that night she gave pen. 


6. People said, "Next week, they play cricket."

People said that the following week they played cricket. 

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

मराठी व्याकरण काळाचे प्रकार

                          काळ


काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत:

१. वर्तमान काळ, २. भूतकाळ, ३. भविष्यकाळ.


मुख्य तीन काळांचे प्रत्येकी चार उपप्रकार पडतात:

१. साधा, २. अपूर्ण, ३. पूर्ण, ४. रीति.


  काळ :-  वाक्यातील क्रियापदावरुन क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो त्याला 'काळ' म्हणतात. 


१. वर्तमान काळ:-

   वाक्यात क्रिया आता घडते असा बोध असेल तर तो 'वर्तमान काळ' असतो.


२. भूतकाळ:-

   वाक्यात क्रिया पूर्वी घडली असा बोध असेल तर तो 'भूतकाळ' असतो.


३. भविष्यकाळ:-

   वाक्यात क्रिया पुढे घडणार असा बोध असेल तर तो 'भविष्यकाळ' असतो.


काळांच्या उपप्रकारांचा अभ्यास करु:


१. साधा काळ

साधा वर्तमान काळ

   उदाहरणार्थ

१. मी गाणे गातो.

२. आम्ही शाळेत जातो.

३. तू पाणी पितो.

४. तो गोष्टी वाचतो.


साधा भूतकाळ

   उदाहरणार्थ

१. तिने पेन दिला.

२. त्याने पत्र लिहिले.

३. ते क्रिकेट खेळले.

४. साहिलने गाणे गायले.

५. राहूलने दोर बांधला.


साधा भविष्यकाळ

   उदाहरणार्थ

१. संजय दूध आणेल.

२. शंकर घर बांधेल.

३. लोक भाज्या विकत घेतील.

४. मुले चेंडू पकडतील.

५. मुलगे फळे निवडतील.


2. अपूर्ण किंवा चालू काळ

       वाक्यात क्रियापदाचे धातुसाधिताचे अपूर्ण क्रियादर्शक रुप असते व त्याच्यापुढे 'अस' या धातूची वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळांतील रुपे वापरलेली असतात.

         या काळाचा उपयोग चालू असलेली क्रिया दाखवण्यासाठी करतात.


अपूर्ण वर्तमान काळ

उदाहरणार्थ-

१. मी गाणे गात आहे.

२. आम्ही शाळेत जात आहोत.

३. तू पाणी पित आहे.

४. तो गोष्टी वाचत आहे.


अपूर्ण भूतकाळ

उदाहरणार्थ

१. ती पेन देत होती.

२. ती पत्र लिहित होती.

३. ते क्रिकेट खेळत होते.

४. साहिल गाणे गात होता.

५. राहूल दोर बांधत होता.


अपूर्ण भविष्यकाळ

उदाहरणार्थ

१. संजय दूध आणत असेल.

२. शंकर घर बांधत असेल.

३. लोक भाज्या विकत घेत असतील.

४. मुले चेंडू पकडत असतील.

५. मुलगे फळे निवडत असतील.


3. पूर्ण काळ

       या काळात क्रियापदाची पूर्ण क्रिया दर्शवणारी धातुसाधिते वापरून त्याच्यापुढे 'अस' या धातूची तीनही काळातील सहाय क्रियापद येतात.

       या काळाचा उपयोग एखादी पूर्ण झालेली व्यक्त क्रिया करण्यासाठी करतात.


पूर्ण वर्तमान काळ

उदाहरणार्थ-

१. मी गाणे गाईले आहे.

२. आम्ही शाळेत गेलो आहोत.

३. तू पाणी पिला आहेस.

४. त्यानी गोष्टी वाचल्या आहेत.


पूर्ण भूतकाळ

उदाहरणार्थ

१. तीने पेन दिला होता.

२. त्याने पत्र लिहिले होते.

३. ते क्रिकेट खेळले होते.

४. साहिलने गाणे गाईले होते.

५. राहूलने दोर बांधला होता.


पूर्ण भविष्यकाळ

उदाहरणार्थ

१. संजयने दूध आणले असेल.

२. शंकरने घर बांधले असेल.

३. लोकांनी भाज्या विकत घेतल्या असतील.

४. मुलांनी चेंडू पकडला असेल.

५. मुलांनी फळे निवडली असतील.


4. रीति काळ

    एखादी क्रियापदाच्या रुपावरून रीत समजते म्हणून त्याला रीतिकाळ म्हणतात. 


रीति वर्तमान काळ

उदाहरणार्थ-  

१. मी गाणे गात असतो.

२. आम्ही शाळेत जात असतो.

३. तू पाणी पित असतो.

४. तो गोष्टी वाचत असतो.


रीति भूतकाळ

उदाहरणार्थ 

१. ती पेन देत असे.

२. ती पत्र लिहित असे.

३. ते क्रिकेट खेळत असे.

४. साहिल गाणे गात असे.

५. राहूल दोर बांधत असे.


रीति भविष्यकाळ

उदाहरणार्थ

१. संजय दूध आणत जाईल.

२. शंकर घर बांधत जाईल.

३. लोक भाज्या विकत घेत जातील.

४. मुले चेंडू पकडत जातील.

५. मुलगे फळे निवडत जातील.

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

Direct to Indirect प्रत्यक्षचे अप्रत्यक्ष कथन

     Direct to Indirect - प्रत्यक्षचे अप्रत्यक्ष कथन


थोडक्यात संभाषण  म्हणजे  काय? 

आपण संभाषण करत असताना वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगतो, बोलतो, आपले विचार व्यक्त करतो संभाषणात नेहमी ऐकणार कोणीतरी व्यक्ती असते तसेच कधी कधी आपण दुसर्‍याने व्यक्त केलेले विचार सुद्धा सांगतो.


Direct Speech प्रत्यक्ष कथन

जेव्हा आपले किंवा एखाद्या व्यक्तीचे बोललेले शब्द जसेच्या तसे वापरून अवतरण चिन्हात लिहीतो तेव्हा त्यास Direct Speech प्रत्यक्ष कथन असे म्हणतात

Vinayak said, "We play cricket."

या वाक्याचे दोन भाग आहेत. Reporting Verb चे वाक्य व Direct Speech चे वाक्य. 


Indirect Speech

जेव्हा आपले किंवा एखाद्या व्यक्तीचे बोललेले शब्द जसेच्या तसे न सांगता आपल्या शब्दात लिहीतो तेव्हा त्यास  Indirect Speech अप्रत्यक्ष कथन असे म्हणतात

Vinayak said that they played cricket. 


Direct Speech मधील काही संबोध

Vinayak said, "We  play cricket." या वाक्याच्या संदर्भ घेऊ :


Reporting verb चे वाक्य - Vinayak said,

Direct speech/Reported speech- 

"We play cricket."

अवतरण चिन्हातील वाक्य बोलणाऱ्याचे शब्द न बदलता जसेच्या तसे व्यक्त केले आहेत म्हणून त्याला Direct Speech असे संबोधतो.

Subject of Reporting Verb - 'Vinayak'

Vinayk हे नाम प्रत्यक्ष वाक्य कथन करणारा आहे. तो या वाक्याचा कर्ता आहे. याला Subject of reporting verb असे संबोधतात हा कर्ता reporting verb ला जोडून लिहिलेला असतो.

Reporting Verb - 'said'

वरील वाक्यात said हे reporting verb आहे

Subject of Direct Speech - 'We'

Verb of Direct Speech - 'play'

Object of Direct Speech - 'cricket'


Reporting Verb चे वाक्य Vinayak said,

  1.  हे वाक्य अवतरण चिन्हाच्या बाहेर असते आणि स्वल्पविराम देऊन वेगळे ठेवलेले असते. या वाक्यात कर्ता क्रियापद अशा दोन शब्दांनी बनलेले असते

2. कधी कधी या वाक्यात indirect object अप्रत्यक्ष कर्म समावेश केला असतो म्हणजे या वाक्यात कर्म सुध्दा असते. ज्याला उद्देशून वाक्य बोलले असते 

कोणाला म्हणाला?

Vinayak said to Ganesh, "We play cricket"

3. हे कर्म Reporting Verb ला जोडून लिहिले असते तर कधी कधी ते अवतरण  चिन्हातील वाक्यात लिहिलेले असते

Vinayak said, "Ganesh, We play cricket"


Direct Speech चे वाक्य

अवतरण चिन्हातील वाक्याच्या शब्द समूहाला  Direct Speech असे म्हणतो Direct Speech मध्ये वाक्य प्रकारानुसार शब्दाच्या रचनेचा क्रम असतो हे वाक्य 

विधानार्थी वाक्य Statement, 

प्रश्नार्थक वाक्य Interrogative,

उद्गारवाचक वाक्य Exclamatory, 

आज्ञार्थी वाक्य  Imperative  प्रकारात असू शकते,

या वाक्यात कर्ता, क्रियापद, कर्म व इतर शब्द सुध्दा असतात. 


Vinayak said, "We play cricket"

या वाक्यातील कर्ता - subject of Direct Speech.

We

या वाक्यातील क्रियापद - verb of Direct Speech. Play

या वाक्यातील कर्म - object of Direct speech. Cricket.


Direct speech चे  Indirect Speech करताना आवश्यक असलेले पूर्वज्ञान

१. पुरूषवाचक सर्वनामांच्या विभक्ती ओळखणे व त्यांचे परिवर्तन करणे. 

२. सहाय्यकारी  क्रियापदांचा कर्तया नुसार योग्य वापर.

३. अवतरण चिन्हातील वाक्याच्या क्रियापदाचा काळ ओळखणे व त्याचे योग्य रिती दुसर्या काळात रुपांतर करणे.

४.अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार ओळखून योग्य त्या वाक्य प्रकारात रुपांतर करणे.


Direct speech चे  Indirect Speech करताना पुढील प्रमाणे बदल करावेत.

 Step 1 :- Direct speech (अवतरण चिन्हातील) वाक्य प्रकारानुसार योग्यते reporting verb वापरणे.

Step 2 :- Direct speech (अवतरण चिन्हातील) वाक्य प्रकारानुसार योग्य त्या conjunction चा वापर करुन reporting verb चे वाक्य व Direct Speech चे वाक्य जोडताना स्वल्पविराम व अवतरण चिन्ह काढून टाकणे.

Step 3 :- Direct speech (अवतरण चिन्हातील) वाक्य प्रकारानुसार assertive sentence विधानार्थी वाक्यात रुपांतर करणे.

Step 4 :- Reporting verb च्या काळानुसार Direct speech मधील वाक्याचा काळ बदलणे

Step 5 :- सहाय्यकारी क्रियापदाचा योग्य वापर करणे.
पुरुषवाचक सर्वनामाची विभक्ती ओळखून योग्यत्या सर्वानामाच्या विभक्ती मध्ये रुपांतर करणे.

Step 6 :- Time वेळ, जवळपणा nearness आणि स्थळ place दाखवणार्‍या शब्दांचे बदल करून त्याएवजी योग्य तो शब्द वापरणे.


Reporting verb च्या काळानुसार Direct speech मधील वाक्याचा काळ बदलणे:


1.     Direct speech चे  Indirect Speech करताना Reporting Verb भविष्यकाळात किंवा वर्तमानकाळात असेल तर direct speech अवतरण चिन्हा मधील वाक्याच्या काळात बदलत नाही, कोणताही बदल होत नाही .

Future  Tense भविष्यकाळ  

Vinayak will say,  "We  play cricket"

Vinayak will say that they play cricket. 

Present Tense वर्तमानकाळ 

Vinayak says,  "We  play cricket"

Vinayak  says that they play cricket. 


2.     Direct speech चे  Indirect Speech करताना Reporting Verb भूतकाळात असेल तर direct speech मधील वाक्याच्या काळात पुढील प्रमाणे बदल होतो.


Simple Present Tense चे Simple Past Tense

Vinayak said,  "We  play cricket."

Vinayak said that they played cricket.


Present Continuous Tense चे Past Continuous Tense

Vinayak said,  "We are playing cricket."

Vinayak said that they were playing cricket.


Present Perfect Tense चे Past Perfect Tense

Vinayak said,  "We have played cricket."

Vinayak said that they had played cricket.


Present Perfect Continuous Tense चे Past Perfect Continuous Tense

Vinayak said,  "We  have been playing cricket."

Vinayak said that they had been playing cricket.


Simple Past Tense चे Past Perfect Tense

Vinayak said,  "We  played cricket."

Vinayak said that they had played cricket.


Past Continuous Tense चे Past Perfect Continuous Tense

Vinayak said,  "We were playing cricket."

Vinayak said that they had been playing cricket.


Past Perfect Tense व  Past Perfect Continuous Tense बदल होत नाहीत. 

Past Perfect Tense 

Vinayak said, "We  had played cricket"

Vinayak said that they  had played cricket.

Past Perfect Continuous Tense

Vinayak said, "We had been playing  cricket"

Vinayak said that they had been playing cricket.


Future Tense या काळात वापरलेले Shall व will चे Should किंवा Would करावे.

Simple Future Tense

Vinayak said, "We shall play cricket."

Vinayak said that they would play cricket.

Future Continuous Tense

Vinayak said, "We will be playing cricket."

Vinayak said that they would be playing cricket.

Future Perfect Tense

Vinayak said, "We will have played cricket."

Vinayak said that they would have played cricket.

Future Perfect Continuous Tense

Vinayak said, "We shall have been playing cricket."

Vinayak said that they would have been playing cricket.


2.     सहाय्यकारी क्रियापदाचा योग्य वापर करणे.
Direct speech चे  Indirect Speech करताना Reporting Verb भूतकाळात असेल तर direct speech मधील वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदात पुढील प्रमाणे बदल होतो.
Direct speech - Indirect Speech
Am/is        -  was
Are            -  Were
Do / does - Did
Have/has - Had
Can            - Could
May           - Might
Must          - Must
Did             - Had done
Shall           - Should/would
Will            - Would
Was/were - had व वाक्यातील काळा नुसार बदल करावा.


1. Vinayak said,  "We are playing cricket"
Vinayak said that they were playing cricket.

2. Vinayak said,  "We have played cricket"
Vinayak said that they had played cricket.

3. Vinayak said,  "We were playing cricket"
Vinayak said that they had been playing cricket.

4. Vinayak said,  "We did not play cricket"
Vinayak said that they had not played cricket. 

5. Vinayak said,  "We shall play cricket"
Vinayak said that they would play cricket.

6. Vinayak said,  "We will play cricket"
Vinayak said that they would play cricket.

7. Vinayak said,  "We can play cricket"
Vinayak said that they could play cricket.

8. Vinayak said,  "We may play cricket"
Vinayak said that they might play cricket.

जरी Reporting verb भूतकाळात असेल तरी Could, would, should, might हि क्रियापदे जरी भूतकाळात असली तरी यांच्यात कोणताही बदल होत नाही.
Direct speech - Indirect Speech
Could         - Could
Should       - Would 
Would       - Would
Might         - Might
9. Vinayak said,  "We could play cricket"
Vinayak said that they could play cricket

10. Vinayak said,  "We would  play cricket
Vinayak said that they would play cricket.

11. Vinayak said,  "We should play cricket"
Vinayak said that they should play cricket.

12.. Vinayak said,  "We might play cricket"
Vinayak said that they might play cricket.



3. पुरुषवाचक सर्वनामाची विभक्ती ओळखून योग्यत्या सर्वानामाच्या विभक्ती मध्ये रुपांतर करणे.

Direct speech चे Indirect Speech करताना Direct Speech मधील वाक्यातील पुरुषवाचक सर्वनामात पुढील प्रमाणे बदल होतात.

        Direct speech मधील प्रथम पुरुषवाचक सर्वनामे Reporting verb च्या कर्ता नुसार बदलतात.

Direct speech - Indirect Speech
I                        - पुलिंग He / स्त्रीलिंगी she
Me                   - पुलिंगी Him / स्त्रीलिंगी her
my                   - पुलिंगी His / स्त्रीलिंगी her`s
We                    - They
Us                    - Them
our                  - Their

1. I said, " I sing song for us".
I said that I sang song for us.

2. He said, "We go to school with him.
He said that they went to school with him.

3. Doctor said to him,"We drink water".
Doctor told him that they drank water.

4. You said, "I read story".
You said that you read story. 

5. She said, "We give pen for me".
She said that they gave pen for her. 

        Direct speech मधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे Reporting verb कर्मा नुसार बदलतात.

Direct speech - Indirect Speech
You एकवचन      - He / she
Your एकवचन    - Him / her
Your एकवचन    - His / her's
You अनेकवचन   - They
Your अनेकवचन - Them
Your अनेकवचन -  Their

1. Sahil said him, " You sing song".
Sahil told him that he sang song.

2. Disha said, " You go to school".
Disha said that they went to school.

3. Doctor said to him,"You drink water".
Doctor told him that he drank water.

4. He said her,  "You read story".
He told her that she read story. 

5. You said us, "You give pen".
You said that we gave pen. 

6. People said, "You play cricket".
People said that they played cricket. 

        Direct speech मधील तृतीय पुरुषी सर्वनामात कोणताही बदल होत नाही.

Direct speech - Indirect Speech
He/him/his        - बदल होत नाहीत 
She/her/her`s   - बदल होत नाहीत
It/it/it`s             - बदल होत नाहीत
They/them/their - बदल होत नाहीत

1. Sahil said, " He sing song".
Sahil said that he sang song.

2. Disha said, "They go to school".
Disha said that they went to school.

3. Doctor said to him,"She drinks water".
Doctor told him that She drank water.

4. He said, "It reads story".
He said that It read story. 

5. You said, "She gives pen".
You said that she gave pen. 

6. People said, "They play cricket".
People said that they played cricket. 


4. Time वेळ, जवळपणा nearness आणि स्थळ place दाखवणार्‍या शब्दांचे बदल करून त्याएवजी योग्य तो शब्द वापरणे.
Direct speech चे  Indirect Speech करताना Direct Speech मध्ये वापरलेले अंतर, कालखंड, किंवा स्थिती दाखवणारे काही शब्द बदलून Indirect Speech मध्ये त्या ऐवजी दुसरे शब्द वापरतात ते पुढील प्रमाणे

Direct speech - Indirect Speech
This      -  That 
These   - Those
Now     - Then
Hence - Thence
Hither - Thither
Here    - There
Ago      - Before
Thus    - So
Come   - Go
Today  - That day
Tomorrow - The next day
Yesterday  - The previous day/ the day before
Tonight      - That night
Last night -The previous night / the night before
Next night - The following night
Next week - The following week
Last week - The previous week / the week before

1. Sahil said, "Today,  I sing song".
Sahil said that that day he sang song.

2. Disha said, "Tomorrow, We go to school".
Disha said that next day they went to school.

3. He said, " Yesterday, he read story".
He said that the previous day he had read story. 

5. You said, "Tonight, She gives pen".
You said that that night she gave pen. 

6. People said, "Next week, they play cricket."
People said that the following week they played cricket. 


वाक्य प्रकारानुसार करावयाचे बदल :

5.     Direct speech (अवतरण चिन्हातील) वाक्य प्रकारानुसार योग्यते reporting verb वापरणे.

Type of sentences - Reporting verb

Statement - Said/ told

Interrogative
Yes – no type question   - Asked
Wh type question           - Asked

Exclamatory sentence - Exclaimed

Let - Suggested to

Imperative sentence
Command - Ordered
Suggest      - Suggested 
Request     - Requested 
advise       - Advised
notice        - noticed

6.     Direct speech (अवतरण चिन्हातील) वाक्य प्रकारानुसार योग्य त्या conjunction चा वापर करुन reporting verb चे वाक्य व Direct Speech चे  वाक्य जोडणे. 


Type of sentences  -  Conjunction

Statement                      -  That         

Interrogative
Yes – no type question     - if
Wh - type question           -  Wh - word

Exclamatory sentence  - that

Let                                       - that             

Imperative sentence     -  to


7.     Direct speech (अवतरण चिन्हातील) वाक्य प्रकारानुसार assertive sentence विधानार्थी वाक्यात रुपांतर करणे.
Statement      - Statement
                            Subject verb object. 

Interrogative - Statement
                           Subject verb object. 

Exclamatory sentence - Statement
                                           Subject verb object. 

Let - Statement
         Subject verb object. 
         Start by 'They should'


Imperative sentence - Statement



रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

विभक्ती व विभक्तीचे प्रकार

  विभक्ती

 विभक्तीचे प्रकार :

(१) प्रथमा, (२) द्वितीया, (३) तृतीया, (४) चतुर्थी, (५) पंचमी, (६) षष्ठी, (७) सप्तमी, (८) संबोधन

नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण यांसारखे प्रकारचे शब्द वापरून आपण वाक्य तयार करत असतो. वाक्यातील शब्द त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो.

विकार :-

वाक्यात शब्द वापरताना त्यांच्या स्वरूपात जो बदल करावा लागतो. त्याला विकार म्हणतात. 

कारक :-

वाक्यातील मुख्य शब्दाचा इतर शब्दांशी काही ना काही संबंध असतो. या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात.

विभक्ती :-

वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात 'विभक्ती' असे म्हणतात.

प्रत्यय :-

नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यांस 'प्रत्यय' असे म्हणतात. 

सामान्यरूप :-

नामाच्या किंवा सर्वनामाच्या विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी स्वरूपाला 'सामान्यरूप' असे म्हणतात.


विभक्तीचे प्रकार

विभक्तीचे एकंदर आठ प्रकार आहेत

(१) प्रथमा, (२) द्वितीया, (३) तृतीया, (४) चतुर्थी, (५) पंचमी, (६) षष्ठी, (७) सप्तमी, (८) संबोधन

 

विभक्ती प्रत्यय

               एकवचन        अनेकवचन

प्रथमा -    प्रत्यक्ष नाम किंवा सर्वनाम

द्वितीया -  स, ला, ते           स, ला, ना, ते

तृतीया -   ने, ए, शी            ने, ई, ही, शी

चतुर्थी -   स, ला, ते         स, ला, ना, ते          

पंचमी -   ऊन, हुन            ऊन, हुन

षष्ठी -     चा, ची, चे            चा, ची, चे, च्या 

सप्तमी -  त, ई, आ

संबोधन - हाक मारणे,           नो

आठव्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते म्हणून 'संबोधन' असे नाव दिले आहे.                 


१) उदाहरणार्थ एकवचन - राम

               एकवचन        अनेकवचन

प्रथमा -    प्रत्यक्ष नाम  

द्वितीया -  स, ला, ते           स, ला, ना, ते

            स - रामास

            ला - रामाला

तृतीया -   ने, ए, शी            ने, ई, ही, शी

            ने- रामाने

            शी - रामाशी

चतुर्थी -   स, ला, ते         स, ला, ना, ते

          स- रामास 

          ला - रामाला 

पंचमी -   ऊन, हुन            ऊन, हुन

            हुन - रामहुन       

षष्ठी -     चा, ची, चे            चा, ची, चे, च्या

       चा - रामाचा 

       ची - रामाची 

       चे - रामाचे 

     च्या - रामाच्या

सप्तमी -  त, ई, आ

          त - रामात 

          आ  - रामा

संबोधन - हाक मारणे,           नो

            "राम.... "      

      

२) उदाहरणार्थ  :- नाम - मुल

               एकवचन        अनेकवचन

प्रथमा -     मुल               मुले

द्वितीया -  स, ला, ते           स, ला, ना, ते

            स - मुलास          स - मुलांस

            ला - मुलाला

                                     ना - मुलांना

तृतीया -   ने, ए, शी            ने, ई, ही, शी

            ने- मुलाने             ई - मुलांनी

            शी - मुलाशी         ही - मुलेही

                                      शी - मुलांशी

चतुर्थी -   स, ला, ते         स, ला, ना, ते

          स- मुलास              स - मुलांस

          ला - मुलाला          ना - मुलांना

पंचमी -   ऊन, हुन            ऊन, हुन

            हुन - मुलहुन        हुन - मुलेहून

षष्ठी -    चा, ची, चे, च्या           चा, ची, चे, च्या

       चा - मुलाचा               चा - मुलांचा

       ची - मुलाची               ची - मुलांची 

       चे - मुलाचे                  चे - मुलांचे

      च्या - मुलाच्या            च्या - मुलांच्या

सप्तमी -  त, ई, आ

          त - मुलात             त - मुलांत

          आ  - मुलामा

संबोधन - हाक मारणे,           नो

                                      "मुलांनो...... "


३) उदाहरणार्थ :- सर्वनाम मी

               एकवचन           अनेकवचन

प्रथमा -  मी                      आम्ही 

द्वितीया -  स, ला, ते           स, ला, ना, ते

                                     स - आंम्हास

            ला - मला           ला - आम्हाला

                                    ना - मुलांना

तृतीया -   ने, ए, शी            ने, ई, ही, शी

                                     ही - आम्हीही

चतुर्थी -   स, ला, ते         स, ला, ना, ते

                                   स - आंम्हास

            ला - मला        ला - आम्हाला

पंचमी -   ऊन, हुन            ऊन, हुन

            हुन - मीहुन        हुन - आम्हीहून

षष्ठी -     चा, ची, चे            चा, ची, चे, च्या

           झा, झी, झे, झ्या 

       झा - माझा               चा - आंमचा

       झी - माझी               ची - आंमची 

       झे - माझे                  चे - आंमचे

      झ्या - माझ्या              च्या - आंमच्या

सप्तमी -  त, ई, आ

          त - माझ्यात             त - आंम्हात

संबोधन - 

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

वर्ण व वर्णमाला

 वर्ण व वर्णमाला


वर्णांचे प्रकार


(१) स्वर : 

         १) र्‍हस्व स्वर, २) दीर्घ स्वर, ३) संयुक्त स्वर, ४) सजातीय स्वर, ५) विजातीय स्वर


(२) स्वरादी :


(३) व्यंजने :

        १) स्पर्श व्यंजने : 

              १) कठोर व्यंजने, २) मृदू व्यंजने, ३) अनुनासिक व्यंजने

        २) अर्धस्वर (३) उष्मे - घर्षक व्यजने ४) महाप्राण व्यंजने ५) अल्पप्राण व्यंजने ६) स्वतंत्र वर्ण ७) जोडाक्षरे.


वाक्य :-
          आपण बोलतो म्हणजे अर्थपूर्ण वाक्याच्याद्वारे संवाद करत असतो. हा संवाद एक एक अक्षरांचा किंवा एक एक शब्दांचा नसुन तर आपण अर्थपूर्ण शब्दांच्या समुहाने संवाद करतो. हा शब्द समुह म्हणजे वाक्य होय. वाक्य हे एक वा अनेक शब्दांचे बनलेले असते.

शब्द :-
          वाक्यात असलेले शब्द हे अनेक अक्षरांचे बनलेले असतात. शब्दातील अक्षरांच्या समूहाला विशिष्ठ क्रम असतो व त्या समुहातून विशेष अर्थ बोध होत असतो. अक्षरांच्या अर्थपूर्ण समुह म्हणजे शब्द होय. 

अक्षरे :-
            आपल्या मुखातून जे ध्वनी बाहेर पडतात, हे ध्वनी आपण खुणांनी लिहतो. त्यांना आपण 'अक्षरे' असे म्हणतो. हे लिहून ठेवल्यामुळे ध्वनी नाश पावत नाहीत. म्हणून त्यांना 'अक्षर' (नाश न पावणारे) असे म्हणतात.


वर्ण :-

        मराठी भाषेत एकूण पन्नास वर्ण आहेत.

मराठी भाषेतील वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे:

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ

अं, अः, अॅ, आॅ

क्, खू, ग, घ, ङ्

च्, छ्, ज्, झ, ञ, 

ट्, ठू, ड्, ढ्, ण,

त्, थ्, द्, धू, नू,

पू, फ्, ब्, भ, म्,

य, र, ल, व, 

श, ष, स्, ह्, ळ,

क्ष, ज्ञ.


स्वर :-

र्‍हस्व स्वर             दीर्घ स्वर         संयुक्त स्वर

अ, इ, उ, ऋ, ऌ,      आ, ई, ऊ,       ए, ऐ, ओ, औ, 


स्वरादी :-

अं, अः, अॅ, आॅ


व्यंजने :-

               कठोर       मृदू      अनुनासिक    

             क्, ख्,    ग, घ,       ङ् 

             च्, छ्,     ज्, झ,      ञ, 

             ट्, ठ्,      ड्, ढ्,       ण, 

             त्, थ्,     द्, ध्,        न्,  

             प्, फ्,     ब्, भ,       म्,


अर्धस्वर व्यंजने :-          य्, र्, ल्, व् 


उष्मे - घर्षक व्यजने :-     श, ष, स्


महाप्राण व्यंजने :-          ह्


स्वतंत्र वर्ण :-                ळ.


जोडाक्षरे :-                   क्ष ज्ञ


वर्णविचार :-

उच्चार स्थानांनुसार वर्गांचे वर्गीकरण 


१) कंठ्य वर्ण :  स्थान - कंठ

     स्वर - अ, आ, 

     व्यंजने - क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह्


२) तालव्य वर्ण : स्थान - तालू

     स्वर - इ, ई 

     व्यंजने - च्, छ्, ज्, झ्, ञ्, य्, श् 


३) दंततालव्य वर्ण : स्थान - दंत + तालू 

    व्यंजने - च्, छ्, ज्, झ्


४) मूर्धन्य वर्ण : स्थान - मूर्धा 

      स्वर - ऋ

      व्यंजने - ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, र्, ष्, ळ् 


५) दंत्य वर्ण : स्थान - दंत 

     स्वर - लृ

    व्यंजने - त्, थ्, द्, ध्, न्, ल्, स्


६) ओष्ठ्य वर्ण : स्थान - ओष्ठ

    स्वर - उ, ऊ

    व्यंजने - प्, फ्, ब्, भ्, म्


७) कंठतालव्य : स्थान - कंठ + तालू

    स्वर - ए, ऐ


८) कंठौष्ठ्य : स्थान - कंठ + ओष्ठ

   स्वर - ओ, औ


९) दंतौष्ठ्य : स्थान - दंत + ओष्ठ 

   व्यंजने - व  


वर्णाचे प्रकार :

(१) स्वर (२) स्वरादी (३) व्यंजने


(१) स्वर : - 

             स्वर उच्चार करताना आपल्या मुखातील कोणत्याही अवयवांचा स्पर्श होत नाही, मुखातून निघणार्या ध्वनीच्या हवेचा मार्ग आडवला जात नाही, स्वरांचा उच्चार कोणत्याही वर्णाशिवाय सहज होतो. 

मराठी वर्णमालेत एकून बारा स्वर आहेत

अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ


स्वरांचे प्रकार :

(१) र्‍हस्व स्वर (२) दीर्घ स्वर (३) संयुक्त स्वर (४) सजातीय स्वर (५) विजातीय स्वर


(१) र्‍हस्व स्वर :

              ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो, ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांना र्‍हस्व स्व स्वर असे म्हणतात.

अ, इ, उ, ऋ, ऌ या स्वरांचा उच्चार आखूड होतो.


(२)  दीर्घ स्वर :

               ज्या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो. ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो. त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ


(३) संयुक्त स्वर - 

               दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना 'संयुक्त स्वर' असे म्हणतात. 

ए, ऐ, ओ, ओ हे संयुक्त स्वर आहेत. 

ए = अ + इ किंवा ई 

ऐ = आ + इ किंवा ई 

ओ = अ + उ किंवा ऊ 

औ = आ + उ किंवा ऊ


(४) सजातीय स्वर 

               एकाच उच्चारस्थानातून निघणार स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. उदा. अ, आ, उ, ऊ.


(५) विजातीय स्वर -

               भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उ अइ अक्र अ उ उ.- ए


(२) स्वरादी :

      मराठी वर्णमालेत (ं), ( : ), 'अॅ' आणि 'आॅ' हे स्वरादी आहेत.

       ( ं ) याला अनुस्वार व  (ः ) याला विसर्ग म्हणतात.

       यांचा उच्चार करताना वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून यांना स्वरादी म्हणतात.

       अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट होत असेल तर तो अनुस्वार असतो व अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट होत असेल तर तो अनुनासिक असतो

       इंग्रजी भाषेच्या संर्पकाने मराठी भाषेत काही शब्द आले त्यामुळे 'ॲ' व 'ऑ' हे दोन स्वरादी मराठीमध्ये आले आहेत. 

       मराठी वर्णमालेत एकून चार स्वरादी आहेत


(३) व्यंजने

           मराठी वर्णमालेतील 'क्, ते ळ्' ही व्यंजने आहेत. 

           ज्या वर्णांचा उच्चार स्वरांशिवाय पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात.

          व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात, व्यंजनांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही.

          व्यंजनांच्या उच्चारात 'अ' हा स्वर मिसळून उच्चार करतात. 

          वर्णमालेत व्यंजने त्यांचा पाय मोडून लिहितात. 

          मराठी वर्णमालेत एकून ३४ व्यंजने आहेत.


मराठी वर्णमालेतील व्यंजने

क्, ख्, ग, घ, ङ्

च्, छ्, ज्, झ, ञ्, 

ट्, ठ्, ड्, ढ्, ण्, 

त्, थ्, द्, ध्, न्,

प्, फ्, ब्, भ्, म्,

य, र, ल, व, श, ष, स्, ह्, ळ् .


व्यंजनांचे प्रकार

(१) स्पर्श व्यंजने, (२) अर्धस्वर, (३) उष्मे - घर्षक व्यजने, (४) महाप्राण व्यंजने, (५) अल्पप्राण व्यंजने, (६) स्वतंत्र वर्ण, (७) जोडाक्षरे.


(१) स्पर्श व्यंजने - 

           क्, ख्' पासून 'भ्, म्' पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. 

           ज्याचा व्यंजनांचा उच्चार करताना फुफ्फुसांतील हवा तोंडावाटे बाहेर पडताना तोंडातील अवयव (जीभ, कंठ, ताल, दात, ओठ) यांच्याशी तिचा स्पर्श होऊन उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. 

क्, ख्, ग, घ, ङ्

च्, छ्, ज्, झ, ञ, 

ट्, ठ्, ड्, ढ्, ण,

त्, थ्, द्, ध्, न्,

प्, फ्, ब्, भ, म्,


स्पर्श व्यंजनाचे प्रकार

(१) कठोर व्यंजने, (२) मृदू व्यंजने, (३) अनुनासिक व्यंजने


        (१) कठोर व्यंजने

            ज्या व्यंजनांचा उच्चारात तीव्रता असते ती कठोर व्यंजने समजली जातात.

क्, ख्, च्, छ्, ट्, ठ्, त्, थ्, प्, फ्,


         (२) मृदू व्यंजने

              ज्या व्यंजनांचा उच्चार सौम्य, कोमल किंवा मृदू होतो ती मृदू व्यंजने समजली जातात. 

 ग, घ, ज्, झ, ड्, ढ्, द्, ध्, ब्, भ,


         (३) अनुनासिक व्यंजने

              ज्या वर्षांचा उच्चार त्याच्या उच्चारस्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजे नाकातूनही होतो म्हणून त्यांना 'अनुनासिक वर्ण' असे म्हणतात. ड्. ञ, ण्, न्, म्.


(२) अर्धस्वर व्यंजने

       ज्या व्यंजनांची उच्चार स्थाने स्वरांसाआरखीच असतात त्यांना अर्धस्वर व्यंजन म्हणतात.

        य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ, उ, ऋ, लृ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखीच आहेत. 


(३) उष्मे - घर्षक व्यजने

      ज्या व्यंजनांचा उच्चार मुखावाटे वायू जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे होतो, यात घर्षण होते व त्यातून उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे म्हणतात.

     श, ष, स यांना उष्मे म्हणतात किंवा घर्षक असे म्हणतात.


(४) महाप्राण व्यंजने

      'ह' चा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात. 

      ज्या वर्णामध्ये 'ह्' व्यंजन मिसळून तयार झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात.

ख्, छ्, ठ्, थ्, फ्, घ, झ, ढ्, ध्, भ, श्, ष, स, ह्.

     १४ वर्ण महाप्राण मानले जातात


(५) अल्पप्राण व्यंजने 

        वर्णांमध्ये 'ह' हे व्यंजन मिसळलेले नसते ते सर्व अल्पप्राण वर्ण असतात.

क्, च्, ट्, त्, प्, ग, ज्, ड्, द्, ब्.


(६) स्वतंत्र वर्ण 

      'ळ्' हा स्वतंत्र वर्ण मानला जातो. या वर्णाने शब्दाची सुरूवात होत नाही.


(७) जोडाक्षरे

      मराठीत 'क्ष' व 'ज्ञ' ही अक्षरे जोडाक्षरे आहेत. ही अक्षरे दोन वर्ण एकत्र मिसळून तयार होतात, यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात असतो. त्यामुळे ते मूलध्वनी आहेत असे वाटते परंतु, प्रत्यक्षात ती संयुक्त व्यंजने आहेत. म्हणून त्यांचा समावेश वर्णमालेत करीत नाहीत.

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...