सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

Kinds of Noun नामाचे प्रकार

              Kinds of Noun 

1. Proper Noun विशेष नाम : 
2. Common Noun सामान्य नाम :
3. Collective Noun समुदायवाचक नाम :
4. Material Noun पदार्थवाचक नाम :
5. Abstract Noun भाववाचक नाम :

Noun नाम 

              A noun is word used for naming some person, place or thing.

              A word that describes a person, an animal, a place, an object, a substance, an idea, an emotion, a quality, or anything else is called a 'Noun'.

              कोणत्याही व्यक्तीचे, प्राण्याचे, ठिकाणाचे, वस्तूचे, पदार्थांचे, कल्पनेचे, भावनेचे, गुणांचे किंवा इतर कशाचेही नाव सांगणाऱ्या शब्दाला 'Noun नाम' असे म्हणतात.

Examples :
           Soham, Karjat, Pune, boy, book, milk, class, kindness, childhood.

 
Kinds of Noun


1. Proper Noun विशेष नाम :

               Proper Noun is the name given to a particular person, place, animal, country, village, state, month, wind, festival, river, mountain or object.

                एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या, ठिकाणाच्या, प्राण्याच्या, देशाच्या, गावाच्या, राज्यच्या, महिन्याच्या, वाराच्या, सणाच्या, नद्याच्या, पर्वताच्या किंवा वस्तूच्या नावाला Proper Noun असे म्हणतात.

Examples :
            Mumbai, India, Sunday, January, Diwali, Ganga 


 2. Common Noun सामान्य नाम :

                 The common noun is the name given to all persons, animals, objects, places or substances of the same kind.

                 एकाच प्रकारच्या सर्व व्यक्तींना, प्राण्यांना, वस्तूंना, ठिकाणे किंवा पदार्थ यांना सर्वसामान्यपणे जे नाव असते त्यास Common Noun असे म्हणतात. 

Examples :
           Boy, girl, book, man, cow, river, village, flower. 

 
3. Collective Noun समुदायवाचक नाम :

          Collective Noun is the term used to refer to a community of several persons or objects of the same race or similarity.

            एकाच जातीच्या किंवा समान असणार्‍या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या एकाच शब्दाने केला जातो त्यास Collective Noun असे म्हणतात.

Examples :
          Class, team, family, people, bunch, herd, flock, army.

 
4. Material Noun पदार्थवाचक नाम :

             Material Noun is the name given to various objects, substances which are made from the same substance or other substances which cannot be measured in numerical form.

           विविध वस्तू, पदार्थ ज्या मूळ पदार्थापासून किंवा द्रव्यापासून इतर  बनविल्या जातात व सामान्यतः जे पदार्थ संख्येच्या स्वरूपात मोजता येत नाहीत, अशा मूळ पदार्थाच्या किंवा द्रव्याच्या नावास ' Material Noun पदार्थवाचक नाम' असे म्हणतात.

Examples :
           Water, gold, oil, gas, wood, air, glass, ink, tea, money, sugar, time. 


5. Abstract Noun भाववाचक नाम :

           Abstract Noun is the name given to a state of mind, attitude, quality, emotion, imagination, action, or way of thinking that we cannot see or touch, but can only imagine, think, or know with our mind.

           जे आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो, विचार करू शकतो, किंवा जाणू शकतो अशा स्थितीच्या, वृत्तीच्या, गुणाच्या, भावनेच्या, कल्पनेच्या, क्रियेच्या, किंवा विचारपध्दतीच्या नावास 'Abstract Noun भाववाचक नाम ' असे म्हणतात.

Examples :
            Wisdom, loyality, courage, childhood, freedom, poverty, movement, laughter, theft, kindness, bravery, truth, beauty.

Sentence Patterns

Parts of Sentences 


English वाक्य बनवणे

English वाक्य बनवण्या अगोदर वाक्याची भाग समजून घेऊया


English वाक्याचे दोन भाग असतात. 

1. Naming Part - Subject 

2. Telling Part - Predicate


Sentence Pattern

1. Subject + Verb.


2. Subject + Verb + Object. 

Subject + Verb + (what? Direct Object).

Subject + Verb + (whom? Indirect Object).

Subject + Verb + (what? Direct object) + (whom? Indirect Object).


3. Adjective + Subject + Verb + Adjective + Object.

Subject + Verb + Adjective + Object.


4. Subject + Adverb + Verb + Object.


5. Subject + Verb + Object + Preposition + (When?- time).

Preposition + (When?- time) + Subject + Verb + Object.


6. Subject + Verb + Object + Preposition + (Where? - place).

Preposition + (Where? - place) + Subject + Verb + Object.


1. Naming Part - Subject 

यात Who / what याचा समावेश करतात,

पहिला भाग हा Naming Part किंवा Subject या नावाने ओळखले जातो. 

या मध्ये who? व what? याविषयी माहिती सांगितली जाते.


Naming Part / Subject हा Telling Part / Predicate च्या अगोदर येतो. 


2. Telling Part - Predicate

यात verb / linking verb / adjective / adverb / to / whom / What याचा समावेश करतात,

दुसरा भाग ज्याला Telling Part किंवा Predicate या नावाने ओळखले जातात. 

याची सुरुवात क्रियापदाने सुरुवात होते, naming part किंवा subject याविषयी माहिती सांगतो. 

Telling Part / Predicate हा Naming Part / Subject च्या नंतर येतो.


Example

They went home. 

They हे सर्वनाम / Pronoun हे या वाक्यात Naming part / subject आहे व 

went home हे telling part / predicate आहे.  


The ant is tiny. 

The ant हे नाम / noun हे या वाक्यात Naming part / subject आहे व

 is tiny हे telling part / predicate आहे.  




Sentence Pattern

इंग्रजी भाषेमध्ये वाक्य बनवण्यासाठी Sentence Patterns चा अभ्यास करणे आवश्यक आहे. 

वाक्यातील भागापासून Sentence Patterns तयार होत असतो.

 आपण इंग्रजी भाषेत वाक्य बनवण्यासाठी वाक्यातील एकेक भागाचा समावेश करुन Sentence Pattern चा अभ्यास व सराव करावा. 

आपण Sentence Pattern च्या सहाय्याने  जास्त सराव केल्याने आपणाला वाक्य सोपे, अचूक व लवकर वाक्य तयार करता येते.


Sentence Pattern 

1. Subject + Verb.

 पहिला Sentence Pattern आहे S + V. 

यामध्ये Subject - कर्ता आणि Verb - क्रियापद याचा समावेश असतो. 

Subject - कर्ता म्हणजे who जो क्रिया करतो.

Verb - क्रियापद म्हणजे Subject - कर्ता जे कार्य करतो ती क्रिया. 


Sentence Pattern

1. Subject + Verb + Object. 

 पहिला Sentence Pattern आहे S + V + O. 

यामध्ये Subject - कर्ता आणि Verb - क्रियापद कर्म - Object. याचा समावेश असतो. 


Subject - कर्ता म्हणजे who जो क्रिया करतो. 

 Verb -  कर्ता जे कार्य करतो ती क्रिया. 

Object - कर्ता ज्याच्यावर कार्य करतो ते कर्म


Object दोन प्रकारची असतात 

Direct Object आणि Indirect Object 


Object चा समावेश केलेले पुढील प्रमाणे patterns तयार होतात.


Direct Object प्रत्यक्ष कर्म 

What ने प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते Direct Object असते

Example

Anil gives pen. 

या वाक्याला what ने प्रश्न विचारला,

'What does Anil give? अनिल काय देतो?' या प्रश्नाचे उत्तर pen हे आहे, pen हे या वाक्यातील Direct Object आहे.


Sentence Pattern

2. Subject + Verb + (what? Direct Object).

Direct Object चा समावेश असलेले 

1. Rahul binds roap .

2. Sanjay brings milk. 

3. Shankar builds house. 

4. People buy vegetables .

5. Children catch balls.

6. Boys choose fruits.

7. I sing song.          

8. You drink water.  

9. He reads story.    

10. She gives pen.      

11. They play cricket.


Indirect Object अप्रत्यक्ष कर्म 

Whom ने प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते Indirect Object असते.

Anil gives Hari. 

या वाक्याला what ने प्रश्न विचारला, असता उत्तर मिळत नाही. 

याच वाक्याला whom ने प्रश्न विचारला, 

'Whom does Anil give? अनिल कोणाला देतो?' या प्रश्नाचे उत्तर Hari हे आहे, Hari हे या वाक्यातील Indirect Object आहे.


Indirect Object चा समावेश असलेले 


Sentence Pattern

3. Subject + Verb + (whom? Indirect Object).

1. Sanjay brings milk boy.

2. Shankar builds house him.

3. Boys choose fruits them.    

4. He reads story students.  

5. She gives pen Hari.    

 

4. Direct object व Indirect Object या दोन्हीचा चा समावेश असलेले 

Example

Anil gives pen Hari. 

या वाक्याला what ने प्रश्न विचारला,

'What does Anil give? अनिल काय देतो?' या प्रश्नाचे उत्तर pen हे आहे, pen हे या वाक्यातील Direct Object आहे.

तसेच याच वाक्याला whom ने प्रश्न विचारला, 

'Whom does Anil give? अनिल कोणाला देतो?' या प्रश्नाचे उत्तर Hari हे आहे, Hari हे या वाक्यातील Indirect Object आहे.

अशा प्रकारे या वाक्यात Direct object व Indirect Object  अशी दोन object आहेत.


Sentence Pattern

Subject + Verb + (what? Direct object) + (whom? Indirect Object).

1. Sanjay brings milk boy.

2. Shankar builds house him.

3. Boys choose fruits them.

4. He reads story students.

5. She gives pen Hari. 

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

PASSIVE VOICE - Interrogative Sentences

 Interrogative sentences प्रश्नार्थक वाक्याचे Passive Voice तयार करणे

प्रश्नार्थक वाक्याचे Passive Voice तयार करत असताना प्रश्नार्थक वाक्याची रचना लक्षात ठेवून Passive Voice चा बदल करावा

प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार आहेत त्याप्रमाणे बदल करावे लागतात. 

1 Yes No Type or Verbal Question 

2 WH words Type Question 


1.  Yes/No Type or Verbal Question वाक्याचे Passive Voice बनवताना

Yes/No Type or Verbal Question वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने झालेली असते.

Do : do, does, did.

To be : am, is, are, was, were.

Have: have, has, had.

Modal auxiliaries :

Can, could, may, might, must, shall, should, will, would

1   Yes/No Type Or Verbal Type Question चे  Passive Voice करण्याच्या पायर्या Steps 

Step 1 : वाक्याची सुरूवात सहाय्यकारी क्रियापदाने करावी

Step 2 : कर्माचे रुपांतर कर्त्यात करावे

Step 3 : मुख्य क्रियापदाचे Past Participle लिहावे

Step 4 : by हे preposition लिहावे

Step 5 : कर्तयाचे रुपांतर कर्मात करावे

Step 6 : वाक्यातील इतर शब्द लिहावे 

Step 7 : वाक्याच्या शेवटी ? लिहावे


Step 1 : वाक्याची सुरूवात सहाय्यकारी क्रियापदाने करावी

Active Voice Yes/No Type Question - प्रश्नार्थक वाक्यात Simple Tense मध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणून do, does, did, रुपे वापरलेली असतात ती काढून टाकावीत आणि Passive Voice मधील नवीन कर्तानुसार व काळा नुसार to be च्या रूपांचा वापर करावा,

उदाहरणार्थ :

Active Voice

1. Does Sahil bring milk?

 या Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यात Simple Present Tense मध्ये सहाय्यकारी क्रियापद does हे रुप वापरले आहे, या वाक्याचे Passive Voice करताना does हे सहाय्यकारी क्रियापद काढून टाकले आणि Passive Voice मधील नवीन कर्ता 'milk' या नामानुसार व Simple Present Tense नुसार 'is' हे to be चे रूप वापरून वाक्याची केली.

Passive Voice

Is


Step 2 : कर्माचे रुपांतर कर्त्यात करावे 

Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यातील कर्म शोधून कर्माचे रुपांतर कर्त्यात करावे व auxiliary verbs सहाय्यकारी क्रियापदा नंतर लिहावे.

उदाहरणार्थ :

Active Voice

1. Does Sahil bring milk?

या Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यातील object कर्म 'milk' हे नाम आहे, त्याचे रुपांतर कर्त्यात केले व auxiliary verbs सहाय्यकारी क्रियापदा 'is' नंतर लिहीले. 

Passive Voice

Is milk


Step 3 : मुख्य क्रियापदाचे Past Participle लिहावे

Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यातील मुख्य क्रियापदाचे Past Participle लिहावे.

उदाहरणार्थ :

Active Voice

1. Does Sahil bring milk?

या Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यातील मुख्य क्रियापद 'bring' आहे त्याचे Past Participle रुप 'brought' लिहीले.

Passive Voice

Is milk brought 


Step 4 : 'by' हे preposition लिहावे

क्रियापदाचे Past Participle लिहिल्यानंतर 'by' हे preposition लिहावे.

उदाहरणार्थ :

Active Voice

1. Does Sahil bring milk?

या Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यातील मुख्य क्रियापदाचे Past Participle रुप 'brought' लिहिल्यानंतर 'by' हे preposition लिहिले. 

Passive Voice

Is milk brought by


Step 5 : कर्तयाचे रुपांतर कर्मात करावे

Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यातील कर्ता शोधून कर्मात रुपांतर करावे.

उदाहरणार्थ :

Active Voice

1. Does Sahil bring milk?

या Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यातील कर्ता 'Sahil' हे नाम आहे, त्याचे कर्मात रुपांतर केले व 'by' नंतर लिहिले.

Passive Voice

Is milk brought by Sahil


Step 6 : वाक्याच्या शेवटी ? लिहावे.

Interrogative Sentence असल्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहावे.

उदाहरणार्थ :

Active Voice

1. Does Sahil bring milk?

या Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहिले.

Passive Voice

Is milk brought by Sahil?


उदाहरणार्थ

1. Will you do there? 

Will be done by you there?

2. Does Rahul bind roap?

Is roap bound by Rahul? 

3. Does he send letters?

Are letters sent by him? 

4. Do Children catch balls?

Are balls caught by children? 

5. Do I sell mangoes? 

Are  mangoes sold by me? 

6. Did she shut door?

Was door shut by her? 

7. Did Sahil sing song? 

Was song sung by Sahil? 


Passive Voice वाक्यात to be व इतर सहाय्यकारी क्रियापद वापरावे

1.  Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यात जर Continuous Tense मध्ये जर To be ची सहाय्यकारी क्रियापदे वापरलेली असतील तर Passive Voice मधील नवीन कर्तानुसार व काळा नुसार To be या सहाय्यकारी क्रियापदे रूपांचा वापर करून मुख्य क्रियापदाच्या Past Participle रुपा पूर्वी being हे क्रियापद वापरावे.

उदाहरणार्थ :

Is Sahil bringing milk?

या Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यात 'Present Continuous Tense' आहे व 'is' हे To be चे सहाय्यकारी क्रियापदे वापरलेले आहे तर Passive Voice मधील 'milk' या नवीन कर्तानुसार व 'Present Continuous Tense' या काळा नुसार 'is' या To be च्या सहाय्यकारी क्रियापदाचा रूपांचा वापर करून मुख्य क्रियापदाच्या Past Participle रुपा पूर्वी being हे क्रियापद वापरावे

Is milk being brought by Sahil? 


Continuous Tense,

To be : am, is, are, was, were.

1. Is she writing a book? 

Is a book being written by her? 

2. Is Sanjay bringing milk?

Is milk being brought by Sanjay?

3. Are Shankar building house?

Is house being built by Shankar?

4. Were People buying vegetables?

Were vegetables being bought by people?

5. Was boy choosing fruits?

Were fruits being chosen by boys?


2.    Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यात जर Perfect Tense मध्ये जर have, had, had ची सहाय्यकारी क्रियापदे वापरलेली असतील तर Passive Voice मधील नवीन कर्तानुसार व काळा नुसार have, has, had यापैकी एका सहाय्यकारी क्रियापदे रूपांचा वापर करून मुख्य क्रियापदाच्या past participle रुपा पूर्वी 'been' हे क्रियापदाचे रुप वापरवे.

उदाहरणार्थ :

1. Has Sahil brought milk?

या Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यात Present Perfect Tense आहे व मध्ये जर has हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेले आहे तर Passive Voice मधील नवीन कर्ता milk यानुसार व Present Perfect Tense याकाळ नुसार has या सहाय्यकारी क्रियापदे रूपांचा वापर करून मुख्य क्रियापदाच्या past participle रुपा पूर्वी 'been' हे क्रियापदाचे रुप वापरले.

Has milk been brought by Sahil? 


Perfect Tense

Have: have, has, had.

1. Have they completed the work? 

Have the work been Completed by them?  

2. Have children caught balls?

Have balls been caught by children?

3. Has he chosen fruits?

Have fruits been chosen by him? 

4. Had I sold mangoes? 

Had mangoes been sold by me? 


3.    Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यात जर Modal Auxiliaries सहाय्यकारी क्रियापदे वापरलेली असतील तर Passive Voice मधील नवीन कर्तानुसार व काळा नुसार Modal Auxiliaries सहाय्यकारी क्रियापदे रूपांचा वापर करून मुख्य क्रियापदाच्या past participle रुपा पूर्वी 'be' हे क्रियापदाचे रुप वापरवे.

उदाहरणार्थ :

 Can Sahil bring milk?

या Active Voice Yes-No Type Question प्रश्नार्थक वाक्यात 'can' या Modal Auxiliaries सहाय्यकारी क्रियापदाचा वापरले आहे तर Passive Voice मधील नवीन कर्तानुसार व काळा नुसार 'can' या Modal Auxiliaries सहाय्यकारी क्रियापदे रूपांचा वापर केला व मुख्य क्रियापदाच्या past participle रुपा पूर्वी 'be' हे क्रियापदाचे रुप लिहिले. 

Can milk be brought by Sahil? 


1. Can Rahul bind roap?

Can roap be bound by Rahul? 

2. Could he send letters?

Could  letters be sent by him? 

3. Would Children catch balls?

Would balls be caught by children? 

4. Should I sell mangoes? 

Should mangoes be sold by me? 

5. May she shut door?

May door be shut by her? 

6. Might Sahil sing song? 

Might song be sung by Sahil? 


2.  WH words Type Question चे  passive voice करण्याच्या पायर्या Steps 

Step 1 :  WH Type Question Passive Voice वाक्याची सुरूवात WH word ने करावी 

Step 2 : सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करणे

Step 3 : कर्माचे रुपांतर कर्त्यात करावे

Step 4 : मुख्य क्रियापदाचे Past Participle लिहावे

Step 5 : by हे preposition लिहावे

Step 6 : कर्तयाचे रुपांतर कर्मात करावे

Step 7 : वाक्यातील इतर शब्द लिहावे 

Step 8 : वाक्याच्या शेवटी ? लिहावे


WH Type Question वाक्याचे Passive Voice बनवताना

Step 1 :  प्रश्नार्थक  passive voice वाक्याची सुरूवात WH word ने करावी 

Active Voice WH Type प्रश्नार्थक वाक्यातील WH word ने प्रश्नाची सुरूवात झाली असते, Passive Voice करताना त्याच WH word प्रश्नार्थक शब्दाने passive voice वाक्याची सुरुवात करावी.

उदाहरणार्थ :

Active Voice

1. When does Sahil bring milk?

When does Sahil bring milk? या WH Type प्रश्नाची सुरूवात 'when' या wh word ने झाली आहे म्हणून Passive Voice करताना वाक्याची सुरुवात त्याच Wh word 'when' ने केली.

Passive Voice

When 


WH Type Question वाक्याचे Passive Voice बनवण्यच्या पुढील सर्व पायर्‍या yes no type question च्या पायर्‍यांसारख्याच बदतात.


Step 2 : to be व इतर सहाय्यकारी क्रियापद वापरावे

Example

When does Sahil bring milk?

When Is


Step 3 : कर्माचे रुपांतर कर्त्यात करावे 

Example

When does Sahil bring milk?

When Is milk


Step 4 : मुख्य क्रियापदाचे Past Participle लिहावे

Example

When does Sahil bring milk?

When Is milk brought 


Step 5 : by हे preposition लिहावे

Example

When does Sahil bring milk?

When Is milk brought by


Step 6 : कर्तयाचे रुपांतर कर्मात करावे

Example

When does Sahil bring milk?

When Is milk brought by Sahil 


Step 8 : वाक्याच्या शेवटी ? लिहावे.

Interrogative Sentence असल्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह लिहावे.

Example

When does Sahil bring milk?

When Is milk brought by Sahil?


1. When does she shut door?

When is door shut by her? 

2. When were People buying vegetables?

When are vegetables being bought by people?

3. When had I sold mangoes? 

When had mangoes been sold by me?

4. How did she speak? 

How is spoken by her? 

5. How did Sahil sing song? 

How was song sung by Sahil? 

6. How will People buy vegetables?

How will vegetables be bought by people? 

7. How does she take book? 

How is book taken by her? 

8. Why does he drink water?

Why is water drunk by him? 

9. Why does Rahul bind roap?

Why is roap bound by Rahul? 

10. Where do Children catch balls?

Where are balls caught by children? 

11. Where shall we send letters?

Where will letters be sent by us? 

12. Which does he send letters?

Which are letters sent by him? 

13. Which was boy choosing fruits?

Which were fruits being chosen by boy? 


What च्या Active Voice प्रश्नार्थक वाक्यात कर्म  नसते अशा वाक्याचे Passive Voice करताना प्रथम कर्म लिहिता येत नाही

1. What does Sahil make? 

What is made by Sahil? 

2. What does Rahul bring? 

What is brought by Rahul? 

3. What is she speaking? 

What is being spoken by her? 

4. What have children caught?

What has been caught by children? 

5. What is Sanjay bringing?

What is being brought by Sanjay? 

6. What does Sahil make?

What is made by Sanjay? 


Who च्या प्रश्नार्थक Active Voice वाक्यात कर्ता नसतो अशा Passive Voice वाक्याची सुरुवात by whom ने करावी.

1. Who did this?

By whom was this done?

2. Who does make kite? 

By Whom is made kite? 

3. Who does bring milk? 

By whom is brought milk? 

4. Who is she speaking? 

By whom is being spoken? 

5. Who has chosen fruits?

By whom has been chosen fruits?

6. Who does sell mangoes?

      By whom is sold mangoes? 

7. Who are building house?

By whom are being built house? 

प्राचीन भारतीय इतिहास : धार्मिक प्रवाह

प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह

१.जैन धर्म, २. बौद्ध धर्म, ३. ज्यू धर्म, ४ ख्रिश्चन धर्म, ५ इस्लाम धर्म, ६ पारशी धर्म


१.जैन धर्म

धर्मात 'अहिंसा' या तत्त्वाला महत्त्व दिलेले आहे.

विकारांवर विजय मिळवणे 

'जिन' म्हणजे 'जिंकणारा'.

'जिन' या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. 


धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन तीर्थंकर म्हणतात, जैन परंपरेत एकूण २४ तीर्थंकर होऊन गेले. 


वर्धमान महावीर (इ.स.पू. ५९९ ते इ.स.पू. ५२७) :

पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला.

वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील चोविसावे तीर्थंकर

जन्म :

बिहार राज्यामध्ये प्राचीन काळच्या वृज्जी नावाचे महाजनपदची राजधानी वैशाली नगराचा एक भाग कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. 


ज्ञानप्राप्ती :

वर्धमान महावीरांनी मिळालेले ज्ञान 'केवल' म्हणजे 'विशुद्ध' स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना 'केवली' असे म्हटले जाते.

विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर म्हटले जाते.


धर्मप्रसार : 

लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे तीस वर्षे उपदेश केला. 

भाषा : 

वर्धमान महावीर 'अर्धमागधी' या लोकभाषेतून लोकांना उपदेश करत. 

समवसरण :

लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत, त्यांना 'समवसरण' असे म्हणत असत.


धर्माची शिकवण :

          जैन धर्म हा शुद्ध आचरणावर भर देतो. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो.


शुद्ध आचरणासाठी वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांमध्ये सामावलेले आहे.


पंचमहाव्रते - 

      अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे पाच नियम : 

१.अहिंसा, २.सत्य, ३.अस्तेय, ४.अपरिग्रह, ५.ब्रह्मचर्य.

१. अहिंसा : 

      कोणत्याही जीवाची हिंसा होईल, किंवा दुखापत होईल असे वागू नये.

२. सत्य : 

      प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी.

३. अस्तेय : 

        'स्तेय' म्हणजे चोरी. चोरी न करणे, म्हणजे अस्तेय. दुसऱ्याच्या मालकीच किंवा हक्काच त्याच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी.

४. अपरिग्रह : 

          मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा न करणे, म्हणजे अपरिग्रह.

५. ब्रह्मचर्य : 

         शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य.


त्रिरत्ने : 

१. 'सम्यक् दर्शन', २. 'सम्यक् ज्ञान' आणि ३. 'सम्यक् चारित्र' 

सम्यक् याचा अर्थ 'संतुलित'

१. सम्यक् दर्शन : 

          तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे.

२. सम्यक् ज्ञान : 

          तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून, त्याचा सखोल अर्थ समजून घेणे.

३. सम्यक् चारित्र : 

         पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे.


२ बौद्ध धर्म

बौद्ध धर्माचे संस्थापक : गौतम बुद्ध 

गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ ते इ.स.पू. ४८३) :

       गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. पित्याचे नाव शुद्धोदन आणि आईचे नाव मायादेवी. 

गौतम बुद्धांचे मूळ नाव : सिद्धार्थ. 

       एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळील 'ऊरुवेला' या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ अवस्थेत त्यांना 'बोधि' प्राप्त झाली. 

'बोधि' म्हणजे सर्वोच्च ज्ञान.

       गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना 'बुद्ध' असे म्हटले गेले. 

     पिंपळाच्या वृक्षाला आता 'बोधिवृक्ष' असे म्हणतात. 

     'ऊरुवेला' या स्थानाला 'बोधगया' असे म्हणतात.

गौतम बुद्धांनी आपला उपदेश 'पाली' या लोकभाषेत केला.

        गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसीजवळ 'सारनाथ' येथे दिले. या प्रवचनात जो उपदेश केला, त्यास 'धम्म' असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला पाली भाषेत 'धम्मचक्कपवत्तन' असे म्हटले जाते. 

       गौतम बुद्धांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे पंचेचाळीस वर्षे 'चारिका' केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. 


'त्रिशरण':

बौद्ध धम्मामध्ये 'बुद्ध' 'धम्म' आणि 'संघ' यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला 'त्रिशरण' असे म्हणतात.


बौद्ध संघ : 

धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला.

गृहस्थ जीवनाचा ते त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना 'भिक्खू' असे म्हटले जाते. 

स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना 'भिक्खुनी' असे म्हणतात.


धम्माचे सार पुढीलप्रमाणे :


आर्यसत्ये : 

मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ये आहेत. त्यांना आर्यसत्ये म्हटलेले आहे.

१. दुःख : मानवी जीवनात दुःख 

२. दुःखाचे कारण : दुःखाला कारण असते.

३. दुःख-निवारण : दुःख दूर करता येते.

४. प्रतिपद : प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. 


पंचशील :

गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच 'पंचशील' असे म्हणतात. 

१. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे.

२. चोरी करण्यापासून दूर राहणे. 

३. अनैतिक आचरणापासून दूर राहणे.

४. असत्य बोलण्यापासून दूर राहणे.

५. मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे.


अष्टांगिक मार्ग :

प्रतिपद म्हणजे दुःखाचा अंत करण्यार्या शुद्ध आचरणाच्या मार्गाला 'अष्टांगिक मार्ग' असे म्हटले आहे.

१. सम्यक् दृष्टी : चार आर्यसत्यांचे ज्ञान होय.

२. सम्यक् संकल्प : हिंसा वगैरे तत्त्वांचा त्याग होय.

३. सम्यक् वाचा : असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे.

४. सम्यक् कर्मान्तः प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे.

५. सम्यक् आजीव : उपजीविका गैर मार्गाने न करता योग्य मार्गाने करणे.

६. सम्यक् व्यायाम : व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. 

७. सम्यक् स्मृती : मन एकाग्र करून विकारांना दूर करणे आणि आपले चित्त योग्य रीतीने समजून घेणे.

८. सम्यक् समाधी : चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. 


३ ज्यू धर्म

भारतात प्रचार : 

इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात केरळमधील कोचीन.

ज्यू धर्माला 'यहुदी' धर्म असेही म्हटले जाते.

तत्व :

देव एकच आहे, असे ज्यू धर्मीय मानतात, 

शिकवण : 

ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. 

प्रार्थनास्थळ : 'सिनॅगॉग'


४ ख्रिश्चन धर्म

स्थापनाक : येशू ख्रिस्त

येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते.

भारतात प्रचार : 

         १२ शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस.

केरळ राज्यातील त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन ५२ मध्ये चर्चची स्थापना केली. 

पवित्र धर्मग्रंथ : 'बायबल'

प्रार्थनास्थळ : 'चर्च'

ख्रिश्चन धर्माची शिकवण : 

देव एकच आहे, तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे.

आपण सारे एकमेकांचे बंधुभगिनी आहोत.

आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील.

चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे.


५. इस्लाम धर्म : 

भारतात प्रसार : 

इसवी सनाच्या सातव्या शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतात केरळच्या किनाऱ्यावर इस्लामचे आगमन झाले. 

संस्थापक : मुहम्मद पैगंबर

पवित्र धर्मग्रंथ : पवित्र कुरआन

धर्माची शिकवण :

इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. 

अल्ला एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. 

सर्वकाळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे, 

तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे, 

मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे,

 प्रार्थनास्थळ : 'मशीद'


६. पारशी धर्म

पारशी लोक इराणच्या ‘पार्स' किंवा 'फार्स' नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना 'पारशी' या नावाने ओळखले जाते.

संस्थापक : झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक.

देवाचे नाव : 'अहुर मज्दू'

पवित्र ग्रंथ : 'अवेस्ता'

प्रार्थना स्थळ : ‘अग्यारी'

तीन प्रमुख आचरणतत्त्वे : 

उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती.

पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या दोन तत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे. 

त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. 

प्राचीन भारतीय इतिहास : 'जनपदे व महाजनपदे'

 जनपदे व महाजनपदे

१ जनपदे

इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ६०० या वैदिकोत्तर कालखंडात जनपदे अस्तित्वात आली.

संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात आणि ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून माहिती मिळते. 

जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये.

प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती. 

विस्तार : 

भारतीय उपखंडाच्या वायव्येला आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती.

महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या 'अश्मक' या जनपदाने व्यापलेला होता.

गणपरिषद :

जनपदांमधील गणपरिषदेचे ज्येष्ठ सदस्य व्यक्ती एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. त्या सभागृहास 'संथागार' असे म्हटले जाई. 

गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. 


२. महाजनपदे

   १ . कोसल

विस्तार : हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश.

राजधानी : श्रावस्ती.

कोसलचा राजा : प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन


   २. वत्स 

विस्तार : 

उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेश

राजधानी : कोसम

प्राचीन काळचे कौशांबी नगर.

महत्त्वाचे व्यापारी केंद्र.

 

   ३. अवंती

विस्तार :

मध्य प्रदेशातील माळवा प्रदेश

राजधानी : उज्जयिनी (उज्जैन)

उज्जयिनी - महत्त्वाचे व्यापारी केंद्र

अवंतीचा राजा : प्रयोत वास् 

हा वर्धमान महावीर बििं आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन


४.  मगध

बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग.

राजधानी : राजगृह (राजगीर)

महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता.

जीवक हा प्रसिद्ध वैदय बिंबिसाराच्या दरबारात होता.


सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे: 

प्राचीन नावे    आधुनिक नावे

(१) काशी - बनारस

(२) कोसल -  लखनौ

(३) मल्ल -  गोरखपूर

(४) वत्स -   अलाहाबाद

(५) चेदि -    कानपूर

(६) कुरु -    दिल्ली

(७) पांचाल - रोहिलखंड

(८) मत्स्य -  जयपूर

(९) शूरसेन - मथुरा

(१०) अश्मक - औरंगाबाद महाराष्ट्र

(११) अवंती -  उज्जैन

(१२) अंग -  चंपा-पूर्व बिहार

(१३) मगध -  दक्षिण-बिहार

(१४) वृज्जी - उत्तर बिहार

(१५) गांधार - पेशावर

(१६) कंबोज - गांधारजवळ

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

PASSIVE VOICE - Imperative Sentence

Imperative Sentence आज्ञार्थी वाक्याचे Passive Voice तयार करणे.

Imperative Sentence आज्ञार्थी वाक्य :

Active Voice आज्ञार्थी वाक्याची रचना :

Verb+ object + वाक्यातील इतर शब्द.

Give me pen. 

Imperative Sentence आज्ञार्थी वाक्य नेहमी वर्तमानकाळत असते.

Imperative Sentence आज्ञार्थी वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते

Imperative Sentence या वाक्यात कर्ता दिलेला नसतो तो कर्ता नेहमी you हाच गृहीत धरला जातो.


Imperative Sentence आज्ञार्थी वाक्य Passive Voice चा रचना :

Let + object + be + verb past participle + इतर शब्द.


Imperative Sentence आज्ञार्थी वाक्य Passive Voice च्या पायर्‍या Steps :

     Step 1 : आज्ञार्थी वाक्याचे Passive Voice वाक्याची सुरुवात Let ने करावी

    Step 2 : Let नंतर वाक्यातील object कर्म लिहावे

    Step 3 : object कर्म लिहील्या नंतर be हे क्रियापद लिहावे

   Step 4 : be हे क्रियापद लिहील्या नंतर मुख्य क्रियापदाचे past participle लिहावे

    Step 5 : मुख्य क्रियापदाचे past participle लिहील्या नंतर वाक्यातील इतर शब्द लिहावे.


Drink water everyday. या वाक्याचे passive voice करुया. 

Step 1 :

             Drink water everyday. या Active Voice आज्ञार्थी वाक्याच्या Passive Voice वाक्याची सुरुवात Let ने केली.

Active Voice : Drink water everyday.

Passive Voice : Let 


Step 2 :

            Let ने वाक्याची सुरुवात केल्या नंतर Drink water everyday. या वाक्यातील object कर्म water हे लिहिले.

Active Voice : Drink water everyday.

Passive Voice : Let water


Step 3 :

            Water हे object कर्म लिहील्या नंतर be हे क्रियापद लिहीले. 

Active Voice : Drink water everyday.

Passive Voice : Let water be 


Step 4 : 

            be हे क्रियापद लिहील्या नंतर Drink water everyday. या वाक्यातील drink या मुख्य क्रियापदाचे past participle drunk लिहोले. 

Active Voice : Drink water everyday.

Passive Voice : Let water be drunk 


Step 5 : 

            Drunk हे मुख्य क्रियापदाचे past participle लिहील्या नंतर Drink water everyday. या वाक्यातील इतर शब्द everyday लिहीला.

Active Voice : Drink water everyday.

Passive Voice : Let water be drunk everyday.


Examples : 

1. Drink water everyday.

    Let water be drunk everyday. 

2. Bring milk in morning.

    Let milk be brought in morning.

3. Buy vegitables from market.

    Let vegetables be bought from market.

4. Sell fruits today.

    Let fruits be sold today. 

5. Make tea for me.

    Let tea be made for me. 

6. Teach history to students in class. 

    Let history be tought to students in class.  

7. Pay money properly.

    Let money be paid properly.

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

प्राचीन भारतीय इतिहास : वैदिक संस्कृती

                वैदिक संस्कृती 

१. वैदिक वाङ्मय, 

२. कुटुंबव्यवस्था व जीवन

३. व्यवसाय, आर्थिक आणि सामाजिक जीवन,

४. धर्मकल्पना, 

५. शासनव्यवस्था


१ वैदिक वाङ्मय

     ''वेद' वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय.

      वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. 

     ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत.

     वेदांच्या ग्रंथांना 'संहिता' असे म्हणतात.

    'वेद' ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ 'ज्ञान' असा वेदांना 'श्रुति' असेही म्हणतात.


१. ऋग्वेद संहिता : 

       ऋग्वेद हा मूळ वेद मानला जातो.

       ऋचांनी बनलेला वेद म्हणजे 'ऋग्वेद' होय. 

       'ऋचा' म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पदय.

       ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत.


२. यजुर्वेद संहिता : 

          यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटल्या जाणार्‍या पद्यात असलेल्या मंत्रांचे गद्यात स्पष्टीकरण व मंत्रांचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन कले आहे.


३. सामवेद संहिता : 

          यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन तालासुरांत कसे करावे हे सांगितले आहे. भारतीय संगीताच्या पाया सामवेदात आहे.


४. अथर्ववेद संहिता : 

           अथर्व ऋषींच्या नावा वरून अथर्ववेदाच्या संहितेला  नाव देण्यात आले आहे. यामध्ये खालील गोष्टींचेही मार्गदर्शन केलेले आहे.

        दैनंदिन जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी, 

       आयुष्यातील संकटांवर, दुखण्यांवर उपाय, 

       अनेक औषधी वनस्पतींची माहिती, 

        राजाने राज्य कसे करावे, 


संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांचाही समावेश वेदवाङ्मयात केला जातो.

ब्राह्मण ग्रंथ :

          यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा, हे 'ब्राह्मणग्रंथ' सांगतात. प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मणग्रंथ आहेत.

आरण्यके : 

           अरण्यात जाऊन, एकाग्र चित्ताने केलेले चिंतन 'आरण्यक' ग्रंथांमध्ये मांडलेले आहे. 

उपनिषदे : 

           'उपनिषद्' म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान. 

जन्म-मृत्यूसारख्या घटनांबद्दल मनात असलेल्या अनेक गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे.

'स्मृति' व 'पुराण' नावाचे वाङ्मय निर्माण झाले. 


'हिंदू' : 

वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने 'हिंदू' या नावाने ओळखला जाऊ लागला. 


२ कुटुंबव्यवस्था व जीवन

            वेदकाळात एकत्र कुटुंबपद्धती ही कुटुंबव्यवस्था पुरुषप्रधान होती.

            कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे 'गृहपती' असे.  

            स्त्रियांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान दुय्यम होत गेले.


घरे :

       वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. घरासाठी 'गृह' किंवा 'शाला' हे शब्द वापरले जात.


आहार :

तृणधान्य : गहू, सातू, तांदूळ या  समावेश होता. 

         वैदिक वाङ्मयात ''यव' म्हणजे सातू (बार्ली), 'गोधूम' म्हणजे गहू, 'व्रीही' म्हणजे तांदूळ यांसारखे शब्द आढळतात.

         दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ तसेच उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही आहारात समावेश.


वस्त्र :

       वेदकालीन लोक लोकरी आणि सुती व वापरत, 

      'विल्कले' म्हणजे झाडांच्या सालींपासून तयार केलेली वस्त्रे,

       प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र. 


अलंकार :

         स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत, "निष्क' नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय.


मनोरंजनाची साधने:

           गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, स्थांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. 

वाद्य : 

      वीणा, शततंतू, झांजा आणि शंख, डमरू आणि मृदंग ही त्यांची प्रमुख वाद्य. 


३. व्यवसाय

शेती :

वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. 

अनेक बैल जुंपन नांगरनी केली जाई. 

खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. 


पशुपालन :

       वैदिक काळात घोडा, गाय-बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते.

     गाय: गाईंचा उपयोग विनिमयासाठी केला जाई. त्यामुळे गाईंना विशेष किंमत होती.

      घोडा :  घोड्याला माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते, अत्यंत वेगाने पळणारा प्राणी.

      रथ : घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे रथ खूप वेगवान होते. 


श्रेणी

       व्यावसायिक, कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक 'श्रेणी' या नावाने ओळखले जाई त्यांचे स्वतंत्र संघ होते. 

श्रेष्ठी : श्रेणींच्या प्रमुखाला 'श्रेष्ठी म्हणत असत. 


वर्ण व्यवस्था : 

          समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. 

         वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या, 


चार आश्रम : 

       जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम' चार आश्रम' असे म्हटलेले आहे. 

१. पहिला टप्पा 'ब्रह्मचर्याश्रम' :

        गुरूजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ.

२. दुसरा टप्पा 'गृहस्थाश्रम' :

        पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी कर्तव्ये पत्नीच्या साहाय्याने पार पाडावीत.

३. तिसरा टप्पा 'वानप्रस्थाश्रम' :

        घरादाराचा मोहाचा त्याग करून, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी अत्यंत साधेपणाने जगावे.

४. चौथा टप्पा 'संन्यासाश्रम':

         मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्यजन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये.


४. धर्मकल्पना :

          सुर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नदया यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले.

हवी : देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करणे म्हणजे 'हवी'.

यज्ञ : अग्नीमध्ये 'हवी' अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ.

सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे रुप बदलून पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण झाले त्यामुळे कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व वाढले.


५. शासनव्यवस्था :

ग्रामणी : प्रत्येक ग्रामवसाहतीचा प्रमुख म्हणजे 'ग्रामीण'.

 विश् : ग्रमावसाहतींचा समूह म्हणजे 'विश्'.

विश्पति : विश् च्या प्रमुखाला 'विश्पति' असे म्हणत. 

जन : अनेक 'विशु' मिळून 'जन' तयार होत असे.

जनपद :

       'जन' जेव्हा एखादया विशिष्ट प्रदेशात स्थिरावले, तेव्हा त्या प्रदेशाला ‘जनपद' म्हटले.

नृप' किंवा 'राजा' :

       'जन' च्या प्रमुखाला 'नृप' किंवा 'राजा' म्हटले जाई.

राजाची कर्तव्ये :

प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करण, उत्तम राज्यकारभार करणे . 

     राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास साहाय्य करण्यासाठी विशेष महत्त्वाचे अधिकारी होते आणि  'राजाला मार्गदर्शन करण्यासाठी चार संस्था होत्या. 

 विशेष महत्त्वाचे अधिकारी : 

     पुरोहित, सेनापती आणि भागदुघ

भागदुघ:

           करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला 'भागदुघ' असे म्हणत.

 राजाला मार्गदर्शन करणार्या संस्था : 

        'सभा', 'समिती', 'विदथ' आणि 'जन'

        'सभा' आणि 'विदथ' या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे.

 सभा :

         राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास 'सभा' म्हणत

समिती :

          लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस 'समिती' असे म्हणत. 

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...