सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

Modal Auxiliaries

 Modal Auxiliaries 

Can, could, shall, should, will, would, may, might, must, ought to, need, dare, used to. 

यांच्या सहाय्याने मानसिक कल्पना किंवा विचार प्रकट केले जातात. (मन:स्थिती, परवानगी, शक्यता, बंधन, अपेक्षा, आशा, इच्छा)


Modal Auxiliaries पैकी Can, could, shall, should, will, would, may, might, must, ought to यांना Descriptive Verbs असे म्हणतात.


Descriptive Verbs म्हणजे 

कर्ता कोणत्याही पुरुष वचन यामध्ये असला तरी त्यांचे रूप एकच असते.

त्यांना स्वतःचा अर्थ नाही म्हणून स्वतंत्र क्रियापद म्हणून वापरता येत नाही त्यांच्याबरोबर मुख्य क्रियापद वापरतात. 

त्यांचे infinitive रूप तयार होत नाही. 

त्यांचे ing युक्त रूपही तयार होत नाही. 

त्यांना तृतीय पुरुषी एकवचनी रूपात s लागत नाही.  


Modal Auxiliaries वापरल्याने खालील प्रमाणे उपयोग केला जातो परंतु वाक्य उपयोग जरी सामान्य असला तरी आपण कोणत्या अर्थाने वापरतो तो संर्दभ महत्त्वाचा असतो त्यावरून त्या वाक्याचा अर्थ निश्चित होतो


1. Can - 

  सामर्थ्य, शक्यता, परवानगी, विनंती, सूचना, अनुमती, मनाई

1. Sahil can sing. सामर्थ्य क्षमता

साहिल गाऊ शकतो.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिलमध्ये गाण्याचे सामर्थ्य किंवा क्षमता आहे'. 

2. Rahul can bind roap. शक्यता 

राहूल दोर बांधू शकतो. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहुल दोर बांधण्याची शक्यता आहे'. 

3. Sanjay, please can You bring milk? विनंती

संजय, कृपया तू दूध आणू शकतो?

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की,' संजयला दूध आणण्यासाठी विनंती केली आहे'. 

4. Shankar can build house.परवानगी

शंकर घर बांधू शकतो. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'शंकरला घर बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली'.

5. People can buy vegetables.  सूचना 

लोक भाज्या विकत घेऊ शकतात. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'लोकांना भाज्या विकत घेण्यासाठी सूचना केली आहे'.

6. Children can catch balls. अनुमती 

मुले चेंडू पकडू शकतात. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'मुलांना चेंडू पकडण्यासाठी अनुमती देण्यात आली'. 

7. Boys can't choose fruits. मनाई

मुले फळे निवडू शकत नाही.  

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'मुलांना फळे निवडण्यास मनाई आहे'. 


2. could - 

  can या सहाय्यकारी क्रियापदाचे भूतकाळातील रूप आहे.

  शक्यता, अनुमान, विनंती, नम्रता, गूढता, अधिरता,

  अप्रत्यक्ष कथन करताना,

 खालील वाक्यात विशेष उपयोग म्हणजे 'शक्यता असूनही न केलेली गोष्ट' सांगताना उपयोग केला आहे 

1. Sahi could begin sing. शक्यता

साहिल गायला सुरूवात करू शकत होता. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

'साहिल गाण्याची सुरुवात करण्याची शक्यता होती'. 

2. Rahul could bind roap. अनुमान

राहूल दोर बांधू शकला.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

'राहूल दोर बांधू शकला' असा अनुमान काढला जातो. 

3. Sanjay Please, could you bring milk? विनंती

संजय कृपया तू दूध आणू शकत होता?

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

'संजयला दूध आणण्यासाठी विनंती केली आहे'.

4. Could Shankar build house for me? नम्रता

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, शंकर मला घर बांधू शकतो? 

5. What could People be? गूढता

लोक काय करु शकतात?

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

लोकांनी काय कराव असा गूढता व अधिरता व्यक्त केली आहे. 


3. shall

भविष्यकाळासाठी उपयोग, परवानगी, सूचित आमंत्रण, आश्वासन आणि वचन.

द्वितीय व तृतीय पुरुषी सर्वनाम बरोबर वापरून धमकी, आज्ञा, निर्धार व्यक्त करता येतो

1. Sahil will begin sing. भविष्यकाळ

साहिल गायला सुरूवात करेल.

या वाक्यात भविष्यकाळ व्यक्त केला आहे.

2. We shall bind roap. भविष्यकाळ

आम्ही दोर बांधू.

या वाक्यात भविष्यकाळ व्यक्त केला आहे.

3.  Shall we bring milk. परवानगी

आम्ही दूध आणू?

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

या वाक्यात परवानगी मागितली आहे

4. You shall not build house. सूचित/धमकी

तू घर बांधू नको.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

या वाक्यात धमकी देण्यात केली आहे 

5. You shall buy vegetables. आज्ञा

तू भाज्या विकत घे.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

या वाक्यात आज्ञा देण्यात केली आहे 


4. should

  shall या सहाय्यकारी क्रियापदाचा भूतकाळातील रूप आहे. 

  एखादी क्रिया घडण्याची अपेक्षा असते.

  क्रिया करणे भाग आहे अशा अर्थाने वापरतात.

  कर्तव्य, नैतिक बंधन, परवानगी, माहिती, मत, सूचना

  नम्रतापूर्वक औपचारिक विंनती.

1. Sahil should begin sing. कर्तव्य 

साहिलने गायला सुरूवात केली पाहिजे.

या वाक्यात साहिलचे गायणाचे कर्तव्य व्यक्त केले आहे.

2. Rahul should bind roap. नैतिक बंधन

राहूलने दोर बांधला पाहिजे. 

या वाक्यात राहुलला दोर बांधण्याचे बंधन व्यक्त केले आहे.

3. Sanjay should bring milk. परवानगी 

संजयने दूध आणेल पाहिजे.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की,  

संजयला दूध आणण्यासाठी परवानगी आहे 

4. Shankar should build house. विनंती

शंकरने घर बांधले पाहिजे. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

शंकरला घर बांधण्यासाठी विनंती केली आहे

5. People should be buy vegetables. 

लोकांनी भाज्या विकत घेतल्या पाहिजेत. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

लोकांना भाज्या विकत घेतल्याची माहिती देण्यात आली आहे


5. will भविष्यकाळासाठी उपयोग

इच्छा, संकल्प, वचन, धमकी, निर्णय, अनुमान, गृहीत, शक्यता, विनंतीसाठी, अप्रत्यक्ष आज्ञा/हुकूम

अटदर्शक वाक्यात, विशिष्ट सवयीचे वर्णन.

1. Sahil will begin sing. (भविष्यकाळ)

साहिल गायला सुरूवात करेल. या वाक्याच्या संदर्भानुसार क्रियापदाचा भविष्यकाळ व्यक्त होतो

2. Rahul will bind roap. इच्छा 

राहूलला दोर बांधायचा आहे. या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, राहुलला दोर बांधायची इच्छा आहे.

3. Sanjay will bring milk. वचन

संजय दूध आणेल. या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, संजय दूध आणायच वचन देत आहे.

4. Shankar will build house. निर्णय 

शंकर घर बांधेल. या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, शंकरने घर बांधायचा निर्णय घेतला आहे.

5. People will buy vegetables. अनुमान 

लोक भाज्या विकत घेतील. या घटनेच्या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, लोक भाज्या विकत घेतील असे अनुमान काढले आहे

6. Children will catch balls. गृहित

मुले चेंडू पकडतील. या घटनेच्या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, मुले चेंडू पकडतील हे गृहित धरले आहे निश्चित ठरले आहे

7. Boys will choose fruits. सवय

मुलगे फळे निवडतील. या घटनेच्या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, मुलांना फळे निवडण्याची अशी सवय आहे आणि ते तसेच करतील


6. would

  will या सहाय्यकारी क्रियापदाचा भूतकाळातील रूप.

  अटदर्शक वाक्यात नम्र विनंती, इच्छा, मत, निश्चय, संभव, अप्रत्यक्ष कथन, सवय

1. Sahil would begin to sing. मत

साहिलने गायला सुरूवात केली असती.  या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिलने गायला सुरूवात केली असती.' असे मत व्यक्त केले आहे 

2. Rahul would bind roap. निश्चय 

राहूलने दोर बांधला असता. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहूलने दोर बांधायचा निश्चय केला आहे'. 

3. Sanjay would bring milk. संभव

संजय दूध आणले असते. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'संजय दूध आणण्याची संभाव्यता आहे'.

4. Shankar would build house. इच्छा 

शंकरला घर बांधायचे होते.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'शंकरला घर बांधायची इच्छा आहे'. 

5. People would buy vegetables. सवय

लोक भाज्या विकत असत. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'लोकांना भाज्या विकत घेण्याची सवय आहे'. 

6. Would you Children catch balls? नम्र विनंती 

मुलांनो तुम्ही चेंडू पकडाल? 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'मुलांना चेंडू पकडण्यासाठी विनंती केली आहे'. 

7. Boys would choose fruits. भूतकाळ 

मुलानी फळे निवडली असती. 


7. may

  परवानगी, शक्यता, संभाव्यता, सदिच्छा, हेतू, विनंती

1. Sahil may begin to sing. परवानगी

साहिल गायला सुरूवात कर. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

'साहिलला गाण्याची सुरुवात करण्याची परवानगी आहे'.

2. Rahul may be bind roap. शक्यता

राहूल दोर बांधू शकतो. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहूल दोर बांधण्याची शक्यता आहे'. 

3. Sanjay may bring milk. संभव

संजय कदाचित दूध आणू शकतो. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, '

संजय कदाचित दूध आणेल'.

4. Shankar may build house. सदिच्छा

शंकरला घर बांधायच आहे. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'शंकरला घर बांधायची आहे'. 

5. People may buy vegetables. हेतू

लोक भाज्या विकत घेतात. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'लोकांचा भाज्या विकत घेण्याचा हेतू आहे'. 

6. Children may catch balls. विनंती

मुलांनो तुम्ही चेंडू पकडा. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'मुलांना चेंडू पकडण्याची विनंती केली आहे'.


9. must

  आवश्यकता, आज्ञा, संभव, शक्यता, कर्तव्य, निश्चितता, अनुमान, 

  दाट शक्यता गृहीत धरून, 

  नकार, करू नये, मनाई, प्रतिबंध

1. Sahil must begin sing. आवश्यकता

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिल गायला सुरूवात करयायची आवश्यकता आहे'. 

2. Rahul, must bind roap. आज्ञा

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहूल, दोर बांधन'. 

3. Sanjay must bring milk. संभव

संजय दूध आणले

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'संजय दूध आणण्याची संभाव्यता आहे'. 

4. Shankar must build house. शक्यता

शंकर घर बांधू शकतो. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'शंकरने घर बांधायची शक्यता आहे'.

5. People must go to market, निश्चितता

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'लोकांंनी बाजारात जायच निश्चित केले आहे'.

 6. They must buy vegetables. कर्तव्य

ते भाज्या विकत घेतात. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की,

'भाज्या विकत घेण्याच त्यांच कर्तव्य आहे'. 


10. ought to 

  प्रबळ नैतिक बंधन, कर्तव्य, इष्टता, 

  दाट शक्यता किंवा अनुमान

1. Sahil ought to begin sing. प्रबळ नैतिक बंधन,

'साहिलनेच गायला सुरूवात करायची'. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिलने गायला सुरूवात करायचा एक नियम आहे'. 

2. Rahul ought to bind roap. कर्तव्य 

'राहूल दोर बांधतो'. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'दोर बंधन्याचे कर्तव्य राहुलचे आहे'. 

3. Sanjay ought to bring milk. इष्टता

'संजयने दूध आणलेले योग्य'.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'संजय दूध आणलेले इष्ट असते'. 

4. Shankar ought to build house. दाट शक्यता

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'शंकरने घर बांधायची दाट शक्यता आहे'.

5. People ought to go to market now. अनुमान 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'लोक बाजारात जातात'.


11. need

  मुख्य क्रियापद म्हणून 

Need, needs, needed

  सहाय्यकारी क्रियापद म्हणून

गरज, शक्यता व्यक्त होते 

'to' infinitive सोबत need चा उपयोग केला जातो 

Must च्या विद्यार्थ्यांना needn't

1. Sahil needs singing. मुख्य क्रियापद म्हणून 

Need, needs, needed

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिला गायची गरज आहे'. 

2. Rahul needs help to bind roap. सहाय्यकारी क्रियापद म्हणून

गरज, शक्यता व्यक्त होते 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहूला दोर बांधन्याला मदत करण्याची आवश्यकता आहे'. 

3. Sanjay need to bring milk. 'to' infinitive सोबत need चा उपयोग केला जातो 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'संजयने दूध आणायला आवश्यकता आहे'. 

4. Shankar must build house. 

शंकरने घर बांधलेच पाहिजे. 


Must च्या विरुध्द needn't

Shankar needn't build house

शंकरला घर बांधलेची आवश्यकता नाही. 


12. dare

  मुख्य क्रियापद म्हणून 

आव्हान देणे, धैर्य असणे

  सहाय्यकारी क्रियापद म्हणून, प्रश्नार्थक वाक्ये बनवण्यासाठी, नकारात्मक वाक्ये बनवण्यासाठी 


1. Sahil dare begin sing. मुख्य क्रियापद म्हणून आव्हान देणे, धैर्य असणे

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिल गायला सुरूवात करण्याची धाडस करतो'. 


सहाय्यकारी क्रियापद म्हणून प्रश्नार्थक वाक्ये बनवण्यासाठी 

2. How dare Rahul bind roap? 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहूलने दोर बांधायचे धाडस कसे केले'? 


नकारात्मक वाक्ये बनवण्यासाठी 

3. Sanjay does not dare to bring milk.

संजय दूध आणू शकत नाही.


13. used to

  या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी केला जातो.

1. Sahil used to begin sing.

2. Rahul used to bind roap.

3. Sanjay used to bring milk.

4. Shankar used to build house. 

5. People used to go to market.

6. They used to buy vegetables. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...