विभक्ती व विभक्तीचे प्रकार

विभक्ती

विभक्तीचे प्रकार :

(१) प्रथमा, (२) द्वितीया, (३) तृतीया, (४) चतुर्थी, (५) पंचमी, (६) षष्ठी, (७) सप्तमी, (८) संबोधन

नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण यांसारखे प्रकारचे शब्द वापरून आपण वाक्य तयार करत असतो. वाक्यातील शब्द त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो.

विकार :-

वाक्यात शब्द वापरताना त्यांच्या स्वरूपात जो बदल करावा लागतो. त्याला विकार म्हणतात. 

कारक :-

वाक्यातील मुख्य शब्दाचा इतर शब्दांशी काही ना काही संबंध असतो. या संबंधाला व्याकरणात कारक असे म्हणतात.

विभक्ती :-

वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो त्याला व्याकरणात 'विभक्ती' असे म्हणतात.

प्रत्यय :-

नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यांस 'प्रत्यय' असे म्हणतात. 

सामान्यरूप :-

नामाच्या किंवा सर्वनामाच्या विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी स्वरूपाला 'सामान्यरूप' असे म्हणतात.

विभक्तीचे प्रकार

विभक्तीचे एकंदर आठ प्रकार आहेत

(१) प्रथमा, (२) द्वितीया, (३) तृतीया, (४) चतुर्थी, (५) पंचमी, (६) षष्ठी, (७) सप्तमी, (८) संबोधन

 

एकवचन व अनेकवचन

विभक्ती प्रत्ययांमध्ये वचनानुसार बदल होतात.

 

एकवचन

अनेकवचन

विभक्ती

मुख्य प्रत्यय

उदाहरण

मुख्य प्रत्यय

उदाहरण

प्रथमा

प्रत्यय नाही

फूल

 

फुले

द्वितीया

स, ला

फुलास / फुलाला

स, ला, ना, ते

फुलांस /फुलांना

तृतीया

ने, शी

फुलाने / फुलाशी

ने, ई, ही, शी

फुलांनी / फुलांशी

चतुर्थी

स, ला

फुलास / फुलाला

स, ला, ना, ते          

फुलांस / फुलांना

पंचमी

ऊन, हून

फुलाहून

ऊन, हुन

फुलांहून

षष्ठी

चा, ची, चे

फुलाचा / फुलाची / फुलाचे

चा, ची, चे, च्या 

फुलांचा / फुलांची / फुलांचे

सप्तमी

त, ई, आ

फुलात

त, ई, आ

फुलांत

संबोधन

नो

फुला  

हाक मारणे

नो

फुलांनो


आठव्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते म्हणून 'संबोधन' असे नाव दिले आहे.                                 


सर्वनाम; (मी-आम्ही, तू- तुम्ही, तो-ते, ती-त्या)

 

एकवचन

अनेकवचन

विभक्ती

मुख्य प्रत्यय

उदाहरण

मुख्य प्रत्यय

उदाहरण

प्रथमा

प्रत्यय नाही

मी, तू, तो, ती    

 

आम्ही, तुम्ही, ते, त्या

द्वितीया

स, ला

मला, तुला, त्याला, तिला

स, ला, ना, ते

आंम्हास, आम्हाला

तुम्हास, तुम्हाला

त्यांना, त्यांस 

तृतीया

ने, शी

तिने, त्याने

ने, ई, ही, शी

आम्हीही, तुम्हीही, त्यांनी, त्यांनीही

चतुर्थी

स, ला

मला, तुला, त्याला, तिला

स, ला, ना, ते          

आंम्हास, आम्हाला

तुम्हास, तुम्हाला

त्यांना, त्यांस

पंचमी

ऊन, हून

मीहून, तूहून, तोहून, तिहून

ऊन, हुन

आम्हीहून, तुम्हींहून, तेहून, त्याहून

षष्ठी

चा, ची, चे

झा, झी, झे, झ्या

माझा, माझी, माझे, माझ्या

तुझा, तुझी, तुझे, तुझ्या

त्याचा, त्याचे, त्याची, त्याच्या

तिचा, तीचे, तिची, तिच्या  

चा, ची, चे, च्या 

आंमचा, आंमची, आंमचे, आंमच्या

तुमचा, तुमची, तुमचे, तुमच्या

त्यांचा, त्यांचे, त्यांची, त्यांच्या

सप्तमी

त, ई, आ

माझ्यात, तुझ्यात, तिच्यात

त, ई, आ

आंम्हात, तुमच्यात, त्यांच्यात


विभक्ती प्रत्यय ओळखणे

विभक्तीचा मुख्य कारकार्थ समजून घेणे महत्त्वाचे आहे; विशेषतः द्वितीया–चतुर्थीचे प्रत्यय अनेकदा सारखे असतात.


विभक्ती

मुख्य प्रत्यय

उदाहरण

प्रथमा

प्रत्यय नाही

मुलगा खेळतो.

पक्षी उडतो.

मुले अभ्यास करतात.

द्वितीया

स, ला

मी मुलाला पाहिले.

तिने भावाला बोलावले.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला.

तृतीया

ने, शी

रामाने पेनाने लिहिले.

आईने चाकूने भाजी कापली.

तो मित्राशी बोलला.

चतुर्थी

स, ला

आईने मुलाला दूध दिले.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली.

मी भावाला भेट दिली.

पंचमी

ऊन, हून

तो मुंबईहून आला.

पक्षी झाडावरून खाली पडला.

नदी डोंगरातून वाहते.

षष्ठी

चा, ची, चे

हा रामचा भाऊ आहे.

ही सीतेची वही आहे.

हे मुलांचे खेळणे आहे.

सप्तमी

त, ई, आ

मुले मैदानात खेळतात.

पुस्तक टेबलावर आहे.

मासे पाण्यात राहतात.

संबोधन

नो

मुलांनो! लक्ष द्या.

मित्रांनो! शांत बसा.

हे देवा! माझे रक्षण कर.


विभक्ती व कारकार्थ

विभक्ती

मुख्य प्रत्यय

कारकार्थ

उदाहरण

प्रथमा

प्रत्यय नाही

कर्ता

सीमा गाणे म्हणते.

राम शाळेत गेला.

शेतकरी शेतात काम करतो.

द्वितीया

स, ला

कर्म

मी पुस्तकाला हात लावला.

मी रामाला पाहिले.

मी पुस्तक वाचले.

तृतीया

ने, शी

करण/साधन

शेतकरी नांगराने जमीन नांगरतो.

रामाने पेनाने लिहिले.

त्याने तलवारीने युद्ध केले.

चतुर्थी

स, ला

संप्रदान

बाबांनी मुलाला पैसे दिले.

आईने रामाला पुस्तक दिले.

आईने मुलाला पैसे दिले.

पंचमी

ऊन, हून

अपादान/वियोग

पक्षी पिंजऱ्यातून बाहेर आला.

राम शाळेतून घरी आला.

तो गावाहून आला.

षष्ठी

चा, ची, चे

संबंध

हा माझ्या भावाचा शर्ट आहे.

ही रामाची वही आहे.

हा भारताचा इतिहास आहे.

सप्तमी

त, ई, आ

अधिकरण/स्थान

पुस्तके कपाटात आहेत.

राम शाळेत आहे

विद्यार्थी वर्गात बसले आहेत.

संबोधन

नो

हाक मारणे

 

अरे मित्रा! इकडे ये.

राम! इकडे ये.

मित्रा! माझे ऐक

सामान्यतः

प्रथमा–कर्ता, द्वितीया–कर्म, तृतीया–करण, चतुर्थी–संप्रदान, पंचमी–अपादान, षष्ठी–संबंध आणि सप्तमी–अधिकरण असे मुख्य संबंध लक्षात ठेवता येतात.


द्वितीया व चतुर्थी यांतील फरक

दोन्ही विभक्तींना स, ला, ना इत्यादी प्रत्यय येऊ शकतात; त्यामुळे केवळ प्रत्यय पाहून निर्णय घेता येत नाही. वाक्यातील अर्थ पाहावा.

द्वितीया – कर्म

पोलिसांनी चोराला पकडले.

येथे पकडण्याची क्रिया चोरावर घडली आहे. म्हणून चोराला - द्वितीया.

मी मुलाला पाहिले. - द्वितीया

राजाने प्रधानास बोलावले. – द्वितीया

चतुर्थी – संप्रदान

शिक्षकांनी विद्यार्थ्याला पुस्तक दिले.

येथे पुस्तक देण्याची क्रिया विद्यार्थ्याला केली आहे. म्हणून विद्यार्थ्याला - चतुर्थी.

मी मुलाला पुस्तक दिले.- चतुर्थी

राजाने प्रधानास बक्षीस दिले. – चतुर्थी

विशेष लक्षात ठेवा:

द्वितीया आणि चतुर्थी या दोन्हींचे प्रत्यय अनेकदा सारखे असल्यामुळे वाक्याचा अर्थ आणि क्रियेचा संबंध पाहून विभक्ती ठरवावी.

विभक्ती व शब्दयोगी अव्यय

उच्च वर्गात विभक्तीबरोबर विभक्तिप्रतिरूपक शब्दयोगी अव्यय यांचाही अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

विभक्ती

शब्दयोगी अव्यय

उदाहरणे

द्वितीया

प्रति, लागी

त्याने माझ्या प्रति आदर व्यक्त केला

तृतीया

कडून, द्वारा, मुळे, प्रमाणे

त्याने मित्राकडून माहिती घेतली.

चतुर्थी

करिता, साठी, प्रति

देशासाठी त्याने काम केले.

पंचमी

पासून, पेक्षा, शिवाय

माझ्यापेक्षा तो उंच आहे

षष्ठी

संबंधी, विषयी

पर्यावरणासंबंधी चर्चा झाली.

सप्तमी

.मध्ये, आत, खाली, समोर

घराच्या समोर झाड आहे.

 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

निवडणूक प्रक्रिया इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

राजकीय पक्ष इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र