सोमवार, २५ एप्रिल, २०२२

युरोपातील धर्मयुद्धे Crusades (क्रुसेडस्)

युरोपातील धर्मयुद्धे Crusades(क्रुसेडस्):

जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आहेत. अकराव्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे Crusades(क्रुसेडस्) म्हणतात.

एकूण नऊ धर्मयुद्धे झाली. ..१०९६ मध्ये पहिले धर्मयुद्ध झाले. दुसऱ्या धर्मयुद्धाच्या दरम्यान पोप युजिनिअस (तिसरा) याने फ्रेंच राजा सातवा लुई आणि जर्मन सत्ताधीश तिसरा कॉनरॅड यांना मदतीस घेतले. तुर्कांनी त्यांचा पराभव केला. इजिप्तचा प्रमुख सलादिन याने ..११८७ मध्ये जेरुसलेम जिंकून घेतले. या धर्मयुद्धांचा शेवट झाला तरीही जेरूसलेम आणि त्याच्या परिसरातील प्रदेश हा इस्लामी सत्तांच्या ताब्यात राहिला होता.


युरोपातील Crusades(क्रुसेडस्)धर्मयुद्धांना पाठिंबा :

धर्मयुद्धांना सामान्य जनता, राजकीय सत्ताधीश आणि व्यापारी यांनी पाठिंबा दिला.

१.      ख्रिस्ती धर्माचे प्रमुख धर्मगुरु पोप यांनी जे लोक धर्मयुद्धामध्ये सामील होतील त्यांना पापक्षालना संदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या. त्यामुळे जनतेने या युद्धांमध्ये मनापासून सहभाग घेतला.

२.     रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे सीरिया आणि आशिया मायनर येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. म्हणून राजकीय सत्ताधारी यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला.

३.     इटली या देशातील व्हेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरांमधील धनिकांना मध्य आशियात बाजारपेठा प्रस्थापित करायच्या हेतूने व्यापारी वर्गाने धर्मयुद्धांना पाठिंबा दिला.


युरोपातील Crusades(क्रुसेडस्)धर्मयुद्धांच्या अपयशाची कारणे :

१.    पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धांकडे संकुचित हेतूंनी पाहिले.

२.    धर्मावरील कमी झालेली श्रद्धा,

३.    युरोपातील विविध राजांमधील एकीचा अभाव,

४.    पोप जर्मन सम्राटातील वितुष्ट,

५.    बायझॅन्टाईन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव या बाबी धर्मयुद्धांच्या अपयशास कारणीभूत होत्या.


युरोपातील Crusades(क्रुसेडस्)धर्मयुद्धांचे परिणाम :

१.      धर्मयुद्धांमुळे युरोपातील सरंजामशाहीचा अस्त झाला,

२.     लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली.

३.     मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली. नवा व्यापारी वर्ग उदयाला आला.

४.     युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले. किल्लेबांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूलबांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी गोष्टींमध्ये युरोपीय राष्ट्रांनी प्राविण्य मिळवले.

५.     लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपमधील राजांनी नवीन कर लागू केले.

६.      युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, फळे, अत्तरे, पोषाखाचे वेगवेगळे प्रकार, साखर, सुती रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टी परिचित झाल्या.

७.     धर्मयुद्धांच्या काळात अरबांशी अालेल्या संपर्कातून युरोपीय राष्ट्रांचा अनेक नवीन विषयांशी संपर्क आला. रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रांतील अनेक अरबी शब्द युरोपीय लोकांनी आत्मसात केले.

रविवार, १० एप्रिल, २०२२

Vegetables Names

Vegetable - व्हेजीटेबल - भाजीपाला

Potato - पोटॅटो - बटाटा

Tomato - टोमॅटो - टमाटे

Cabbage - कॅबेज - कोबी

Brinjal - ब्रिंजल - वांगे

Laday`s-finger - लेडी फिंगर - भेंडी

Cauliflower - कॉलीफ्लाॅवर - फुलकोबी

Alibanam - आलिबनम - तोंडले

Bean - बिन - घेवडा

Cluster bean - क्लस्टर बीन - गवार

Green pea - ग्रीन पी - हिरवा मटार

Gourd - गोर्ड - दुधी भोपळा

Serpent-gourd - संपंट गोर्ड - पडवळ

Ribbed-gourd - रिब्ड गोर्ड - दोडके

Bitter-gourd - बीटर गोर्ड - कारले

Pumpkin-gourd - पम्कीन गोर्ड - कोहळा

Calabash - कॅलबॅश - मोठा भोपळा

Radish - रॅडी - मुळा

Carrot - कॅरट - गाजर

Beat - बीट - बीट

Sweet-potato - स्वीट पोटॅटो - रताळे

Drum-stick - ड्रम स्टिक - शेवग्याची शेंग

Onion - अन्यन - कांदा

Chive - चाइव्ह - कांदा लाल

Garlic - गार्लिक - लसून

Ginger - जिंजर - आले

Sorrel - साॅरेल - आंबाडी

Mint - मिंट - पुदिना

Arum - आरम - आळू

Elephant-foot - एलिफंट फुट - सुरण

Coriander - काॅरिअँडर - कोथिंबीर

Green-chilly - ग्रीन चिली - हिरवी मिरची

Celery - सेलरी - माठ

Fruits Names

Fruit - फ्रुट - फळ

Lemon - लेमन - लिंबू

Orange - ऑरेज - संत्रे

Sweet-Lime - स्वीट लाइम - मोसंबी

Shaddock - शॅडॉक - पपनस

Mango - मँगो - आंबा

Cashew Apple - कॅश्यु अॅप्पल - काजूचे बोंड

Apple - अॅप्पल - सफरचंद

Jack-Fruit - जॅक फ्रुट - फणस

Sapodilla - सॅपोडीला - चिकू

Peach - पीच - जांभ

Fig - फिग - अंजीर 

Custard-Apple - कस्टर्ड अॅपल - शिताफळ

Pomegranate - पाॅमोग्रेनिट - डाळिंब

Pipen - पिपीन - सफरचंद

Melon - मेलन- खरबूज

Watermelon - वाॅटरमेलोन - कलिंगड

Cucumber - क्युकंबर - काकडी

Grape-Fruit - ग्रेप  फ्रुट - द्राक्ष 

Date - डेट - खजूर

Banana - बॅनान - केळे

Pineapple - पाइन अॅपल - अननस

Guava - ग्वाव्हा - पेरू

Peach - पीच - स्प्ताळू

Apricot - अॅप्रीकाॅट - एकगोड फळ

Berry - बेरी - करवंद 

Jujube - जुजूब - बोर

Tamarind टॅमरीन चिंच

Imlica -  इम्लिका - आवळा

Citron - सिट्राॅन - महाळुंग

Papaya - पपया- पपई

Wood Apple - वूड अॅपल - कवठ

 

Dry-Fruit - ड्राय फ्रुट - सुकामेवा

Cashew Nut - अॅश्यु नट - काजूगर

Walnut - वाल्नट - अक्रोड

Apricot - अॅप्रीकोट - जर्दाळू

Date Plum - डेटप्लम - खारिक

Almond - अखंड बदाम

Pistachio - पिस्टाशिओ - पिस्ता

Plums - प्लम्स - मनुका

Raisins - रेझीन्स - बेदाणा

Marking Nut - मार्किंग नट - बिब्बा

Orchard - आॅर्चर्ड - फळबाग

Coconut - कोकोनट - नारळ

Betel-Nut - बेटलनट - सुपारी

Juice - ज्युईस - रस

Jam - जॅम - मुरंबा

Nutshell - नटशेल - करवंटी

Nut - नट - कडक दाणा

Peel - पील - साल

मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

Flower's Names

Flowers - फ्लॉवर्स - फुले

Heli-o-trope - हेली--ट्रॉप - सूर्यकमळ

Lotus - लोटस - कमळ

Rose - रोझ - गुलाब

Brier - ब्रायर - रानगुलाब

Champak - चंपक - चाफा

Lily - लिली - भुईचाफा

Jasmine - जास्मिन - जाई

Night queen - नाईटक्वीन - रातराणी

Marigold - मेरिगोल्ड - झेंडू

Chamomile - कॅमोमाइल - शेवंती

Daisy - डेझी - मोगरा

Myrtle - मर्टल - मोगरा

Tube-rose - ट्यूब-रोझ - गुलछबू

Amaranth - अॅमरन्थ - कोरांटी

Raceme - रॅझिम - संकासूर

Syringa - सिरिंगा - सुरंगी

Gardenia - गार्डिनिया - कुंद

Oleander - ऑलिएंडर - कण्हेर

Shoe-flower - शू फ्लॉवर - जास्वंद 

Sun-flower - सन-फ्लॉवर - सूर्यफूल

Pandanus - पॅन्डनस - केवडा

Screw-pine - स्क्रू-पाइन - केवडा

Yucca - युका - तगर

Daffodil - डेफोडिल - पिवळे फूल

Dahlia - डेलिया - डेली

Stalk - स्टॉक - देठ

Twig - ट्वीग - डहाळी

Flower - फ्लॉवर - फूल

Petal - पेटल - पाकळी

Bud - बड - कळी

Garland - गार्लँड - माळ

Chaplet - चॅप्लेट - हार

Wreath - रिथ - गजरा

Khus - खस - वाळा

Aroma - अॅरोमा - सुगंध, दरवळ

Scent - सेंट - अत्तर

Blossom - ब्लॉसम - मोहर

Bunch - बंच - जुडी/गुच्छ

Lawn - लाॅन - हिरवळ

Anthor - अॅन्थर - परागकोश

Stamen - स्टॅमेन - पुंकेसर

Pistil - पिस्टिल - स्त्रीकेसर

Corolla - कराॅला - फुलांचा सडा

Garden - गार्डन - बगीचा

Gardener - गार्डनर - माळी

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...