थोडक्यात टिपा लिहा :
१ कार्ल मार्क्स:
१ एकोणिसाव्या
शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्सने त्याचा ‘दास कॅपिटल’ या जगप्रसिद्ध ग्रंथात वर्गसंघर्षाचा सिद्धान्त मांडला.
२ कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धान्तांमुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी साम्यवादी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली.
३ इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. असे त्याचे मत होते.
४ मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली.
२ लिओपाॅल्ड व्हॅन रांके
१ एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव होता.
२ त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले.
३ मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावर त्याने भर दिला.
४ इतिहासलेखनातील
काल्पनिकतेवर त्याने टीका केली.
५ ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.
६ ‘द थिअरी अँड प्रॅक्टिस आॅफ हिस्टरी’ आणि ‘द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी’ या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे.
३ जेम्स ग्रँट डफ
१ जेम्स ग्रँट डफ या ब्रिटिश अधिकाऱ्यांने मराठी साम्राज्याचा इतिहास ‘ए हिस्टरी ऑफ द मराठाज्’ हा ग्रंथ तीन खंडात लिहिला.
२ भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याच ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते.
३ डफ याच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी एकोणिसाव्या शतकात दाखवून दिल्या.
४ वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य,
१ वर्तमानपत्रांनी समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले.
२ राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास भारतीय जनते पर्यंत पोहचवला.
३ तत्कालीन, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली.
४ साम्राज्यवादी धोरणांना विरोध करून राजकीय चळवळीना पाठींबा दिला.
५ एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
५ प्रसार माध्यमांची आवश्यकता
१ माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरवण्यासाठी प्रसारमाध्यमांची आवश्यकता असते.
२ दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यमाने जनतेला ‘प्रत्यक्ष काय घडले’ हे दाखवायला सुरुवात केली. जनतेला एखाद्या घटनेचा ‘आँखो देखा हाल’ पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही.
३ सर्व वयातील व व्यवसायातील नागरिकांना प्रगती आवश्यक असलेली माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवली जाते.
४ प्रसारमाध्यमाने मनोरंजन केले जाते.
५ लोकशाही अधिक सुदृढ होण्यास वर्तमानपत्रे मदत करू शकतात.
६ प्रसारमध्यमाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
१ वृत्त पत्रात लेख, अग्रलेख, लिहिणारे लेखक व
संपादकाची आवश्यकता असते.
२ बातम्या जमा
करणारे वार्ताहर तंत्रज्ञ यांची आवश्यकता असते
३ माध्यमात कार्यक्रम सादर करणारे तंत्रज्ञ, निवेदक, कलाकार व सहकालाकारंची आवश्यकता असते.
४ माध्यमातून सादर केलेले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी निगडीत असल्यास इतिहास तज्ञांची आवश्यकता असते.
७ दूरदर्शन
१ दूरदर्शन हे
दृक श्राव्य मध्यम असल्याने ते अत्यत प्रभावी आहे
२ दूरदर्शन हे
मनोरंजनाचे लोक
प्रसिद्ध साधन आहे यात
माहित ऐकता ऐकता चित्रे ही पाहता येतात.
३ दूरदर्शनवर सामाजिक, राजकीय, आर्थिक यासारख्या विविध विषयावर चर्चा, मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळ
असे विविध कार्यक्रम घर
बसल्या पाहता येतात.
४ दूरदर्शनचे बदलत जाणारे स्वरूप रंगीत संच, रीमोटचा वापर, घटनांचे प्रत्यक्ष प्रसारण यांमुळे लोकप्रियता आजून वाढतच आहे.
८ मार्को पोलो
१ तेराव्या शतकातील मार्को पोलो या इटालियन प्रवासी.
२ त्याने आशिया खंड आणि विशेषतः चीनची ओळख युरोपला करून दिली, तो १७ वर्षे चीनमध्ये राहिला.
३ आशियातील निसर्ग, समाजजीवन, सांस्कृतिक जीवन आणि व्यापार यांची ओळख त्याने जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला.
९ स्थलकोश:
१ इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे. विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भांत माहिती देणारे कोश आहेत.
२ महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी (१४ वे शतक) या ग्रंथात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी ज्या-ज्या गावी गेले त्या गावांची तपशीलवार नोंद आहे. तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून येते.
३ लीळाचरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगाने घडल्या हेही स्थानपोथीकार सांगतात. त्यामुळे श्रीचक्रधरस्वामींच्या चरित्रलेखनासाठी हा उत्तम संदर्भग्रंथ आहे.
४ सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ‘प्राचीन भारतीय स्थलकोश’ या कोशाची रचना केली आहे.
५ वैदिक साहित्य, कौटिलीय अर्थशास्त्र, पाणिनीचे व्याकरण, वाल्मीकी-रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच फार्सी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यांमधील भौगोलिक स्थळांची माहिती कोशात दिली आहे.
१० विश्वकोश.
१ विश्वकोशात जगभरातील ज्ञान साररूपाने या कोशांमध्ये नोंदले आहे.
२ विश्वकोशातील माहिती ही संशोधनपूर्ण नोंद केलेल्या असल्याने विश्वासार्ह् असते म्हणून विश्वकोश हे ज्ञानप्रसाराचे साधन मानले जाते.
३ विश्वकोशाचे दोन भाग पडतात.
अ) सर्वसंग्राहक (उदा., एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इत्यादी)
आ) विशिष्ट विषयपर कोश - हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. उदा., भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश इत्यादी.
११ भारतातील संग्रहालये
(इंडियन म्युझियम):
१ कोलकाता येथील ‘भारतीय संग्रहालय’ हे भारतातील पहिले संग्रहालय ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल’ या संस्थेतर्फे इसवी सन १८१४ मध्ये स्थापन झाले.
२ प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, जतन
व संवर्धन, ग्रंथालय अशा
विविध विभागामार्फत काम
चालते.
३ भारतातील प्रसिद्ध संग्रहालये: इंडियन म्युझियम कोलकाता, नॅशनल म्युझियम दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई, सालारजंग म्युझियम हैदराबाद, द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाइल्स अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयांपैकी काही आहेत.
१२ खेळ आणि
चित्रपट
१ खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्या आहेत.
२ अलीकडच्या काळात ‘खेळ’ आणि खेळाडूंचा जीवनपट यांवर काही हिंदी व इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली आहे. उदा., मिल्खासिंग, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडूलकर, मेरी कोम आणि दंगल.
३ चित्रपट बनवताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांची सखोल माहिती मिळते.
१३ सरस्वती महाल ग्रंथालय:
१ तमिळनाडूतील तंजावर येथील ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ हे इसवी सनाच्या सोळाव्या- सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात बांधले गेले.
२ व्यंकोजीराजे
भोसले आणि त्यांच्या वंशंजांनी सरस्वती महाल ग्रंथालय अधिकाधिक समृद्ध केले. त्यांमध्ये सरफोजीराजे भोसले यांचा महत्त्वाचा वाटा होता.
३ त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन १९१८ मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.
४ या ग्रंथालयाच्या संग्रहात सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत.