शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये

        Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये


*           बोलणार्‍या व्यक्तीच्या मनातील आनंद, दुःख, राग, भिती, खेद, शोक, आश्चर्य इत्यादी मनोभावनाची तीव्रता किंवा उत्कटता अशा प्रकाराच्या वाक्यातून व्यक्त होतात. 

 *          उद्गारवाचक वाक्ये नेहमी सध्या विधानात सुध्दा बदलता येते. म्हणजेच वाक्याच्या अर्थात कोणत्याही बदल न करता शब्दांची रचना बदलून निराळे वाक्य बनविता येते. 

 *         या वाक्यात  very, so, great, extremely या सारखे तीव्रता दाखवणारे शब्द काढून टाकावे.

 *          कर्ता व क्रियापद यांच्या जागेची अदलाबदल होऊ शकते.

  *         वाक्यात इतर काही माहिती सांगणारे शब्द असतील तर त्यांचा समावेश करावा.

 *          अशा प्रकारची वाक्ये what किंवा how ने सुरू होतात व त्याच्या शेवटी ! उद्गारवाचक चिन्ह असते. 

 *           अशा प्रकाराच्या वाक्यात क्रियापद बहुधा सर्वात शेवटी किंवा ते लुप्त असते.


Examples

1. What hard luck! 

2. How rude he was! 

3. How happy he was! 

4. Cleaver people! 

5. Beautiful! 

6. Wonderful!

7. How kind the king was!      

8. What fun! 

9. How unhappy I am! 


Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये रचना 

      Step 1 : वाक्ये what किंवा how ने सुरू करावी

      Step 2 : नंतर adjective किंवा adverb लिहावे

      Step 3 : नंतर वाक्यातील कर्ता

      Step 4 : नंतर वाक्याची क्रियापद असते 

      Step 5 : त्याच्या शेवटी ! उद्गारवाचक चिन्ह असते. 


How ने सुरू होणारे Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये 

       Step 1 : How ने सुरू करावी

      Step 2 : नंतर adjective किंवा adverb लिहावे

      Step 3 : नंतर वाक्यातील कर्ता

      Step 4 : नंतर वाक्याची क्रियापद असते 

      Step 5 : त्याच्या शेवटी ! उद्गारवाचक चिन्ह असते. 

 

  Step 1 : How ने सुरू करावी

                 दिलेले वाक्य ज्या वाक्यापासून Exclamatory वाक्वाय बनवायचे आहे त्या वाक्यात विशेषणापूर्वी उपपद articles (a/an ) चा उल्लेख नसेल व  तर How ने वाक्य सुरू करतात. 

         या वाक्यातील नामापूर्वी उपपद articles (a/an ) नसते.

   Step 2 : नंतर Adjective / Adverb लिहावे

                   नंतर adjective किंवा adverb लिहावे

   Step 3 : नंतर वाक्यातील Subject कर्ता लिहावा

                नंतर वाक्यातील कर्ता लिहावा, वाक्यातील कर्ता एकवचनी, अनेकवचन नाम किंवा सर्वनाम असते. 

   Step 4 : नंतर वाक्यातील Verb क्रियापद लिहावे 

   Step 5 : शेवटी ! उद्गारवाचक चिन्हं लिहीतात 

 

Examples 

1. I am very glad. 

How glad I am! 

How glad!

2. Elephant is very strong. 

How strong elephant is! 

How strong elephant!

How strong! 

3. You are very greatful. 

How greatful you are! 

How grateful you! 

4. Voice was very loud. 

How loud voice was! 

How loud voice! 

5. You are very hard working.

You are working very hard. 

How hard working you are ! 

How hard Working! 

How hard! 


What ने सुरू होणारे Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये 

       Step : 1 What

       Step 2 : Articles  a / an

       Step 3 : Adjective / Adverb

       Step 4 : Noun जे मुळ विधानार्थी वाक्यात वापरलेले असते ते. 

       Step 5 : Subject

       Step 6 : Verb

       Step 7 : !


1.जर मूळ विधानार्थी वाक्यत जर विशेषणानंतर नामचा उल्लेख असेल तर What ने वाक्य सुरू करतात. 

2. जर मूळ विधानार्थी वाक्यातील विशेषणानंतर नाम एकवचनी असेल तर त्या नामापूर्वी उपपद articles (a/an ) असते.

3. उपपद articles (a/an ) वापरण्यात विषयी

Exclamatory Sentence उद्गारवाचक वाक्यात उपपद articles (a/an )  वापरत असताना ते विशेषणापूर्वी वापरतात

a/an हे नामा नुसार न वापरता ते विशेषणाच्या आद्यक्षरानुसार वागावे. 

4. नंतर adjective किंवा adverb लिहावे

5. नंतर मूळ विधानार्थी वाक्यातील विशेषणानंतर असलेले नाम लिहावे.

6. नंतर वाक्यातील कर्ता लिहावा, वाक्यातील कर्ता एकवचनी, अनेकवचननी नाम किंवा सर्वनाम असते. 

7. नंतर वाक्यातील क्रियापद लिहावे.

8. शेवटी उद्गारवाचक चिन्ह ! लिहावे. 

9. या वाक्यात  very, so, great, extremely या सारखे तीव्रता दाखवणारे शब्द काढून टाकावे.

10. कर्ता व क्रियापद यांच्या जागेची अदलाबदल होऊ शकते.

11. वाक्यात इतर काही माहिती सांगणारे शब्द असतील तर त्यांचा समावेश करावा. 


Examples

1. It was a very fantastic idea. 

What a fantastic idea it was! 

What a fantastic idea!

2. He was brave king. 

What a brave king was!

What a brave king!

3. He was a keen learner. 

What a keen learner he was! 

What a keen learner. 

4. It is a very usefull tree. 

What a useful tree it is! 

What a useful tree! 

What a useful! 

5. He is a very busy person.

What a busy person he is! 

What a busy person! 

What a busy! 

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

Wh - Type Questions

Wh - Type Questions

आपण Wh-Type Questions ची जास्तीत जास्त वाक्याच्या सहाय्याने समजून घेऊ आणि अभ्यास करु.


Wh-Type Question आपण शिकताना खालील मुद्यांचा अभ्यास करणार आहोत.

Wh-Type Question म्हणजे काय?

Wh-Type Question कसा तयार करावा?

Wh-Type Question च्या Step व Format:

Wh words निवड कशी करावी?

विधानार्थी वाक्यावरून Wh-Type Question कसा बनवावा?


Wh-Type Question म्हणजे काय?

Wh Type Questions या प्रश्नांची उत्तरे yes or no मध्ये देता येत नाही तर उत्तरात काही माहितीची अपेक्षा असते.


Wh-Type Question कसा तयार करावा?

विधानार्थी वाक्यावरून Wh-Type Question बनवत असताना विधानार्थी वाक्यातील उत्तरची माहिती सांगणाऱ्या शब्दांचा प्रश्नात समावेश करू नये.

वाक्यातील उत्तरची माहितीचा शोध घेणाऱ्या योग्य अशा WH-words प्रश्नार्थक शब्दांनी Wh-Type Question सुरूवात करावी, WH-words लिहिल्या नंतर Auxiliary Verb सहाय्यकरी क्रियापदाचा वापर Yes/No Type Questions मध्ये ज्या प्रमाणे केला जातो त्याप्रमाणे करावा,

WH-words Auxiliary Verb हे एकत्र वाक्याच्या सुरुवातीस येणे आवश्यक आहे,

विधानार्थी वाक्यातील पुढे असलेले शब्द त्यात कर्ता Subject, क्रियापद Verb, Object/other words कर्म अथवा इतर शब्द यांचा समावेश होतो यांपैकी वाक्यातील उत्तराची माहिती सांगणाऱ्या शब्दांचा प्रश्नात समावेश करू नये आणि आवश्यक असलेले ते शब्द लिहावेत.

प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे वाक्याच्या शेवटी ? चिन्ह द्यावे.

प्रश्नाची सुरूवात wh - word ने होते. त्यामुळे त्या wh word चे पहिले अक्षर Capital Letter मोठ्या लिपीत लिहावे.  


Wh-Type Question च्या Step व Format:

Format:

Wh-Type word + Auxiliary Verb + Subject + Verb + Object/ other words + ?


Step 1: Wh-Type word

Wh - Type Questions अशा प्रकारचे प्रश्न या प्रश्नार्थक शब्दांनी सुरू होतात.

(Who, What, Why, When, Which, Whose, How, Whom, Where, When etc.)

Step 2: Auxiliary Verb - साहाय्यकारी क्रियापदाचे रूप

सहाय्यकरी क्रियापदाचा वापर Yes/No Type or Verbal Questions मध्ये ज्या प्रमाणे केला जातो त्याप्रमाणे करावा.

Step 3: Subject - कर्ता 

मूळ वाक्याचा कर्ता Subject नाम Noun किंवा सर्वनाम Pronoun असतो.

Subject कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो. यात Proper Noun असेल तर त्याचे पहिले अक्षर Capital Letter मोठ्या लिपीत येते.

Step 4: Verb – क्रियापद

Yes/No type question वाक्य तयार करताना ज्याप्रमाणे क्रियापदात बदल केला जातो त्याप्रमाणे करावा.

Step 5: Object/ other words - नंतर कर्म/ पूरक व इतर शब्द.

दिलेल्या वाक्यातील Object/other words कर्म अथवा इतर शब्द असतील ते लिहावे.

Step 6:?

प्रश्नार्थक  वाक्य असल्यामुळे वाक्याच्या शेवटी ? चिन्ह द्यावे.


 Examples 

1. How did Sahil sing song? 

2. Why does Rahul bind roap?

3.Where do Children catch balls?

4. What is Sanjay bringing?

5. Who are building house?

6. When were People buying vegetables?

7. Which was boy choosing fruits?


Who - कोण? नाम, सर्वनाम वाक्यातील कर्ता शोधण्यासाठी 

 Examples 

1. Who is your teacher?

2. Who are these people?

3. Who was sitting by you?

4. Who has taken my pencil?

5. Who did shout?

6. Who does kill the sparrow?


What - काय? वस्तूचे नाम, सर्वनाम वाक्यातील कर्म शोधण्यासाठी 

 Examples 

1. What is your name?

2. What do you see?

3. What does cow eat?

4. What did you eat yesterday?

5. What have you lost?

6. What are you doing? 


Which - कोणता? - वस्तू व व्यक्ती साठी

 Examples 

1. Which is your book? 

2. Which are your friends?

3. Which book did you want?

4. Which does the wind blow? 


Whose - कोणाचा? - कर्ता किंवा कर्म यांचा संबंध शोधण्यासाठी 

 Examples 

1. Whose house is this?

2. Whose flowers are these?

3. Whose umbrella is that?

4. Whose friend are you?

5. Whose will you become?


Where - कोठे? - क्रिया घडत असण्याचे ठिकाण शोधण्यासाठी 

 Examples 

1. Where do you live? 

2. Where does this train go?

3. Where did you go with friends?

4. Where shall we go this evening?

5. Where has your brother gone?

6. Where are you going?


When - केव्हा? क्रिया घडत असण्याची वेळ शोधण्यासाठी

 Examples 

1. When is your examination? 

2. When did you get up?

3. When does your brother live? 

4. When will you go?

5. When shall I see tiger again? 


Why - का? - क्रिया घडण्यामागील कारण शोधण्यासाठी 

 Examples 

1. Why are you late?

2. Why did you do this?

3. Why don't you stand up?

4. Why have you gone there?

5. Why is the child singing?


How - कसा? क्रिया घडत असण्याची रित, पध्दत शोधण्यासाठी  

1. How are you?

2. How do you do?

3. How did you get money? 


How long - किती काळ? वेळ

1. How long have you been here?


How far?  - किती दूर? अंतर

1. How far can you walk?


How much - किती? संख्येत मोजता न येणारे

1. How much rice do you eat?


How many - किती? संख्येत मोजता येणारे

1. How many colours has the rainbow?


Whom - कोणाला? नाम, सर्वनाम वाक्यातील कर्म शोधण्यासाठी  

1. Whom do you want?

2. Whom do you like?

3. Whom do you wish to see?


With whom? - कोणाबरोबर / सह?

1. With whom are you living? 

2. With whom did you come to school?


Of Whom? - कोणा बद्दल? 

1. Of whom did you write? 

2. Of whom are you talking?

3. Of whom is he speaking?


For whom - कोणासाठी? 

1. For whom have you brought this mango?

2. For whom did your father buy this cap?

3. For whom are you taking that chair?


To whom? - कोणाला/कोणाशी? 

1. To whom did you write? 

2. To whom are you talking?

3. To whom is he speaking? 


विधानार्थी वाक्यावरून Wh-Type Question कसा बनवावा?

परीक्षेमध्ये Wh-Type Question बनवण्यासाठी प्रश्न विचारला जातो, त्यात एक वाक्य दिले जाते त्या वाक्यातील काही भाग अधोरेखित केलेला असतो हा भाग म्हणजे बनवल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर असते, अधोरेखित केलेला भाग कोणत्या स्वरूपाचा आहे हे शोधणाऱ्या wh word ची निवड करावी व दिलेल्या वाक्यातील उत्तराची माहिती सांगणाऱ्या शब्दांचा प्रश्नात समावेश करू नये.

 Examples 

1. Children catch balls.

   What do children catch?

2. Boys choose fruits.

  Who do choose fruits? 

3. Yesterday, I sold mangoes.

When did I sell mangoes?

4. We shall send letters to get permission.

Why shall we send letters? 

5. You sit on chair.

Where do you sit?

6. Rahul binds roap tightly. 

How does Rahul bind roap?

7. Shankar builds house to people.

Whom does Shankar build house?

8. He speaks in English language. 

Which language does he speak in?

9. Sanjay brought milk.

 What did Sanjay bring?

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

Proverbs म्हणी

  Proverbs म्हणी

इंग्रजीतील म्हणी व त्याचे मराठीत अर्थ

1. Man propose and God disposes - 

आपले मन चिंतते एक, परंतु देवाच्यामनात असते वेगळेच.

2. The early bird catches the worm / First come first served - हाजिर तो वजीर.

3. Haste makes waste - अती तेथे माती.

4. Tit for tat - जशास तसे.

5. Little things please little minds - कोल्हा काकडीला राजी.

6. Like father like son - खाण तशी माती.

7. Fortune favours the brave - साहस तेथे लक्ष्मी.

8. Where there is a will, there is a way - इच्छा तेथे मार्ग.

9. After death the doctor - वरती मागून घोडे.

10. Union is strength - एकीचे बळ, मिळते फळ.

एकतेत सामर्थ्य आहे.

11. Out of sight, out of mind - दृष्टीआड ते सृष्टीआड.

12. No rose without thron - काट्याशिवाय गुलाब नाही.

13. To err is human - चुकणे हा मनुष्यधर्म आहे.

14. The child is father of man - बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.

15. Strike while the iron is hot-  तापल्या तव्यावर पोळी भाजावी, वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यावेत.

16. Truth needs no evidence - हातच्या कंकणाला आरसा कशाला?

17. ill got, ill spent  - हपापाचा माल गपापा.

18. A nod for the Wise, a rod for the fool - शहाण्याला शब्दाचा मार.

19. A person with little knowledge shines among fools - वासरात लंगडी गाय शहाणी.

20. Might is right - बळी तो कान पिळ.

21. Pride has a fall - गर्वाचे घर खाली.

22. Bad company leads to poverty - अंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.

23. Passion leads to poverty - अति राग, भीक माग.

24. Charity begins at home - दान हे आधी स्वतः च्या घरापासून सुरू व्हावे.

25. Cut your coat according to your cloth - अंथरूण पाहून पाय पसरावेत.

26. Cast pearls before a swine - गाढवाला गुळाची चव काय?

27. Don't judge a book by its cover - काय भुललाशी वरलिया अंगा.

28. God helps those who help themselves - कष्ट करणार् याला देवाचे सहाय्य.

29. Health is wealth - आरोग्य हेच ऐश्वर्य.

30. Every light has a shadow - दिव्याखाली अंधार.

31. Empty vessels make the most noise - उथळ पाण्याला खळखळाट फार.

32. Early to bed and early to rise makes a man  healthy wealthy and wise - लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे.

33. Reap as you sow / As you sow, so you reap - पेरावे तसे उगवते.

34. Listen to people, but obey your conscience - ऐकावे जनाचे करावे मनाचे.

35. Physician, heal thyself - वैद्य स्वत: ला बरे कर.

36. Distance lends enchantment to the view - अंतर दृश्यासाठी मंत्रमुग्ध करते.

37. To err is human - चूक तो मनुष्य 

 38. Much good, much care - खूप चांगली, खूप काळजी.

39. New lords, new laws - नवीन राजा, नवीन कायदे.

40. Silence is golden - मौन सुवर्ण आहे.

41. Every dog has his day - प्रत्येक कुत्र्याचा त्याचा दिवस असतो. 

42. There is no use crying over spilt milk - सांडलेल्या दुधावर रडण्याचा काही उपयोग नाही.

43. Money makes the mare go - पैसे मिळाली घोडी गेली.

44. A friend in need is a friend indeed - गरजू मित्र खरोखरच मित्र असतो.

45. A bad workman quarrels with his tools -  नाचता येईना, अंगण वाकडे.

46. Short but sweet लहान पण गोड

47. A stitch in time saves nine  वेळेत एक शिलाई नऊ वाचवते

 48.  Birds of a feather flock together पंखांचे पक्षी एकत्र येतात.

49. Wearer knows where the shoe pinches - the lead. बूट कोठे चिमटे काढतात - शिसे हे परिधान करणाऱ्याला माहित असते. 

50. टोकाचे टाळा Avoid extremes 

51. Bones for the late-comers उशिरा येणाऱ्यांसाठी हाडे

52. A fig for the doctor when cured - गरज सरो वैद्य मरो.

53. A drowning man will catch at a straw - बुडत्याला काडीचा आधार.

54. A wise acre - अकलेचा खंदक, दीडशहाणा.

55. Every light has its shadow - गांव तेथे उकिरडा.

56. Honey is sweet, but the bee stings - धी देखा लेकिन् बडगा नहीं देखा.

57. Many men, many minds figure among ciphers - वासरांत लंगडी गाय शहाणी.

58. Much a do about nothing - करणे थोडें, मचमच फार

59. To fly from the frying pan into the fire - आगीतून निघून फोफाट्यात पडणे.

60. Hunger is harder than death - अंतकाळापेक्षां मध्यान्हकाळ कठीण.

61. Dependence is a poor date - परस्वाधीन जिणे आणि पुस्तकी विद्या.

 62. There is no smoke without fire - विस्तवाशिवाय धूर नाही.

63. You cannot eat your cake and have it - सर्वच गोष्टी कधी साधत नाहीत.

64. He laughs best who laughs last - शेवटीं हसणाराचे हास्य सर्वात चांगले असते.

 65. Rome was not built in a day - एका दिवसात रोम बांधले गेले नाही. (मोठ्या गोष्टींना काळ आणि कष्ट फार लागतात.)

66. Beggars must not be choosers - अन्नछत्रांत जाऊन मिरपूड मागतां येत नाही.

67. Charity begins at home - दान हे आधी स्वतःच्या घरापासून सुरू व्हावें.

68.  Mary in haste, repent at leisure - घाईने उरकलेल्या कामाचा पश्चाताप करावा लागतो.

69.  Walls have ears - भिंतींना कान असतात.

70. Preventions better than cure - पुढे निस्तरीत बसण्यापेक्षा अगोदर प्रतिबंधक योजना करणे बरे.

71. Trolling stone gathers no moss - गडगडत्या दगडाला शेवाळ चिकटत नाही.

72. Blood is thicker than water - मैत्रीपेक्षा नातें बलवत्तर ठरते.

73. Hunger is the best sauce - भुकेला कोंडा, निजेला धोंडा.

74. Those who live in glass houses should not throw stones - avoid all - घरांत राहाणान्यांने दुसऱ्यांवर दगडफेक करु नये.

75. Necessity knows no law - आपद्धर्माला बंधन नाही.

76. Familiarity breeds contempt - अतिपरिचयात अवज्ञा.

77. All that glitters is not gold  - चकाकतें तें सगळे सोने नव्हे.

78. A bird in hand is worth two in the bush - हातातलें सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये.


बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

Synonym Words - समानार्थी शब्द

  Synonyms - समानार्थी शब्द

इंग्रजी Synonyms - समानार्थी शब्द व त्यांचे मराठी अर्थ 



1. Accurate  - exact, correct. अचूक

2. Act  - deed, action. कृती

3. Admission  - entry. प्रवेश

4. Alert  - watchful, cautions. सावध

5. Annual  - yearly. वार्षिक

6. Ask  - inquire, enquire. चौकशी 

7. Aweful  - Terrible. भितीदायक

8. Begin  - start. सुरूवात

9. Brave  - courageous, fearless, bold. धाडस

10. Caution  - careful. काळजी

11. Certainly  - surely, definitely. निश्चित

12. Chance  - opportunity. संधी

13. Cleverly  - skillfully. चातुर्य

14. Common  - ordinary, usual. सामान्य

15. Competition  - contest. स्पर्धा

16. Conversation  - talk. संभाषण

17. Cure - Heal. बरा होणे

18. Damp  - moist. ओलसर

19. Defect  - fault. दोष

20. Desire  - wish, want, crave. इच्छा

21. Educate  - teach, enlighten. शिक्षा

22. Evidence  - proof. पुरावा

23. Fair  - just. फक्त, थोडस

25. Finish  - complete.शेवट

26. Freedom  - liberty. स्वातंत्र्य

27. Frequently  - often. वारंवार

28. Frightened  - scared. भीती

29. Grief - sorrow, distress, misery. दुःख

30. Happily  - merrily. आनंद

31. Hard  - difficult. कठीण

32. Hardworking  - industrious. परीश्रम

33. Harm - injury, Hurt. दुखापत 

34. Hate - dislike. द्वेष

35.  Idea - thought. विचार

36. Imagine - think. कल्पना

37. Loyal - faithful. विश्वसनीय

38. Necessary - essential. आवश्यकता

39. Polite - courteous. नम्र

40. Rapidly - quickly. लगेचच

41. Safe - secure. सुरक्षित

42. Similar - alike, identical. समान

43. Strength - power. शक्ती

44. Strong - powerful. सशक्त

45. Subject - topic. विषय

46. Tired - weary. थकणे

47. Try - attempt. प्रयत्न

48. Vanish - disappear. अदृश्य

49. Want - need. गरज

50. Entire - complete, total, full, whole. पूर्ण

51. Error - mistake, blunder. चूक

52. Bright - shining, intelligent, brilliant. तेजस्वी

53. Compulsory - binding, obligatory. सक्ती

54. Decrease - lessen, reduce, diminish. कमी होणे, उतार

55. Enough - sufficient, adequate, ample. पूरेस

56. Famous  - noted, celebrated, renowned, eminent. प्रसिद्ध

57. Fight  - clash, bout, fray, battle, combat, conflict. भांडण

गुरुवार, २९ जुलै, २०२१

Three Form of Verbs (क्रियादांची रुपे)

                              Three Form of  Verbs (क्रियादांची रुपे)


    1) वर्तमान काळ, भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित सारखी असलेली क्रियापदे

    2) भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित सारखी असलेली क्रियापदे

    3) वर्तमान काळ, भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित भिन्न  असलेली क्रियापदे

    4)  इंग्रजीतील नियमित  वापरात असलेल्या क्रियापदांचे मराठीत अर्थ


 Irregular Verbs (अनियमित क्रियापदे)

आपण भाषेचा अभ्यास करतो तेव्हा त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दसंग्रह. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांची माहिती असणे आवश्यक आहे. येथे आपण शब्द प्रकारातील व्यवहारातील क्रियापदांचे (नियमीत उपयोगातील)  अर्थ जाणून घेणार आहोत.

इंग्रजी भाषेत महत्वाच्या व्याकरणाच्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी काही पायाभूत माहिती माहित असणे आवश्यक आहे. 

ज्यांचा उपयोग काळ बदलण्यासाठी केला जातो. जर क्रियापदांची तीन रूपे माहिती नसतील तर आपण Simple Present Tense, Simple Past Tense, Present Perfect Tense, Past Perfect Tense इत्यादी काळ बनवू शकत नाही. 

वर्तमान काळ, भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित सारखी असलेली क्रियापदे

Present Tense       Past Tense           Past 

Root Verb                                          Participle

(वर्तमानकाळ           (भूतकाळ)              (भूतकाळ                                                                 धातुसाधित)

1. Bet                           Bet                   Bet

2. Shut                         Shut                 Shut

3. Cut                           Cut                  Cut

4. Hurt                         Hurt                 Hurt

5. Set                            Set                  Set 

6. Put                           Put                   Put

7. Hit                           Hit                    Hit

8. Cast                         Cast                  Cast

9. Cost                         Cost                 Cost

10. Thrust                   Thrust               Thrust

11. Spread                  Spread               Spread

12. Read                     Read                  Read

13. Burst                    Burst                  Burst


भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित सारखी असलेली

Present Tense               Past Tense                    Past 

Root Verb                                                          Participle

(वर्तमानकाळ)               (भूतकाळ)                (भूतकाळ धातुसाधित)

1. Spill                   Spilt                     Spilt 

2. Stand                Stood                     Stood

3. Sell                   Sold                       Sold

4. Buy                   Bought                Bought

5. Bring                Brought.            Brought

6. Catch                Caught                 Caught

7. Seek                  Sought                 Sought

8. Feel                   Felt                       Felt

9. Dig                    Dug                      Dug

10. Get                  Got                       Got 

11. Hear                Heard                   Heard

12. Hold                Held                    Held 

13. Keep               Kept                     Kept 

14. Lie                  Laid                     Laid

15. Learn             Learnt                  Learnt

16. Light               Lit                        Lit

17. Find                Found                   Found

18. Shine              Shone                   Shone 

19. Fight              Fought                Fought 

20.. Strike             Struck                 Struck 

21. String              Strung               Strung  

22. Hang               Hung                   Hung

23. Lead                Led                      Led

24. Leave              Left                      Left

25. Make              Made                   Made

26. Lend               Lent                     Lent

27. Pay                 Paid                     Paid

28. Say                 Said                     Said

29. Meet              Met                      Met

30. Dwell              Dwelt                  Dwelt

31. Burn               Burnt                   Burnt

32. Spend             Spent                   Spent

33. Sweep            Swept                   Swept

34. Tell                 Told                     Told

35. Think             Thought            Thought

36. Weep              Wept                    Wept 

37. Sleep              Slept                    Slept 

38. Bend               Bent                    Bent 

39. Bind                Bound                Bound 

40. Bleed              Bled                    Bled 

41.Smell               Smelt                  Smelt 

42. Sit.                  Sat                      Sat

43. Dream          Dreamt                Dreamt 

44. Lose               Lost                     Lost 

45. Mean              Meant                  Meant 

46. Win                Won                     Won

47. Think           Thought              Thought

48. Weep              Wept                    Wept

49. Feed               Fed                       Fed

50. Understand  Understood Understood 

वर्तमान काळ, भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित भिन्न असलेली क्रियापदे

Present Tense Past Tense Past Participle

(Root Verb)

(वर्तमानकाळ)                          (भूतकाळ)                (भूतकाळ धातुसाधित)

1. Be - am/is/are.     was, were         been

2. Beat                     beat                   beaten

3. Become            became            become

4. Begin                began                  begun 

6. Bite                   bit                       bitten

7. Break               broke                  broken

8. Choose              chose                 chosen

9. Come                   Came                  come

10. Do                         did                     done

11. Draw                 drew                  drawn

12. Drink                drank                  drunk

13. Eat.                      ate                      eaten

14. Fall                      fell                     fallen

15  Fly                       flew                   flown

16. Forget                  forgot        forgotten

17. Give                   gave                  given

18. Go                       went                  Gone

19. Grow                   grew               grown

20. Get                      Got                    gotten

21. Hide                    hid                  hidden

22. Know                  knew              known

23. Lead                   Led                    Led

24. Ring.                  rang                   rung

25. Rise.                  rose                    risen

26. Run.                   ran                     run

27. See.                   saw                    seen

28. Speak               spoke                 spoken

29. Steal                 stole                    stolen

30. Swim                swam                  swum

31. Take                  took                    taken

32. Throw            threw                 thrown

33. Wake                woke                   woken

34. Wear                 wore                   worn

35. Write                wrote                written


इंग्रजीतील नियमित  वापरात असलेल्या क्रियापदांचे मराठीत अर्थ

  1. Bet       - (बेट)       - पेज मारणे
  2. Shut      -(शट)       - बंद करणे
  3. Cut       - (कट)      - कापणे
  4. Hurt      - (हर्ट)      - इजा करणे 
  5. Set        -  (सेट)       - मावळणे /घट्ट बसवणे 
  6. Put        - (पुट)       - ठेवणे
  7. Hit        -  (हिट)      - टोला मारणे
  8. Cast      - (कास्ट)     -फेकणे
  9. Cost       - (कॉस्ट)    - किंमत पडणे
  10. Thrust    - (थर्स्ट)     - खूपसणे
  11. Spread   - (स्प्रेड)    - पसरणे
  12. Read      -(रेड)       - वाचणे
  13. Burst      -(बर्स्ट)     - फुटणे
  14. Be          - (बी)        - असणे/होणे. am/is/are
  15. Beat       - (बीट)      - मारणे.
  16. Become - (बिकम्) - होणे.
  17. Begin     - (बीगिन्) - सुरवात करणे/होणे.
  18. Bind      - (बाइन्ड्)  - बांधणे.
  19. Bite        - (बाइट)   - चावणे.
  20. Break      - (ब्रेइक्)   -  फुटणे, मोडणे
  21. Bring      - (ब्रिग्)      - आणणे.
  22. Build      - (बिल्ड्)    - बांधणे.
  23. Buy        - (बाइ)      - विकत घेणे.
  24. Bleed      - (ब्लीड)    - रक्त वाहणे
  25. Catch      -  (कॅच्)      - पकडणे.
  26. Choose   - (चूझ्)      - पसंत करणे, निवडणे.
  27. Come     - (कम)     - येणे.
  28. Cost       - (कॉस्ट)   - किंमत परणे.
  29. Cut        - (कट)      - कापणे.
  30. Die        - (डाय)     - मरणे.
  31. Dig        - (डिग्)     - खणणे.
  32. Do         - (डू)        - करणे.
  33. Draw     - (ड्रॉ)       - चित्र इ. काढणे, ओढणे.
  34. Drink    - (ड्रिंक)    - पिणे.
  35. Dwell     - (ड्वेल) - एकत्र राहणे
  36. Dream   - (ड्रीम)    - स्वप्न पाहणे
  37. Eat        - (इट)      - खाणे.
  38. Fall       - (फाॅऽल) - पडणे.
  39. Feed      - (फीड)   - खाऊ घालणे.
  40. Feel      - (फील)    - वाटणे.
  41. Fight    - (फाईट)   - भांडणे.
  42. Find     - (फाइंड)  - सापडणे.
  43. Fly       - (फ्लाय)   -  उडणे.
  44. Forget  - (फरगेट) - विसरणे.
  45. Give    - (गिव्ह)    - देणे. 
  46. Go       - (गोव्ह)    - जाणे.
  47. Grow   - (ग्रोव्ह)    - बहरणे, वाढणे.
  48. Get      - (गेट)       - मिळवणे, घेणे.
  49. Hang   - (हँग)       - टांगणे, लोंबणे.
  50. Hear    - (हिअर्)   - ऐकणे.
  51. Hide    - (हाइड)   - लपणे, लपवणे.
  52. Hit       - (हिट्)      - टोला मारणे.
  53. Hold    - (होल्ड्)    - धरणे.
  54. Keep   - (कीप)     - जवळ ठेवणे, राखणे, सांभाळ करणे.
  55. Know  - (नो)        - माहीत असणे
  56. Lead    - (लीड्)     - पुढे नेणे, नेतृत्व करणे.
  57. Learn  - (लर्न्)       - शिकणे,
  58. Leave  - (लीव्ह)    - निघणे, सोडणे.
  59. Lay     - (लाइ)      - लादणे, पडणे, पडून राहणे
  60. Lie      - (लाइ)      - खोटे बोलणे
  61. Light  - (लाइट)    - दिवा लावणे
  62. Lend  - (लेड)       - उसणे देणे 
  63. Lose  - (लोस)      - हरणे / हरवणे
  64. Make - (मेइक)    - बनवणे, तयार करणे. 
  65. Meet - (मीट)       - भेटणे. 
  66. Mean - (मीन)      - अर्थ समजणे
  67. Pay    - (पे)          - पैसे देणे.
  68. Put     - (पुट)      - ठेवणे.
  69. Read  - (रीड)     - वाचणे.
  70. Ring  - (रिंग)      - वाजणे, वाजवणे.
  71. Rise   - (राइज)   - वर येणे, उठणे, उगवणे.
  72. Run   - (रन्)       - धावणे.
  73. Say    - (से)        - म्हणणे, बोलणे.
  74. See    - (सी)       - पाहणे, बघणे.
  75. Sell   - (सेल)      - विकणे.
  76. Send - (सेन्ड)     - पाठवणे.
  77. Sit    - (सिट)      - बसणे.
  78. Sleep - (स्लीप)   - झोपणे.
  79. Speak - (स्पीक)  - बोलणे.
  80. Stand  - (स्टॅन्ड)   - उभे राहणे.
  81. Steal  - (स्टील)   - चोरणे.
  82. Set    - (सेट)       - ठेवणे,  घट्ट बसवणे, अस्ताला जाणे
  83. Shut  - (शट)      - बंद करणे.
  84. Sweep - (स्वीप)  - झाडणे.
  85. Swim - (स्विम्)   - पोहणे.
  86. Spill   - (स्पिल)   - सांडणे 
  87. Seek   - (सीक)    - शोधण  
  88. Strike -  (स्ट्राइक) - घालणे 
  89. String - (स्ट्रींग)     - गुंफणे  
  90. Spend - (स्पेंड)     - खर्च करणे
  91. Smell - (स्मेल)     - वास घेणे
  92. Take   - (टेक)      - घेणे.
  93. Teach  - (टिच)     - शिकवणे.
  94. Tell     - (टेल)      - सांगणे.
  95. Think  - (थिंक्)    - विचार करणे.
  96. Throw - (थ्रोव्ह)    - फेकणे. 
  97. Wake  - (वेइक)    - जागे होणे.
  98. Wear  - (वीइर)     - नेसणे, परिधान करणे.
  99. Weep  - (व्हीप)     - रडणे.
  100. Win    - (विन्)       - जिंकणे.
  101. Write  - (राइट्)     - लिहिणे. 

सोमवार, २६ जुलै, २०२१

Yes/No Type Question

Verbal Question 
or 
Yes/No Type Question

आज आपण Yes/No Type Questions चा अभ्यास करु.
Verbal Question or Yes/No Type Question म्हणजे काय? 
या प्रश्नाची सुरुवात क्रियापदाने verb ने होते म्हणून त्यांस Verbal Questions म्हणतात व या प्रश्नाचे उत्तर Yes/No असते म्हणून त्यांना Yes/No Type Questions म्हणतात.
Verbal Questions व Yes/No Type Questions हे दोन्ही प्रश्न एकच आहेत.

Yes/No Type Questions शिकताना खालील मुद्यांचा अभ्यास करणार आहोत.

1.    Yes/No Type Questions चा Format आणि Steps:
2.   Do, does आणि Did चा Tense काळानुसार उपयोग करुन प्रश्न तयार करणे व प्रश्न तयार करताना घ्यायची खबरदारी.
3.    Tense काळानुसार Auxiliary Verbs चा वापर करुन प्रश्न तयार करणे. 
4.  Statement Sentence विधानार्थी वाक्याचे Yes/No Type Questions रुपांतर करणे. 

Yes/No Type Question Format:

Auxiliary Verb + Subject + Verb + Object/ other words + ?

Yes/No Type Question Steps:

Step 1: Auxiliary Verb

वाक्याची सुरुवात Auxiliary Verb - साहाय्यकारी क्रियापदाने करावी.
Yes/No Type question प्रश्नाची सुरूवात Auxiliary Verb ने होते. त्यामुळे त्या Auxiliary Verb पहिले अक्षर Capital Letter मोठ्या लिपीत लिहावे.

Step 2: Subject

दिलेल्या वाक्यातील Subject-कर्ता लिहावा. 

मूळ वाक्याचा कर्ता Subject हा Noun किंवा Pronoun असतो. 

Subject कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये असतो. 

यात Proper Noun असेल तर त्याचे पहिले अक्षर Capital Letter मोठ्या लिपीत येते.

Step 3: Verb
दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचे योग्य रूप वापरावे.

Step 4: Object/other words
दिलेल्या वाक्यातील Object/other words कर्म अथवा इतर शब्द असतील ते लिहावे.

Step 5: ?
प्रश्नार्थ वाक्य असल्यामुळे वाक्याच्या शेवटी ? चिन्ह द्यावे.



वाक्याची सुरुवात Auxiliary Verb - साहाय्यकारी क्रियापदाने करावी.
Yes/No Type question प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी वापरत येणारी Auxiliary Verb

To be:                  am, is, are, was, were 

Have:                    have, has, had

Do:                        do, does, did

Future Tense:        shall, will

Modal Auxiliary:

Future Tense:        shall, will

Present Tense:       can, may, must

Past Tense:   could, might, should,       would, must

 

Auxiliary Verb ची निवड कशी करावी?

ज्या वाक्यापासून Yes/No Type Question तयार करायचा आहे त्या वाक्यातजर सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याच सहाय्यकारी क्रियापदाचा वापर Yes/No Type Question करण्यासाठी करावा. 

ज्या वाक्यापासून Yes/No Type Question तयार करायचा आहे त्या वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर वाक्यातील मुख्य क्रियापद असते तर Do, Does आणि Did चा वापर करून Yes/No Type Question तयार करावा.

 

Do, Does आणि Did केव्हा व कसे वापरावे?

मूळ वाक्यात Action Verb Simple Present Tense वर्तमान काळात असेल तर Do, Does या Auxiliary Verb ने Yes/No Type Questions ची सुरूवात करावी. 

 

Does केव्हा व कसे वापरावे?

मूळ वाक्यात Action Verb Simple Present Tense वर्तमान काळात असेल आणि वाक्यातील कर्ता तृतिय पुरुषी एकवचन असेल तर Does चा वापर करावा.

Simple Present Tense मध्ये Subject तृतीय पुरूषी एकवचनी नाम किंवा Personal Pronouns (he/she/it) असेल व मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाला (वर्तमान काळातील रूपाला) s/es प्रत्यय असेल तर Does ने प्रश्न तयार करावा.

Does ने प्रश्नाची सुरूवात केलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाला (वर्तमान काळातील रूपाला) s/es प्रत्यय लावू नये.



Examples:

1. Rahul binds roap.

Does Rahul bind roap?

2. Shankar builds house.

Does Shankar build house?

3. He speaks in English.

Does he speak in English?

4. She stands.

Does she stand?

 

Do केव्हा व कसे वापरावे?

मूळ वाक्यात Action Verb Simple Present Tense वर्तमान काळात असेल आणि वाक्यातील Subject कर्ता अनेकवचनी नाम असेल तर प्रश्न बनवण्यासाठी Do चा वापर करावा.

Subject कर्ता प्रथम पुरूषी Pronoun सर्वनाम एकवचनी I, अनेकवचनी We असेल तर, Do चा वापर करावा.

Subject कर्ता द्वितीय पुरुषी Pronoun सर्वनाम एकवचनी you, अनेकवचनी you तर, Do चा वापर करावा.

Subject कर्ता तृतीय पुरुषी Pronoun सर्वनाम अनेकवचनी they असेल तर, Do चा वापर करावा.

Examples:

1. Children catch balls

Do children catch balls?

2. I sell mangoes

Do I sell mangoes?

3. we send letters

Do we send letters?

4. You sit on chair.

Do you sit on chair?

5. You sleep on mat.

Do you sleep on mat?

6. They shut door.

Do they shut door?

 

भूतकाळात Did केव्हा व कसे वापरावे?

मूळ वाक्यात Action Verb Simple Past Tense भूतकाळात असेल तर Did या Auxiliary Verb ने Yes/No Type Questions ची सुरूवात करावी.

Did ने प्रश्न विचारायचा असेल तेव्हा वाक्यातील मुख्य क्रियापदाचे मूळ रूप Simple Present Tense वर्तमान काळातील रूप वारावे.

Examples:

1.Sahil sang song.

Did Sahil sing song?

2.Sanjay brought milk.

Did Sanjay bring milk?

3.People bought vegetables.

Did People buy vegetables?

4.You sat on chair.

Did you sit on chair? 

5.We sent letters

Did we send letters?

 

ज्या वाक्यापासून Yes/No Type Question तयार करायचा आहे त्या वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याच सहाय्यकारी क्रियापदाचा वापर Yes/No Type Question करण्यासाठी करावा.   

 

1) To be: या सहाय्यकारी क्रियापदांनी प्रश्न तयार करणे.

Present Tense : am, is, are

Past Tense : was, were



Examples:

Simple Present Tense

1. Am I Teacher?

2. Is it sweet?

3. Are you singer?

Present Continuous Tense 

1. You are sleeping on mat.

Are you sleeping on mat?

2. He is speaking in English.

Is he speaking in English?

Simple Past Tense 

1. Was I boy?

2. Were they farmers?

Past Continuous Tense

1. You were sleeping on mat.

Were you sleeping on mat?

2. He was speaking in English.

Was he speaking in English?

 

2) Have: have, has had या सहाय्यकारी क्रियापदांनी प्रश्न तयार करणे.

Examples                


Simple Present Tense 

1. Have you a pen?

2. Have I pen?

3. Has she book?

4. Has it colour?

5. Have they books?

Present Perfect Tense

1. It has stolen money. 

Has it stolen money?

2. You have slept on mat.

Have you slept on mat?               
 

Simple Past Tense 

1. Had they ball?

2. Had we pens?

3. Had you book?

4. Had he pen?


Past Perfect Tense

1. He had spoken in English.

Had he spoken in English?

2. It had stolen money.

Had it stolen money?



Modal Auxiliary ने केव्हा व कसे वापरावे?

जर वाक्यात Modal Auxiliary (shall, will, Can, May, Must, could, might, should, would, must) यापैकी सहाय्यकारी क्रियापदे असतील तर त्याच Modal Auxiliary ने प्रश्न तयार करवा.

जेव्हा Modal Auxiliary ने प्रश्नाची सुरूवात केली असेल तेव्हा वाक्यातील मुख्य क्रियापदाचे मूळ रूप (वर्तमान काळातील) रूप वापरावे.

1) Future Tense: shall, will

1. I shall prepare for exam.

Shall I prepare for exam?

2. You will play.

Will you play?


2) Present Tense: Can, May, Must

1.  Children can catch balls.

Can children catch balls?

2. Rahul must bind roap.

Must Rahul bind roap?


3) Past Tense: could, might, should, would, must.

1. Shankara could build house. 

     Could Shankar build house?

2. Sahil might begin to sing. 

       Might Sahil begin to sing?

3. Sanjay should bring milk. 

     Should Sanjay bring milk?

4. People would buy vegetables.

      Would people buy vegetables?

5. Sanjay must bring milk.

     Must Sanjay bring milk?

 

4. Statement Sentence चे प्रश्नार्थक वाक्यात Yes/No Type Questions रुपांतर करणे. 

Yes/No Type Question हे Affirmative की, Negative बनवायचा हे आपल्याला ज्याप्रमाणे उत्तर अपेक्षित आहे त्यावर निश्चित असते.

जर उत्तर 'हो-Yes' अपेक्षित असेल तर प्रश्न नकारार्थी  Negative बनवावा.

जर उत्तर 'नाही-No' अपेक्षित असेल तर प्रश्न होकारार्थी Affirmative बनवावा. 

 

जर उत्तर 'हो-Yes' अपेक्षित आहे तर Yes/No Type Question प्रश्न नकारार्थी  Negative बनवावा.                

Present Tense

1.     Children catch balls.

Don't children catch balls?

2. He speaks in English.

     Doesn't he speak in English.

3. You are singer.

    Aren't you singer?

4. He is farmer.

    Isn't he farmer?

5. We have pens.

    Haven't we pens?

6. She has book.

    Hasn't she book?

7. We may take book. 

    May we not take book?

8. You can swim in river. 

      Can't you swim in river?

             

    Past Tense 

1.People bought vegetables.

   Didn't People buy vegetables?

2. You sat on chair. 

   Didn't you sit on chair? 

3. I was boy.

   Wasn't I boy?

4. We were farmers.

    Weren't we farmers? 

5. They had ball. 

    Hadn't they ball?

6. I could tell story. 

   Couldn't I tell story?

7. She should Sweap the road. 

    Shouldn't she sweap the road?

8. They would throw ball. 

    Wouldn't they throw ball?


Future Tense

1. I shall tell story. 

   Shan't I tell story?

2. We will take book. 

  Won't we take book?

3. She will sweap the road. 

  Won't she sweap the road? 

4. They will throw ball. 

  Won't they throw ball?

 

जर उत्तर 'नाही-No' अपेक्षित आहे तर Yes/No Type Question प्रश्न होकारार्थी Affirmative बनवावा. 

Present Tense

1. You do not sit on chair.

    Do you sit on chair?

2.You have not book.

       Have you book?

3. She has not a book. 

        Has she a book?

4. Rahul must not bind roap.

       Must Rahul bind roap?

           

Past Tense

1. He did not speak in English. 

     Did he speak in English?

2. They did not shut door. 

      Did they shut door?

3. You was not singer.

      Was you singer?

4. They were not farmers.

      Were they farmers? 

5. You had not books.

      Had you books?

6. Shankar could not build house. 

      Could Shankar build house?

7. Sahil might not sing song. 

       Might Sahil sing song? 

 8. Sanjay should not bring milk. 

        Should Sanjay bring milk?

9. People would not buy vegetables.

      Would people buy vegetables?

 

Future Tense: shall, will

1. I shall not prepare for exam. 

     Shall I prepare for exam?

2. You will not play. 

       Will you play?

3. Children will not catch balls.

       Will children catch balls? 

4. Rahul will not bind roap. 

       Will Rahul bind roap? 

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...